Showing posts with label Great lines Ever. Show all posts
Showing posts with label Great lines Ever. Show all posts

सतत आनंदी राहण्यासाठी. . .

🙏  हॅपी थाॅट्स 🙏 ✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच-दहा वेळा मनाशी म्हणा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा. स्वत:बद्दल कमी बोला.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* दर दोन दिवसांनी एखादे गुलाबाचे फूल आणा व त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये योग्य स्थान द्या.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* आवडते गाणे पुन: पुन्हा ऐका व गुणगुणत राहा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वत:जवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन-चिंतन करा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्याच्यासारखेच होऊन वावरा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या. दीर्घ श्वसन करा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* स्वत:च्या चांगल्या पेहरावातील हसर्या चेहर्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* एखादी बाग, देऊळ, नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत 10-15 मिनिटे घालवा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या संभाषणात करा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* चार वर्षांचे बालक दिवसात साधारणत:500 वेळा हसत असते तर एव्हरेज मनुष्य जेमतेम 15 वेळा. यामुळे स्ट्रेस वाढत जातो. याकरिता अधिकाधिक आनंद व्यक्तकरण्याची संधी निर्माण करा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* शरीरातील 83 टक्के संवेदना या डोळ्यांच्या माध्यमातून होत असपतात. याकरिता भोवतालाचे वातावरण प्रसन्नपूर्वक व प्रकाशयुक्त ठेवा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* रिकामे मन सैतानाचे घर असते. त्याकरिता स्वत:ला आवडत्या छंदामध्ये गुंतवा. सतत काहीतरी करत राहा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* संगीतामध्ये उत्साह जागृत करण्याची शक्ती आहे. रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* चिडचिडेपणा, डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव उखडून टाका. मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* विनोदाला जीवनात महत्त्वाचे स्थान द्या. कोणत्याही वातावरणात मोकळेपणा आणण्यास तो मदतगार ठरतो.

*दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर.....*

*घड्याळ म्हणते काळाची पाऊले  ओळख......*

*खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव दुनियेचे भान ठेव...*

*देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप......*

*छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव*

*पण जमीन....म्हणते पाऊले मात्र माझ्यावरच राहू देत.....*

   *माणस जोड़णे हाच आमचा धर्म*

Beautiful messages in Marathi

👌👌Beautiful Msg 👌👌

कंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर..... 👌👌

अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी... 👌👌

वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य.... 👌👌

एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास... 👌👌

सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता... 👌👌

स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया.... 👌👌

हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम... 👌👌

इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री...👌👌

स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव....👌👌

मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण.....👌👌
"🌹माझं" म्हणून नाही.
''आपलं'' म्हणून 'जगता' आलं पाहिजे...
'जग' खुप 'चांगले' आहे. फक्त .........''चांगले वागता'' आलं पाहिजे..!!🌹      
      🍂😊  😊 🍂
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁