Showing posts with label Inspirational Thoughts. Show all posts
Showing posts with label Inspirational Thoughts. Show all posts

वाचन

📖 *वाचन का आवश्यक आहे ?* 📖

📚एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !

📘 श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.

📙 जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे.

📒 पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.

📕 वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो.

📔 टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो.

📓 वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.

📚वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. या उलट जास्त टी.व्ही. मोबाईल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे.

📖 टी.व्ही मोबाईलमुळे मन शांतीचा भंग होतो तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.

📔
वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो. टी.व्ही मोबाईल चक्कर मध्ये अडकणारे उशिरा झोपतात नी उशिराच उठतात. परिणामी शरीर संपदेसह श्रीमंतीही नष्ट होते. लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य लाभे.. अशी एक म्हण प्रचलित आहे.

📓 वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.

📕 वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.

📘 काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर, आता मलाच सारे काही कळते, अशा  नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.

📕 वाचनामुळे माणूस नम्र होतो तर टी.व्ही मुळे माणूस भांडखोर नी मोबाईलमुळे आत्मकेंद्री होतो.

📚 जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.

📒 आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक, पुस्तकालाच आपला मित्र बनवा.

📙 टी.व्ही बघणारे प्रवास करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टी.व्ही मोबाईलमुळे थकवा येतो तर वाचनामुळे तरतरी.

📚 जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.

📕 तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.

📓 ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.

📖 *जगात जेवढे  लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते.*

📖📘📚📓📔📕📙

Inspirational SMS

marathi Thoughts, Marathi Quotes on life,Marathi Inspirational

Marathi Thoughts,Marathi Quotes on Life, Marathi Inspirational

एवढेशे  आयुष्य
एवढयाशा आयुष्यात खुप काही हवं असतं,
पण हवं असतं तेच मिळत नसतं .
हवं तेच मिळालं तरी खुप काही कमी असतं,
चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असत्
 तरीसुधा माणसान हरायच नसत् ..

कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

आपल्या सावलीपासून  आपणच  काहीतरी शिकावं,
 कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं ,
 शेवटी काय  घेऊन जाणार आहोत ?
म्हणूनच  मैत्रीच  हे सुंदर रोपट प्रेमाने  जपावं

APJ ABDUL KALAM Thoughts

“If a country is to be corruption free and become a nation of beautiful minds, I strongly feel there are three key societal members who can make a difference.
They are the father, the mother and the teacher.”---- APJ ABDUL KALAM
The Scientist, teacher, learner and writer.
One of the greatest and Most beloved president of India...
A true inspiration for all of us.....
We are going to miss you a Lot SIR....
May your soul rest in piece ....

Jarur vacha...

                     🙏 नमस्कार 🙏

दुष्ट माणसांना हे जग शुध्द नरकासारखे दिसते, सज्जनांना ते सर्व श्रेष्ठ स्वर्गा सारखे दिसते, द्वेष करणा-याला सर्वत्र द्वेषच  आढळतो, भांडखोरांना भांडणा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही.....!

शांत स्वभावाच्या माणसांना सर्वत्र शांतीचा प्रत्यय योतो, पुर्णत्वाप्रत पोहोचलेल्या माणसाला ईश्वरा व्यतीरीक्त दुसरे काहीच दिसत नाही....!!
                                   स्वामी विवेकानंद...

मित्रानों जरुर वाचा......!!
एकदा गाडगेबाबा पंढरपुरला गेले होते. चंद्रभागेच्या तीरावर फिरताना त्यांना एक भट् काही लोकांसमोर पिंडदान विधी करत होता. भट् त्या लोकांनी तयार केलेले पक्वान्न वरच्या दिशेने फेकत होता व काहीतरी बडबड करत होता...!

गाडगेबाबा भटाला म्हणाले, " ये काय करुन राहीलाय, बाप्पा......?"

भट् म्हणाला, " तुला दिसत नाही का "..... ?
मी हे अन्न या लोकांच्या स्वर्गातील " मातापित्यांना " पाठवत आहे....

संत गाडगेबाबांनी थोडावेळ विचार केला. भटाला धडा शिकवायचा हे ठरवले. गाडगेबाबा चंद्रभागेत उतरले व हातातील गाडग्याने जोरजोरात पाणी भटजी कडे फेकु लागले. भटाला राग आला. तो रागाने ओरडला," हे मुर्ख मानसा हे काय करतोस तु ".......?,"

गाडगेबाबा शांतपणे म्हणाले, " माझी अमरावतीला संत्र्याची बाग आहे, तीला मी पाणी घालतोय " सर्वजण हासायला लागले. भट् म्हणाला," अरे वेड्या इतक्या दुर आमरावतीला येथुन पाणी कसे जाईल....?"

बाबा पटकन बोलले," तुम्ही जर मेलेल्या लोकांना स्वरगात जेवण पाठवता. मग मी इथुन फेकलेलं
पाणी आमरावतीला का नाही जाणार., बाप्पा "......?"

तात्पर्य : -  बुद्धीचा वापर करा....!!!

Zhopala

झोपाळा जेवढा मागे जातो तेवढाच, तो पुढे देखील येतो...
सुख आणि दु:ख दोन्ही जीवनात  बरोबर येतात.
जीवनाचा झोपाळा मागे गेला म्हणून  घाबरु नका, तो पुढे ही तितकाच येईल...

🌞सुप्रभात शुभ दिवस😊

Aatmavishwas

आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.