Showing posts with label सुंदर विचार (Nice Marathi Thoughts). Show all posts
Showing posts with label सुंदर विचार (Nice Marathi Thoughts). Show all posts

मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?

मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?
---------------------------------------------------------------
माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग धरत नाही, महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही. का झाले असावे असे? मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला, जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.

बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात, शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात, पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते, त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात. ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात, ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात, पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात; असे का, याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे, तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे. गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू, स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे, तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.

आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३० – ३५ हजारात गेला. मुलांना कॉन्व्हेंट शाळा, सकाळी बिस्किट, मॅगी, केक, स्कूल बस, घरी परत आल्यावर हातात जेवण, पुस्तके व गाईड्स, क्लासेस, पॅरेंट मीटिंग, लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती, पालकही अभ्यास घेतात, मुलांना वार्षिक सहल, गृहपाठ, प्रोजेक्ट, अजून बरंच काही. मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात, जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो. त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो. कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते. विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो. तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते. आपला मुलगा म्हणजे खूप हुशार, हिरो, मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा, प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात. परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो, तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते. १० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही. उद्योजक व व्यवसाय करावा, तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.

पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो. काय चुकले असेल या पालकांचे? एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का? पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का? कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का? जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते, रोज समोर खाद्य टाकले जाते; पण त्या कोंबडीला हे माहित नसते, की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते, ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे लागते, चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते. ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही.
http://m.facebook.com/MarathiVichar9
याउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत. लहानपणी शाळेची पुस्तके जुनी, फाटलेली, मित्रांची किंवा भावाची वापरली. शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती, शाळेत जायला साधी सायकलही नव्हती. पाटी, दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे. जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची. केक, मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा, गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे, नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची.

कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक. एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा, झाडाचा डिंक काढायचा, बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा. (आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात, ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड... कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकीडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल? शाळेत असताना ज्यांना घरची शेती, घरकाम, दुकानातील काम करावे लागते, त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते. गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते. व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते. १२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात. अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात, त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते. ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात. गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही, ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात. जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात; पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो. जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते, तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात. पालकांनो स्वत:ला विचारा तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?

महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.

खूप छान विचार

🚶🏾khup Chan  हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........

🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍

🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍

🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍

🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल
त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍

🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं.
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍

🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो...
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले....
की यशालाही पर्याय नाही..✍🏻

🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍

🚶🏾👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...,
लोकांच काय लोक " चुका"
तर "देवात" पण काढतात.....✍

🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल....
हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा,चांगली वेळ येईल....✍

🚶🏾👌जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.....✍

🚶🏾👌विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही...!!
तुम्ही चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात...!!✍

🚶🏾👌कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही...,
पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असते.....✍

🚶🏾👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍

🚶🏾👌चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.....✍

🚶🏾👌एक सत्य  . . . 👇"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ".....✍

🚶🏾👌असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.....✍

🚶🏾👌"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही.".....✍

🚶🏾👌क‍‍‌‌‌‍धी‍ही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील.....✍

🚶🏾👌आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होउ देऊ नका
          कारण
लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाही.....✍
💐💐🚩🚩👌🏻👌🏻👌🏻       खूप छान आहे वेळ असेल तर नक्की वाचा .

Bhutkal

"गाडीची पुढची काच खूप मोठी असते आणि मागे कोण आहे ते बघण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो.  असे का?  तर भूतकाळाला फारच थोडे महत्व आहे. मागे फक्त लक्ष्य ठेवा.  भविष्यकाळ महत्वाचा. पुढे बघा.  आणि पुढे जात रहा.  आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी अल्पकाळ टिकणार्या असतात.  मनासारख्या घडत असतील तेव्हा त्यांचा भरपूर आस्वाद घ्या.  कारण त्या लवकर संपतील.  आणि मनाविरूध्द गोष्ठी घडत असतील तर काळजी करू नका,  त्या लवकर संपणार आहेत..

Nice Thoughts

सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात...
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही...
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही...
सूर्यास्ता नंतर स्वतः ची सावलीही दूर जाते...
पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात....
           जीवनात संकटांचं येणं म्हणजे
         "Part of life" आहे,
                 आणि...
त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
         बाहेर पडणं म्हणजे
          "Art of life" आहे...!

History, science

इतिहास सांगतो की काल सुख होतं !

विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल!

पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे !!

Nice lines ever

         कुणी चांगले म्हणावे म्हणून
                         काम करू नका ,
        आपण करीत असलेल्या कामाने
        अनेकांचे भले होणार असल्यास
                 ते काम सोडूच नका.
     
             जर आपला हेतुच शुध्द आणि
                 प्रामाणिक असेल तर...
       आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
            टीकेला काहीच महत्व नसते.

                 चांगल्या कर्मांची फळे
                  चांगलीच असतात.

              मुखातून गेलेला राम आणि
               निस्वार्थापणे केलेले काम
              कधीही व्यर्थ  जात नाहीत."       

Marathi Thoughts

माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो...!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,

पण साजूक तूपात माशी पडली तर तो
         माशी फेकून देतो तूप नाही..
              अगदी तसच...

    आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
             करून बोभाटा करतो.

'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...
   सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही
देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।

खरा सर्वात श्रीमंत

एक दाणा पेरावा तेंव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कणिस देते.
माणूसही तसाच असतो, प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो मग त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो.
प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा सर्वात श्रीमंत !

घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही

संपली की विचारांना
डावलणारी माणसं स्वार्था साठीच
जवळ येतात,
परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली
माणसं निस्वार्थी पणे संकटात
सुध्दा जवळ येतात..
आपण चंदन असल्याची
घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो...!!

Nice lines

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,
ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात...

Nice lines

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,
ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात...

Suvichar

'"आजचा सुवीचार
                   "आठवण"
     किती सोपा शब्द आहे हा,
दुसऱ्याने काढली तर त्याची किंमत नसते.
पण तीच आठवण स्वतःला येते तेंव्हा त्याचे महत्व कळते...

Nice Thoughts

|| एक विचार ||

                जे अंत:करणातून निपजते तेच अंत:करणाला जाऊन भिडते. 

                भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो. 

शुभ मंगल दिन !!!

Nice Thoughts

🌸सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच
नसत हसून हसून जगायच असत.
🍁रातराणी सांगते अंधाराला घाबरायच
नसत काळोखात ही फुलायच असत.
🌹गुलाब सांगतो येता जाता रडायच
नसत काट्यात सुद्धा हसायच असत
🌼बकुळि म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच
नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत
🌷कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच
नसत संकटाना बुडवून फुलायच असत.
🌾🍃🍂🌾🍃🍂🌾🍃
💐💐शुभ सकाळ💐💐

Nice lines for today's

गरज संपली की विचारांना
डावलणारी माणसं स्वार्था साठीच
जवळ येतात,
परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली
माणसं निस्वार्थी पणे संकटात
सुध्दा जवळ येतात..
आपण चंदन असल्याची
घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो...!!

Jarur vacha...

                     🙏 नमस्कार 🙏

दुष्ट माणसांना हे जग शुध्द नरकासारखे दिसते, सज्जनांना ते सर्व श्रेष्ठ स्वर्गा सारखे दिसते, द्वेष करणा-याला सर्वत्र द्वेषच  आढळतो, भांडखोरांना भांडणा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही.....!

शांत स्वभावाच्या माणसांना सर्वत्र शांतीचा प्रत्यय योतो, पुर्णत्वाप्रत पोहोचलेल्या माणसाला ईश्वरा व्यतीरीक्त दुसरे काहीच दिसत नाही....!!
                                   स्वामी विवेकानंद...

मित्रानों जरुर वाचा......!!
एकदा गाडगेबाबा पंढरपुरला गेले होते. चंद्रभागेच्या तीरावर फिरताना त्यांना एक भट् काही लोकांसमोर पिंडदान विधी करत होता. भट् त्या लोकांनी तयार केलेले पक्वान्न वरच्या दिशेने फेकत होता व काहीतरी बडबड करत होता...!

गाडगेबाबा भटाला म्हणाले, " ये काय करुन राहीलाय, बाप्पा......?"

भट् म्हणाला, " तुला दिसत नाही का "..... ?
मी हे अन्न या लोकांच्या स्वर्गातील " मातापित्यांना " पाठवत आहे....

संत गाडगेबाबांनी थोडावेळ विचार केला. भटाला धडा शिकवायचा हे ठरवले. गाडगेबाबा चंद्रभागेत उतरले व हातातील गाडग्याने जोरजोरात पाणी भटजी कडे फेकु लागले. भटाला राग आला. तो रागाने ओरडला," हे मुर्ख मानसा हे काय करतोस तु ".......?,"

गाडगेबाबा शांतपणे म्हणाले, " माझी अमरावतीला संत्र्याची बाग आहे, तीला मी पाणी घालतोय " सर्वजण हासायला लागले. भट् म्हणाला," अरे वेड्या इतक्या दुर आमरावतीला येथुन पाणी कसे जाईल....?"

बाबा पटकन बोलले," तुम्ही जर मेलेल्या लोकांना स्वरगात जेवण पाठवता. मग मी इथुन फेकलेलं
पाणी आमरावतीला का नाही जाणार., बाप्पा "......?"

तात्पर्य : -  बुद्धीचा वापर करा....!!!

साखरेची गोडी

“साखरेची
   गोडी जीभे वर
     काही सेकंदच रहते
 पण माणसाच्या स्वभावतील
      गोडी मात्र
शेवट पर्यन्त
       मनात घर
करुण जाते"

Excellent lines of Life

'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...
   सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही।
देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।

'आनंद' हा एक 'भास' आहे,
      ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
       'दु:ख' हा एक 'अनुभव' आहे, जे प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच 'जिंकतो',
ज्याचा 'स्वत:वर पूर्ण विश्वास' आहे.
         💥"शुभ सकाळ"💥
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Nice Lines

👉 नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....    कोणाचा  अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....
-  तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....
- कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......
स्वतःवर कधीही अहंकार करू नका
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं......
         -स्वामी विवेकानंद

Part of life

सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात...
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही...
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही...
सूर्यास्ता नंतर स्वतः ची सावलीही दूर जाते...
पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात....
           जीवनात संकटांचं येणं म्हणजे
         "Part of life" आहे,
                 आणि...
त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
         बाहेर पडणं म्हणजे
          "Art of life" आहे...!!