Showing posts with label Bodhkatha. Show all posts
Showing posts with label Bodhkatha. Show all posts

नक्की वाचा

गरूडभरारी म्हणजे काय ?

गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.

ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे.
🎭
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला..!!
🙏👌खुप छान पोस्ट👌🙏

It's Fact

👌👌👌👌
👉तीन मित्र S.T. बस मधून जात असतात     👈   

बस थांबते🚌

तिघेही मित्र बस मधून उतरतात 👬
बस 10 मीटर पुढे जाते तितक्यात
गाडीवर दरड कोसळते 
😞😞😞😞
बस मधील सगळी माणसे मरतात

👉पहिला मित्र ----  *नशीब आपण इथेच उतरलो , नाहीतर आपण पण मेलो असतो....!*👈

👉दुसरा मित्र..... *हो रे खरंच*👈

👉तिसरा मित्र ----- *नाही रे जर आपण इथे उतरलोच नसतो तर बस इतक्यात आजून पुढे गेली असती आणि सगळे वाचले असते...*👈😘😘😘

*It‘s a fact...*

👉*विचार चांगलाच करा.... तुम्ही जसा विचार कराल तसच तुम्हाला जाणवेल.*
*आवडलं तर नक्की शेअर करा*👌🏻👈

🌿🌿🌿🌿🌿

Life Management

तरुण रामस्वामी अचानक वारला. त्याचे आई वडील, पत्नी व नऊ वर्षाचा मुलगा त्याच्या शवाजवळ  रडत बसले.
ते सर्वजण एका साधू पुरूषाचे भक्त होते. ज्याना ते महाराज म्हणत असत.

महाराजाना रामस्वामीची दुखःद बातमी कळताच ते रामस्वामीच्या कुटुंबियाना भेटायला आले.

घरात प्रवेश करताच रामस्वामीॅचे पूर्ण कुटूंब रडत असल्याचे पाहिले. महाराजाना पहाताच रामस्वामीची बायको अजून जोरात रडू लागली.
दुखाःने म्हणाली, महाराज, हे
तरुण वयात आम्हाला सोडून गेल आता माझ्या मुलाच कसे होईल?
याना परत आणा. त्याना परत आणण्यासाठी मी काही क़रायला तयार आहे.

महाराजानी पत्नी व वृध्द आई वडिलांचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला पण रामस्वामीच्या अकाली मृत्यूचा आघात पचविणे त्याना जड जात होते.

शेवटी महाराज म्हणाले, ठिक आहे, मला पंचपात्रभर पाणी द्या. ते शवाजवळ पंचपात्र घेवून बसले
ते म्हणाले, "ज्याला कोणाला रामा जिवंत व्हावा असं वाटते त्याने पंचपात्रातील पाणी प्यावे. रामा जिवंत होईल पण पाणी पिणारा मरण पावेल"

स्मशान शांतता.!

"चला, तुम्हीच म्हणाला होता ना की, रामा कुटुंबातील एकुलता एक कमविता आहे? त्याच्या ऐवजी कोण मरायला तयार आहे? ही एक आदलाबदलीची चांगली संधी आहे, हो ना?"

रामाची बायको व वृध्द आई एकामेकीच्याकडे पाहू लागल्या. वृध्द वडिल रामाच्या मुलाकडे पाहू लागले. पण कोणी पुढे येईना
महाराज वडिलाना म्हणाले, बाबूजी, तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या मुलासाठी देत नाही का?
बाबूजी म्हणाले, "माझ्या पत्नीची
जबाबदारी माझ्यावर आहे. मी मेलो तर तिच्याकडे कोण पाहिल? मी नाही आयुष्य देवू शकत."

महाराजानी प्रश्नार्थक मुद्रेने वृध्द आईकडे पहात विचारले, अम्मा?
अम्मा म्हणाली, "माझ्या मुलीचे पहिले बाळंतपण आहे. ती आता येणार आहे. मी मेले तर मुलगी व होणार्‍या बाळाला कोण पाहिल? तुम्ही रामाच्या बायकोला का विचारीत नाही?”

महाराजानी हसून रामाच्या तरुण पत्नीकडे पाहिले. ती अश्रूने भरलेले डोळे विस्फारुन म्हणाली, "महाराज, मला माझ्या मुलासाठी जगले पाहिजे. मी मेले तर त्याला कोण? कृपा करुन मला हा त्याग करायला सांगू नका..”

महाराजानी रामाच्या मुलाला विचारले, "बाळा! तू तुझे आयुष्य वडिलाना देण्यास तयार आहे?"

मुलगा काही बोलायच्या आत त्याच्या आईने मुलाला ओढून छातीजवळ धरून म्हणाली, महाराज, तुम्हाला वेड लागलय?
माझा पोरगा फक्त नऊ वर्षाचा आहे. त्याने अजून पुरेसं जग पण पाहिलं नाही. तुम्ही त्याचा कसा विचार करु शकता?"

महाराज म्हणाले, "बहुतेक याचा अर्थ तुम्हा सर्वांची या जगात काही ना काही कारणासाठी जरुरी आहे. रामाच एकटा बिन कामाचा होता म्हणून देवाने घेऊन जाण्यासाठी त्याची निवड केली. तरी आता त्याचे अंतिम संस्कार करायला सुरवात करायची का? आधीच ऊशीर झाला आहे”

एवढे बोलून महाराज निघून गेले.

*जोपर्यत जीवंत आहात प्रेम तोपर्यंतच.*
*त्यानंतर फक्त आनंदी क्षणाच्या आठवणी..!*

"संकट समयी प्रामाणिक व श्रीमंतीत साधे रहा. अधिकार असताना समंजस व रागावलेला असताना शांत रहा.
*This is called the life management*

गुण

एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात. ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात. बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो. डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो. मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो.
"नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय."
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो.
बॉस : "बोला"
"काही नाही. तुमच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्टच्या जागेसाठी मलाही यायचंय."
बॉस : "मग प्रॉब्लेम काय आहे ? इथे मुलाखती सुरू आहेत. तुम्हीही येऊ शकता"
"तेच तर न सर, मलाही यायचंय पण ट्रॅफिक जाममध्ये अडकली आहे. पोचायला उशीर होतोय:"
बॉस : "ओके ओके, या तुम्ही"
*
इकडे मुलाखत सुरू राहते. अजून एकदोन मुलाखती होतात . पण बॉसच्या कानात त्या स्वरदाचा आवाज गुंजत असतो.
दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा फोन येतो.
"सर, ट्रॅफिक कमी झालेय मी निघाली आहे. पण प्लिज सर उशीर झाला तर समजून घ्या"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या"
*
पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो. खरेच किती सौजन्यशील मुलगी आहे. फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुगध होतोय. हीच मुलगी परफेक्ट आहे रिसेप्शनिस्ट म्हणून !!
तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात. पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो. कारण त्याच्यासाठी "स्वरदा" फिक्स झालेली असते. इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो.
"सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे. पण गाडी लावायला जागा नाहीये. मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळतेय का पाहून येतेय. सर प्लिज, त्यामुळे थोडा उशीर होतोय. प्लिज प्लिज"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही सावकाश"
*
आता बॉसला तिला भेटायची, पाहायची उत्सुकता लागून राहते. इतक्या मंजुळ आवाजाची मुलगी, नक्की कशी असेल ? म्यानर्स तर चांगले आहेत. नक्की हिलाच घेऊया.
*
अजून सात आठ उमेदवार शिल्लक असतानाच एक चिट्ठी घेऊन शिपाई केबिनमध्ये येतो. चिट्ठीवर लिहिलेले असते.
"सर, मी स्वरदा, आलेय तुमच्या ऑफिसमध्ये"
बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवूंन तिला लगेच आत बोलावतो.
स्वरदा आत येते. आणि sssssss
बॉस एकदम दचकतो. दारात एक सावळी (जवळपास डार्कच कलरची, थोडीशी ग्रामीण ढंग वाटावा अशी "स्वरदा" उभी असते. बॉसचा भ्रम निरास होतो. त्याच्या अपेक्षेत तिची प्रतिमा जरा वेगळीच (आणि सुंदर वगैरे) असते.
स्वरदा बोलू लागते.
"सर, मला माहीत आहे. तुम्ही मला पाहून निराश झाला असणार. तुमच्या अपेक्षे प्रमाणे मी दिसायला सुंदर नाही. ते मलाही माहीत आहे. पण सर, मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढलीय. त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात. आपली सर्व कामे फोनवर चालतात. आणि सर फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही. हे तुम्हालादेखील माहीत आहे. आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणाचा नकार पचवलाय. यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला. आणि ठरवून तुमच्याशी मुद्दाम आधीच तीनचार वेळा फोनवर बोलत राहिले. माझे जे मेन qualification आहे तो आवाज तुम्ही ऐकला. म्हणून तर बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलावलेय. आता निर्णय तुम्ही घ्यायचाय सर"
**
दोन मिनिट निशब्द शांतता.
बॉस : "ते ठीक आहे. पण तरी इथे इतर स्टाफ वेगळ्या स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यांना तू आणि तुलाही ते ऑकवर्ड होईल. त्याचे काय ?"
स्वरदा : "मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते. तुमचे लग्न झाले असणारच. विचार करून पहा सर,. तुमच्या १००% अपेक्षेसारखी पत्नी आहे का ? पण तरी तुम्ही सुखी होताच न. कारण सहवासाने समोरच्यामधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही सर. तसेच इथल्याचे होईल"
*
तात्काळ बॉसने ड्रॉवरमधून अपॉईंटमेन्ट लेटर काढले, त्यावर सही केली आणि म्हणाला,
"उद्या सकाळी तू रिसेप्शन टेबलवर मला दिसली पाहिजेस. गुड लक"
आपल्यात उणीव आहे, किंवा आपण कशात तरी कमी आहोत, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. दुसरा असा एकतरी गुण नक्की असेल जो तुम्हाला विजयी करेल. यशस्वी करेल. त्या "एका" गुणांचा शोध घ्या. नक्की सुखी व्हाल

Ek Mhatari

*बोधकथा*

एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती .
आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत .

एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .
ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .
अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.
म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला.
प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.

शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*

प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.
असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.

आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना
तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी *विजेचा कडकडाट* होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच *भस्मसात* झाले.

*तात्पर्य :-*

*एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे* आजही चार पापी माणसं जगु शकतात. 
पण त्याने *साथ* सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.

म्हणून *पुण्याचा वाटा* नेहमी घेत रहा.
ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार.
🌹

ध्येय साध्य

💕🐬💕🐬💕🌹💕🐬💕🐬
       
                   *🌹ध्येय🌹*

       शाळेच्या बाहेर पाऊस पडत होता. वर्गामध्ये शिक्षकांचा तास चालू होता. तेव्हा शिक्षकांनी मुलांना एक प्रश्न केला,"जर मी तुम्हाला  प्रत्येकी १००-१००रु देऊ केले तर तुम्ही त्या पैशाचे काय कराल?"
     त्यावर कुणी म्हटले की आम्ही विडीव्हो गेम घेऊ. कुणी सांगितले की क्रिकेट बॅट घेऊ. काही मुलींनी सांगितले की आम्ही बाहुल्या घेऊ. कुणी सांगितले की आम्ही चाॅकलेट घेऊ. असं असताना एक मुलगा काही तरी विचार करताना आढळला त्याला त्यानीं विचारले," तू काय करणार आहेस या १००रु चे ?"
     त्या वर तो मुलगा म्हणाला, "सर, माझ्या आईला थोडं कमी दिसतं म्हणून माझ्या आईला मी या पैश्याचा नवीन चष्मा घेऊन देईन." सरांनी त्याला विचारले," तुझे बाबा नाहीत का ? तू चष्मा घेऊन देत आहेस ? वडील आईला चष्मा घेऊन देतील की ! तू का बरं तुझ्यासाठी काही नाही घेतं या पैश्याचं ?"

     त्यावर त्या मुलाने खिन्न स्वरात उत्तर दिले.ते उत्तर ऐकून शिक्षक जागीच स्तब्ध झाले. त्यांचे मन त्याचे हे उत्तर ऐकून भरुन आले.तो बोलला," सर, माझे वडील आता या जगात नाहीत.माझी आई लोंकांचे कपडे शिवून मला शिकवते आणि आता हळुहळु तिला कमी दिसायला लागले आहे. तिला आता कपडे शिवताना डोळ्यांचा ञास सहन करावा लागत आहे.ती कपडे बरोबर शिऊ शकत नाही. म्हणून मला तिला चष्मा घेऊन द्यायचा आहे कारण मी चांगला शिकू शकेन आणि मोठा माणूस बनून माझ्या आईला कायम सुखात ठेवु शकेन."

    त्यावर सर खुश होऊन बोलले," मला तुझे विचार अमुल्य वाटले." त्यावर त्यांनी त्याला आपल्या जवळचे १०० रु दिले आणि म्हणाले,"हे माझ्या वचनानुसार १०० आणि हे आणखी १००रु उधारी. जेव्हा तू स्वतः कधी कमवून आणशील तेव्हा मला परत कर. माझी ईच्छा आहे की तू खूप मोठा माणूस बन. त्या वेळी तुझ्या डोक्यावरुन माझाहात फिरु दे. मग मी धन्य झालो...."

     गेल्या १५ते १६ वर्षा नंतर बाहेर असाच पाऊस पडत होता.  वर्गात तास चालु होता.आणि अचानक शाळेसमोर जिल्हाधिकाऱ्यांची गाडी येऊन थांबते.शाळेतील सर्व स्टाफ सावधान होतो. शाळेत सगळीकडे शांतता पसरते.
आणि.... एक दृष्य पाहून सर्वच थक्क होतात. एक जिल्हाधिकारी एका वृध्द शिक्षकापुढे वाकून पायावर डोके ठेवतोे आणि विचारतो," ओळखलंत का सर मला, मी तुमचा विद्यार्थी. तुमचे घेतलेले उधार१००रु परत करायला आलो आहे."
     शाळेचा स्टाफ स्तब्ध होऊन पाहत होता.त्या सरानीं वाकलेल्या नवजवान अधिकाऱ्याला उठवलं आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन भरभरून रडू लागले. तो अधिकारीसुद्धा गळ्यात गळा घालून रडू लागला आणि डोऴे पुसत म्हणाला ..
*"सर,आम्ही तुमच्या दिलेल्या आत्मविश्वासाच्या आणि मेहनतीच्या पाठावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केलं आणि आमचं भाग्य फळाला आलं. सर असेच् आशिर्वाद असु द्या..!!"*

*धन्य ते शिक्षक व धन्य तो विद्यार्थी !*
    *🌺🐬      🐬🌺*
            🌹🌹🌹🌹
                    🙏🏻

Amchi bhuk evdich

*Shrawni Agarbatti*
🌿

गणपतीचा आदला दिवस. सगळीकडे मांडव पडलेले. रामेश्वर चौक, तुळशीबाग, नेहरू चौक, बाबू गेनू रस्ता, मंडई  सर्वत्र माणसांचा पूर लोटलेला. गर्दी कापत मी आणि माझी मैत्रीण  विश्रामबागवाड्याकडून चालतोय. 
तुळशीबागेत शिरलो. तुळशीबाग गणपतीचा मांडव ओलांडून आम्ही फुल बाजाराच्या दिशेने निघालो. रामेश्वर चौकात पाय ठेवायला जागा नव्हती. मंडईच्या टोकापासून दगडूशेठ दत्त मंदिरापर्यंत रस्त्याच्या मध्येच कमळ, केवडा, दूर्वा विकणाऱ्यांची दुतर्फा लाईन लागली होती. धडधाकट पुरुष, तरुण, मुले खांद्यावर कमळाचे भारे घेऊन, हातात केवड्याची कणसे घेऊन हटकत होते. ऊन मी म्हणत होते.   नेहमीच्या फुलविक्याकडे शिरलो. त्याच्याशी जरा गप्पा मारल्या. तीन चार दिवसांची फुले घेतली. यादीप्रमाणे सगळी फुले घेतली होती. फक्त कमळ आणि केवडा राहिले होते. समोरच कमळ विकणारे बादलीत कमळ घेऊन बसले होते.

'कमळ कसे दिले?'
'वीस रुपये'
कुठून आवाज आला म्हणून बघितले तर खांद्यावरची बदली खाली ठेऊन एक मध्यमवयीन माणूस बोलत होता. पाच साडेपाच फूट उंची. उन्हाने पार रापलेला चेहरा. कष्टाची जात ओळखू येते खरंच असा. हाडंकाडे झाला होता. अपार दमलेला चेहरा. दाढीचे खुंट वाढलेले. चेहऱ्यावर आशा,  खांद्यावर गमछा छाप एक फडके. बादली खाली ठेऊन बाबा उभा राहिला. त्याचे ते मणके ताठ ठेवून उभे राहणे एकदम नजरेत भरले.

"दोन कमळे द्या मामा."
मामांनी बादलीत हात घातला.
"मामा तुमच्या हातांनी काढा. तुमच्या घरच्या देवाला तुम्ही द्याल तशी काढा".
मामांनी वर पाहिले. ते मनापासून हसले.
बादलीत हात घालून त्यांनी दोन टपोरी कमळे काढून दिली.
"किती झाले?"
"चाळीस"
मी हातात काढून ठेवलेले सुट्टे पैसे त्यांना दिले.

त्यांनी बादली उचलली. त्यांच्या हालचालीतून ते थकले आहेत खूप हे कळत होते. न राहवून मी त्यांना हाक मारली.
"मामा"
ते मागे वळले.
"सकाळपासून खाल्लंय का काही तुम्ही?"
ते कसेनुसे हसले
"न्हाई"
"वडापाव खाणार?"
"हो खाईन".
"चला मग".
आम्ही दोघी आणि मामा वडापावच्या शोधात निघालो. चालत चालत बाबू गेनू पार्किंगच्या दिशेने येत असता उजव्या बाजूला अलीकडे एक बऱ्यापैकी हॉटेल दिसले.  हॉटेलचा रागरंग बघून मामा दरवाज्यात थबकले.  आम्ही मामांना घेऊन आत शिरलो. एक टेबल पकडून बसलो. मामा भिरभिरल्या नजरेने सगळीकडे बघत होते.

"मामा काय खाणार?"
"काय सांगाल ते म्याडम. आम्हाला काय कळतंय इथलं"
माझ्या घशात दाटले.
"मामा जेवणार का?"
मामांनी माझ्याकडे बघितले. एक क्षण त्यांचे डोळे ओले झाले.
"जेवतो की".
"काय सांगू तुम्हाला जेवायला?"
"डाळ भात किंवा डाळ रोटी सांगा."
मामांसाठी दोन बटर रोटी आणि डाळ फ्राय सांगितले.

"मामा कुठले तुम्ही?"
"आम्ही परभणीचे"
"इकडे काम शोधताय का?"
"हो. आमची एक एकर जमीन आहे तिकडे. आम्ही तीन भाऊ आणि आमचे संसार असे एकत्र राहतो. एक एकरात तीन घरे कशीबशी चालतात. मोठा भाऊ अपंग आहे. तो तिथेच असतो."
"मग तुम्ही इकडे कुठे?"
"आम्ही माती मजूर म्हणून आलो. खड्डे खणून देतो. माती वाहतो. आता इकडे गणपती म्हणून आलो पुण्याला. इकडे खूप असतंय गणपतीचे असे सांगितले आम्हाला."
"मग कमळे कुठून आणली?"
"तिकडे खाडीतून आणली." बगलेत अंगठे घालून मामा म्हणाले, "एव्हढ्या पाण्यात शिरलो कमळ तोडायला. हनुवटीपर्यंत पाणी लागले मग थांबलो.  आठ वाजल्यापासून कमळ इकतोय."

माझा आवाज बंद. संभाषण अडकलेच.

"इथे कोण कोण आलाय?"
"बायको आणि सून आलोय. बाकीचे घरचे पण असेच कुठे कुठे गेलेत मजुरीला."
"मग तुम्ही राहता कुठे इथे?"
"जागा मिळेल तिथे. कधी फूटपाथवर झोपतो. कधी रेल्वे टेसनात जातुय झोपायला. बायको आणि सून पण माझ्याबरोबर तिथेच येत्यात."
"मग जेवणापुरते तरी पैसे सुटतात का नाही?"
"कधी सुटत्यात. कधी नाही. दिवसभर काम करतो. माती उचलतो.   सांजच्याला दीड-दोनशे सुटत्यात.

वेटर त्यांचे जेवण घेऊन आला. मी मामांना जेवायला वाढले. मामांनी पानाला नमस्कार केला. रोटी मोडून डाळीत तुकडा बुडवून तोंडात घातला आणि त्यांचा घास अडकला. खांद्यावरच्या फडक्यात तोंड खुपसून त्यांनी हुंदके देऊन रडायला सुरुवात केली. मी आणि मैत्रिणीने एकमेकींकडे बघितले. दोघींचेही डोळे भरून आले होते. मी मामांच्या हातावर थोपटले.
"मामा भरल्या ताटावर रडू नये. जेऊन घ्या."
"आज तुम्ही भेटला म्याडम. कोणाला काय पडलंय हिते? सकाळधरुन घसा सुकला. थांबलो तर विकले जाणार नाही कमळ म्हणून तसाच फिरतूय बगा"
"जेऊन घ्या मामा."

मामांनी डोळे पुसले. त्यांनी जेवायला सुरुवात केली. दुसरी रोटी झाल्यावर मी विचारले.

"मामा अजून रोटी सांगू का?'

"नको म्याडम", मामा पोटावर हाताने थोपटून म्हणले, "आमची भूक एव्हढीच असतीय बगा".

सुरीने नस कापावी तसा या वाक्याने काळजावर चर्र्कन खोल चरा उठला.

"बरं मग बायको आणि सुनेचे काय?"
"आता माझे खायचे पैसे वाचले. त्यात त्यांना खायला घालतो."
आम्ही उरलेली डाळ, भात, चार बटर रोटी आणि अजून एक डाळ असे पार्सल करून मामांबरोबर दिले.
"मामा गरम आहे. गेलात की लगेच खाऊन घ्या."

बोलता बोलता बिल देऊन आम्ही हॉटेलच्या दारात आलो. ध्यानी मनी नसताना अचानक मामा आमच्या पाया पडले. आम्ही पटकन मागे सरकलो. 
"मामा आम्ही लहान. आमच्या पाया नका पडू. आशीर्वाद द्या."
"भले करेल माउली तुमचे" असे म्हणून मामा डोळे पुसत वळले आणि गर्दीत मिसळले.

हॉटेलचा स्टाफ, बाकीचे कस्टमर आमच्याकडे बघत होते. एकदोन कौतुकाच्या नजराही त्यात होत्या.

आमचे मात्र आवाज बंद होते. गाडी काढून घरी येईपर्यंत आम्ही दोघी शांत होतो. काय म्हणायचे होते त्याला ते आम्हाला उमगले होते.

हे सगळे लिहायचा उद्देश मात्र सुविचार इत्यादी नाहीये. या गोष्टीला आज तीन आठवडे तरी झाले असतील. पण कुठेतरी जे तुटलंय ते सांधले गेलेले नाहीये अजून. यात आम्ही काही फार मोठे केले त्या दिवशी असेही खरंच नाही. आमच्या सणाला काम करून चार पैसे मिळतील म्हणून त्याचे सण आणि घरदार सोडून आलेल्या माणसाला मी, 'तुमच्या घरच्या देवाला तुम्ही जशी कमळे काढाल तशी द्या' म्हणते, इतकी मुर्दाड मी झाले याची माफी कुठे मागायची ते कळत नाहीये खरंच.पण जे झाले ते मनात रुतलंय ठाम.

आमची भूक एव्हढीच असतीय बगा या वाक्याचा घाव फार मोठा आहे. आत्तासुद्धा हे वाक्य लिहिताना माझे डोळे भरून आले आहेत. आज त्यांच्या भुकेची सोय आमच्या दोघींच्या हातून झाली. पण त्यांच्या उद्याचे काय ह्या प्रश्नाने पोटात पडलेला खड्डा भरून येत नाहीये. असहाय्य राग सुद्धा नाहीये. 

मामांसारखे   किती   लोक देशोधडीला लागले असतील कुणाला ठाऊक?      

बगलभर पाण्यात उभे राहून, कमळ तोडून दिवसभर कोरड्या घशाने पळून पळून शंभर रुपयांसाठी टाचा झिजवणाऱ्या माणसाबरोबर वीस रुपयांसाठी घासाघीस करणारेही बघितले त्या दिवशी. नाटके करतात हो असेही म्हणणारे आहेतच की.

पण आज जेवायला बसले की एखादा घास तरी अडतो. कानात तोंडात फडके कोंबून दिलेले हुंदके ऐकू येतात. डोळे भरतात.

आपली भूक केव्हढी ते कळते.

आणि हाच सल जात नाहीये, जाणार नाही म्हणून लिहावे लागले....