Showing posts with label आई Mummy Mother Mom. Show all posts
Showing posts with label आई Mummy Mother Mom. Show all posts

नक्की वाचा... आई

नक्की वाचा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही👇🏻
मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला ... अग... छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..!

आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, ".. बघुया मला दाखवा...!

इतक्यात,.. मुलगा पटकन बोलला ...
"बाबा तिला कुठे Result दाखवताय ?... तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!"

भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.

ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली...! मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले... "हो रे ! ते पण खरच आहे...!

आमच लग्न झाल तेव्हा तीन महिन्यातच तुझी आई गर्भवती राहिली.. मी विचार केला लग्नानंतर कुठे फिरलो नाही.. व्यवस्थितपणे एकमेकांना समजल पण नाही,. तर ह्यावेळी गर्भपात करुन पुढे chance घेउया.. पण तुझी आई ठामपणे *"नाही"* म्हणाली.. नको ते नंतर वगैरे... फिरण, समजण पण नको... आणि तुझा जन्म झाला... *अशिक्षित होती ना...*

तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुधृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती...
*अशिक्षित होती ना...*

तुला सकाळी सात वाजता शाळेत जाव लागायच म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची.....
*अशिक्षित होती ना...*

तु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येउन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची...
*अशिक्षित होती ना...*

तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास... तेव्हा रात्र-रात्र  जागुन ती परत सकाळी तिची काम चोख करायची....
*अशिक्षित होती ना...*

तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची.
*अशिक्षित होती ना....*

बाळा.... चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःला स्वार्थ आणि मतलब बघतात.. पण तुझ्य आईने आजवर कधीच तो बघितला नाही.
*अशिक्षित आहे ना ती...*

ती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची... म्हणून  मी अभिमानाने सांगतो की *'तुझी आई अशिक्षित आहे...'*

हे सगळ ऐकुन मुलगा रङत रडत आईला बिलगुन बोलतो.. "आई मी तर फक्त पेपरवर ९०% मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १००% बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि ज्या शिक्षकांची मुल ९०% मार्क मिळवतात.. त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.
आई आज मला ९०% मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PHD च्या पण वरची Degree  आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल......!

*बोध:*.... प्रत्येक मुला- मुलीनी *जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात.* त्यांनी विचार करावा, त्यांच्यासाठी काय काय सोसलय... आईवडिलांनी..🙏🏼🙏🏼

आईला द्यावे कधी माहेरपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

कबूल आहे तिचंच असतं घर
पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..

उठू दे तिला कधी सर्वात शेवटी
पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी
नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी
फार नाही, पुरेल तिला मदत जराशी
लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून
सांगावं मनातलं काही जवळ बसून
ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

आई राहून सासरी लेकीला माहेर देते
पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?
जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण
मग आईला कुठलं माहेरपण?

तिला ओळखणारं तिचंच  अंगण
समजुतदारपणावर विश्वासालेल मोकळेपण
शरीर मनाला विसाव्याचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?

आईलाही हवा असेल कधी विसावा
वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा
ज्या हातांना तिनेच लावलंय वळण
आईलाही द्यावं कधी माहेरपण..☺🙏❗

देवाने एका 'आई' ला प्रश्न विचारला.
.
.
.
.
' तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले...

आणि विचारलं दुसरं काही मागा....

तर तुम्ही काय मागणार..??

'..त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;..

''माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागनार....

कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाही.

"हे आहे आईचे प्रेम....''घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही..

जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही ,

सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात  शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात...!

☑☑ आई करीता पुढे पाठवा..
👪👪👪

आई बाबा

लग्ना नंतर खरच मुल ही बायको साठी आई बापाला वार्यावर सोडतात ??

जड झालेले आई-बाप*

नेहमीप्रमाणे 5.30 ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5.44 ची बोरीवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो. ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा 'राजेशचा' मला फोन आला... म्हणाला, "मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच..!"
मी "हो थांबतो" म्हटलं.
मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम.एम. मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो.
एक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मळकटलेले सदरा-धोतर नेसलेले माझ्या जवळ आले. मी त्या लोखंडी अँगलवर 3-4 फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले, "ए बाबा.. एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल...!"
ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं..
अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं. मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं, "आजोबा तुम्हाला भूक लागलीय? हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते..!"
ते म्हणाले, "नको बाबा नको.. पैसे नको.. एक वडापाव घेऊन दे तेवढा"
मी म्हटलं, "थांबा इथेच मी घेऊन येतो."
एम एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले. ते जमिनीवर बसून खाऊ लागले.
मला म्हटले, "वर नको बसू , पडशील... इथं बस माझ्या बाजूला, कुणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास !"
मी आदरंच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली... कुठून आलात? कुठे जायचंय? कोणाला शोधताय? वैगेरे वैगरे.
"मी हिंगोली वरून आलो आहे. तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत. तुझ्याएवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठया कंपनीत इंजिनीअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय. त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासू-सासरे म्हणजे आम्ही गावठी (गावंढळ) वाटतो. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून. परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे...
इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला. मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर,  वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचंय असं म्हणाला.
पुढचे 10 वर्ष जगतोय की मारतोय कोण जाणे.. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन. काल संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय. पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोकं..!"
मी म्हणालो, "बरोबर म्हणतायत लोकं, इथं मालाडला नाही, सांताक्रुज ला आहे Airport.
आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, "परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा. हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं... फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा...त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून"
आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पहिली... मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्क ही फुल होतं...
मी विचारलं, "तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन?"
"मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त" ते म्हणाले.
मी received call मध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या call वर डायल केलं.. समोरून फोन cut करण्यात आला...
मग मी तो कागद उघडून पाहिला... *त्या कागदावर पत्ता होता- छत्रपती शिवाजी विमानतळ, एम एम हॉटेल समोर, मालाड पश्चिम, मुंबई.*
मी समजून गेलो होतो, त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता... मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं.
तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला. त्याला मी म्हटलं दोन मिनिटं थांब फक्त राजेश...
आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो...
मला कळत नव्हतं, मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती?  कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल..
आजोबांना मी म्हणालो, "आजोबा एव्हाणा तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल.. तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी. आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले.
अश्रू भरल्या डोळ्यांतून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले.. आणि विचारलं, "मगासपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय, काय आहे त्या डब्यामध्ये? "
ते म्हणाले, "मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी...
आता मात्र एका धारदार सुऱ्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली. मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो....
तेवढ्यात मित्राचा आवाज आला, "चल ना ऐ...!"
आणि मी भानावर आलो... त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो...
घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. राहून राहून एकच प्रश्न पडत होता...
*'आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस.. आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातल्या एक लाडू खाऊ शकत नव्हता...? इतकं प्रेम????'*

Mobile 📱

ही कविता लिहिणा-या कवीला त्रिवार वंदन !
🌹🙏🌹🙏🌹
         *मोबाईल*
       *********
मम्मी सोड *मोबाईल*
माझ्या सोबत बोल
थोडावेळ बागेमध्ये
खेळु आपण चल...!

सोबत तुला नेहमी
*मोबाईल* लागतो केवळ
घरी आल्यावर तरी
घे ना मला जवळ...!

रात्रभर *मोबाईल*
असतो तुझ्या उशाला
तरीसुद्धा दिवसभर
सोबत ठेवते कशाला...?

पप्पा आज *मोबाईल*
ऑफिसमध्ये विसरा
माझा चेहरा होईल
आनंदाने हसरा...!

दिवसभर *मोबाईल*
तुम्ही हातात धरता
माझे बोट धरून
सांगा कधी फिरता...?

पुढच्या जन्मी मला
*मोबाईल* व्हायच आहे
कारण मला दिवसभर
मम्मी आणि पप्पांसोबत
रहायचं आहे...!
🙏👍👍👌👌🙏वाचुन आवडले तर पुढे पाठवा💐💐

साद आईची

वाचताना अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता... खुप खुप छान लिहिलीय...
.
.❣❣❣❣❣
नक्की वाचा.
💝💘💝💘💝💘💝
"साद आईची"
.
.🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
.
.🏵🏵🏵🏵🏵
भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
.
.⚜⚜⚜⚜⚜⚜
पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा
.
.☯☯☯☯☯☯
तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
.💟💟💟💟💟💟💟
.
शेवटपर्यंत सांगत होता,
लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
.
.💝💝💝💝💝💝💝
माझ्याही ह्रदयात फोटो,
तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.
.
.💘💘💘💘💘💘
दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
.
.💖💖💖💖💖💖
वर्षाकाठी एक कपडा,
पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला..
.
.💗💗💗💗💗💗
हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.💓💓💓💓💓💓💓
धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
.
.💞💞💞💞💞💞
नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
.💕💕💕💕💕💕
.
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.❣❣❣❣❣❣
थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
.
.💜💜💜💜💜💜💜
विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं "कुलभूषण"
पोरकी मी का झाले?
.
.💚💚💚💚💚💚💚
आता माझ्या थडग्यापाशी
"आई" म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.
💛💛💛💛💛💛💛

*फुटका आरसा अन तुटका कंगवा*

*फुटका आरसा अन तुटका कंगवा*
------------------------------------------

*ज्यांचं ज्यांचं वय आज*
*65-75आहे,*
*त्यांच्या स्वभावामधे*
*बराच संयम आहे.*

*कुठून आला हा संयम,*
*एवढी नम्रता कशी ?*
*अपमान पचवण्याची*
*ताकद आली कशी ?*

*या प्रश्नांची उत्तरं*
*जरूर तुम्हाला मिळतील,*
*जर तुम्हाला बालपणीचे*
*त्यांचे दिवस कळतील.*

*दारिद्र्य आणि गरीबी*
*घरोघरी होती,*
*अंग घासायला दगड*
*अन दाताला राखुंडी होती.*

*कशाचं बॉडी लोशन*
*अन् कसचं Hair Gel,*
*हिवाळ्यात अंग उललं की*
*आमसुलाचं तेल.*

*तोंड पाहण्यासाठी नेहमी*
*फुटका आरसा असायचा*
*इतकुश्याच तुकड्यामधे*
*एकतर फक्त डोळा, नाहीतर कान दिसायचा.*

*सगळे दात असलेला कंगवा*
*कधीही मिळाला नाही,*
*अफगाण स्नोचा भाव आम्हाला*
*कधीच कळला नाही.*

*चड्डी अन् सदऱ्याला*
*तांब्याची इस्त्री असायची,*
*न्याहारीला लोणच्यासोबत*
*शिळी भाकरी मिळायची.*

*कबड्डी, लंगडी, कोया*
*फ़ुकटे खेळ असायचे,*
*दोन्ही घुडगे फुटले तरी*
*पोरगे खूश दिसायचे.*

*कांद्याचे पोहे अन्*
*मुरमुऱ्याचा चिवडा,*
*पेढ्याचा तुकडा मिळाला की*
*आनंद आभाळाएवढा.*

*काजू , बदाम यांच्याबद्दल*
*फक्त ऐकून होतो,*
*एखादा पाहुणा आला की*
*अंगणात नाचत होतो.*

*मोठ्या माणसांसमोर जायची*
*हिंमतच नसायची,*
*वडील बैठकीत असले की*
*पोरं ओसरीवर दिसायची.*

*आजकालच्या पोरांना हे*
*खरं वाटणार नाही,*
*आई वडिलांच्या गरीबीवर*
*विश्वास बसणार नाही.*

*म्हणून म्हणतो पोरांनो*
*आई वडिलांशी बोला,*
*काही नाही मिळालं तरी*
*आनंदाने डोला.*

*नसण्यातच मजा होती*
*मोठं झाल्यावर कळतं,*
*खरं शिक्षण माणसाला*
*गरीबीकडूनच मिळतं.*
   
🌹💐 *प्रिय...आई वडील* 💐🌹

👏👏👏👏👏👏👏

आई

🌹आई हि अशी "बँक" आहे, जेथे आपण आपली प्रत्येक भावना आणि दुःख जमा करू शकतो,
             आणि
बाबा असे "क्रेडीट कार्ड" आहे, ज्यांच्याजवळ "बॅलन्स" नसतानाही ते आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात...!!🌹

या आईला काही कळतच नाही...'

' या आईला काही कळतच नाही...'

या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते
इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही
या आईला ना काही कळतच नाही

दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही
या आईला ना काही कळतच नाही

कपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते
बस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून.. भरभर येते
नमस्कार करायला लावते.. कौतुक करत नाही
या आईला ना काही कळतच नाही

शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू... नेहमीच ओरडते
अभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते
मी चित्रं काढलेलं... लक्ष देत नाही
या आईला ना काही कळतच नाही

होमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही
या आईला ना काही कळतच नाही

दमून जाऊन झोप येते..मग मला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला वेळ देता येत नाही
पापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला आवडत नाही
पण या आईला ना काही म्हणजे काही कळतच नाही...
😊

*ती फक्त आईच!!!

"सकाळ दोन फटके देऊन  उठवते.. ती आई

उठल्यावर आवडता नाश्ता समोर आणते.. ती आई

नाश्ता नाही होत तोच डब्याची चिंता करते.. ती आई

काय करेन ते घेउन जा म्हणताना सगळं आवडीचे करते..ती आई

पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते..ती आई

परतीची आतुरतेने वाट बघत असते..ती आई

आपण झोपत नाही तोवर जागी असते..ती आई

आणि जिच्याशिवाय आपले आयुष्यच अपुरे ती फक्त आईच... 

                  ॥आई॥

घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....!

आई

बाळाला जन्म दिल्यावर
प्रत्येकजण विचारतो ,"मुलगा की मुलगी?"
फक्त *आईच* विचारते, "माझं बाळ कसं आहे?"
तिला प्रश्न पडत नाही, "मुलगा की मुलगी?"
म्हणून तर ती *आई* असते ..
परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी.
मी सहजच विचारलं - " *आई* कशी आहे रे?"
😌
😌
😌
😌
?
?
?
?
?
😌
?
😌
?
😌
?
😌
?
?
?
?
शांतं झाला थोड्यावेळ आणि म्हणाला -
गेली दोन वर्ष वृद्धाश्रमात आहे.
आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला."
त्यानं मला विचारलं - "तुझी *आई* तुझ्याकडेच
असते ना?"
मी म्हणालो - मी *आईपेक्षा* मोठा नाही झालो.
आई माझ्याकडे नसते.
मीच *आईकडे* राहतोय.
....जन्मापासून"..

आवडल कि नक्की पुढे पाठवा.
..👌👌
बायकॊच्या पदराला तॊड पुसले
तर बायको म्हणते पदर
खराब होईल.
          .... पण .......
*आईच्या* पदराला तोंड पुसले
तर आई म्हणते बाळा पदर
खराब आहे
                ====
    🌺 *आई* ही *आईच* असते 🌺
जिभेला झालेली जखम लवकर बरी
होते पण जिभेमुळे झालेली जखम
कधीच बरी होत नाही...
शेवटचे वाक्य नक्की वाचा !!!
======
🌹देव प्रत्येकाच्या घरी जाऊ
       शकत नाही म्हणून त्याने
          निर्माण केली
            👉 *'आई'*👌
     
    🙏माझे पहिले प्रेम *आई*🙏