वाचताना अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता... खुप खुप छान लिहिलीय...
.
.❣❣❣❣❣
नक्की वाचा.
💝💘💝💘💝💘💝
"साद आईची"
.
.🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
.
.🏵🏵🏵🏵🏵
भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
.
.⚜⚜⚜⚜⚜⚜
पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा
.
.☯☯☯☯☯☯
तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
.💟💟💟💟💟💟💟
.
शेवटपर्यंत सांगत होता,
लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
.
.💝💝💝💝💝💝💝
माझ्याही ह्रदयात फोटो,
तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.
.
.💘💘💘💘💘💘
दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
.
.💖💖💖💖💖💖
वर्षाकाठी एक कपडा,
पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला..
.
.💗💗💗💗💗💗
हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.💓💓💓💓💓💓💓
धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
.
.💞💞💞💞💞💞
नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
.💕💕💕💕💕💕
.
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.❣❣❣❣❣❣
थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
.
.💜💜💜💜💜💜💜
विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं "कुलभूषण"
पोरकी मी का झाले?
.
.💚💚💚💚💚💚💚
आता माझ्या थडग्यापाशी
"आई" म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.
💛💛💛💛💛💛💛
साद आईची
*वेडी ही बहीणीची माया*.....
भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.
जरुर वाचा आणि मित्रांना पाठवा...
माणसांच्या गर्दीत
हरवून बसला माझा भाऊ
सांगा ना त्याला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......
एकुलता एक दादा
त्याला जिवापाड जपला
लग्न झाल्या पासून
वाहिनी च्या पदरा आड लपला
एक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ
सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......
नको दादा साडी मला
नको पैसा पाणी
तुझ्या सूखा साठीच
देवा ला करते विनवणी
सांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ....
काम गेलं तुझ्या दाजीचं
म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते
तळ हातावरले फोड बघून
तूझी आठवण येते
दादा चढउतार होतात जीवनात
तू घाबरुन नको जाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...
उचलत नाहीस फोन म्हणून
वहीनीला केला
Wrong नम्बर करत
कट त्यांनी केला
नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...
आई बाबा सोडून गेले
घर पोरकं झालं
आठवणींचे आभाळ
डोळ्यामधी आले
वाईट वाटते शेजारी येतात जेव्हा त्यांचे भाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ....
नको मला जमीन
नको घराची वाटणी
आवडीने खाईन
भाकरी आणि चटणी
काकूळती ला आला जीव
मनात राग नको ठेऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ .....
😔😔😔😔
आवडली तर नक्की शेयर करा
....🙏 कवयित्री बहिनाबाई चौधरी)
राग सोमवारी आला तर...
त्याला सांगा की...
आज आठवड्याची सुरुवात आहे, आज नको येऊस
राग मंगळवारी आला तर…
म्हणा…
आज मंगलदिन आहे, मग
आज अमंगल कशाला...?
राग बुधवारी आला तर...
त्याला म्हणावं…
बुध तर शुद्ध असतो.
त्यादिवशी हे अशुद्ध कशाला
राग गुरुवारी आला तर …
म्हणा…
आज गुरूचा दिवस आहे,
मन शांत राहू दे…
राग शुक्रवारी आला तर....
म्हणा…
आज देवाला शुक्रिया अदा करण्याचा दिवस,
आज कशाला येतोस...?
राग शनिवारी आला तर...
म्हणा…
शनीच्या दिवशी तुझी पीडा कशाला...?
नकोच येऊस तू...
आणि
राग रविवारी आला तर ...
म्हणा.…
आज तर येऊच नकोस.
आज रविवार आहे.
म्हणजे सुट्टीचा दिवस.
😃नेहमी आनंदात राहा.
हसत राहा😊😃😄😀
आणि हो,.....
कधी रागावू नका...
💐💐शुभ सकाळ 💐💐
का असा माझा अचानक कोरडा श्वास झाला,
माझ्याच सावलीचा मजलाच भास झाला....
बंध बांधतो विश्वासाचे माणुस जोडण्या,
स्वार्थ संपला अन् पोरका विश्वास झाला....
माणसेही नेक होती मिळून सर्व एक होती,
वाटत आता ते स्वप्न होते की आभास झाला.....
असो काही झालं गेलं न्यात्यांची त्यात होती ओल,
क्षणीक क्षणभंगुर पण नष्ट तो गोड सहवास झाला.....
असे सहज झाले आता श्वासांचे होणे ओले कोरडे,
माणसांच्या माणुसकीचा मजला अभ्यास झाला.....
श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा
7875031852
बरोबर ना मित्रहो? ???????
😊😊😊
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺
.
.
आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺
.
.
खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही☺
.
.
गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे☺
.
.
.
सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺
शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई☺
वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !☺
आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺
स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले☺
क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले☺
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ☺
आजच्या मोठ्या income मध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही...!☺
आजच्या फोर व्हीलर long drive .
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whats app chatting ला नाही...!☺
.
.
गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माझे ओघळून गेले |☺
.🍁life is very critical.🍁🌷🌷😌😌
Bonus Kavita
💵💴💶💷💰💳💵💴💶
न झालेल्या बोनसमुळे वैतागलेल्या नव-याने आपल्या पत्नीला लिहिलेली कविता....
(पत्नीने घरखर्चात व डामडौलात काटकसर करावी यासाठी पतीचा हा अट्टाहास)
👚👗👕
"लाडके" कशासाठी गं तू
नवे नवे "कपडे" शिवतेस?
अगं.. जुन्या साड्यांमध्ये
तर तू "अप्सरा" दिसतेस!
💄👡💇
ब्यूटी पार्लरच्या चक्रात
खरोखर तू पडू नकोस
चंद्रासारख्या सुंदर शीतल
चेहऱ्याला तू कुठलीही
क्रीम लेपू नकोस!
🍎🍊🍏
अगं सफरचंदासारखे
गुटगुटीत गोरे गाल तुझे
पावडर क्रीमची गरज काय
एकदा सखे ऐक माझे!
🍲🍛🍪
हॉटेलच्या जेवणामध्ये
अशी कुठली चव आहे?
तुझ्या हातच्या स्वयंपाका
राणी "अमृताची" चव आहे!
💃💪🏃
"धुणीभांडी"वाल्यांच्या नादाने
तब्बेत नको खराब करू
हातात झाडू घेवून आता
दोघेही कसे व्यायाम करू!
💍🏅🔶
सोने चांदीचे अलंकार
कुरुपांसाठी बरे आहे
निसर्गसुंदर रुप तुझे
सोन्यापेक्षाही खरे आहे!
💶💰💴
"पैसापैसा" करू नकोस
तो तर "मोहलक्ष्मी" आहे
माझ्या घरच्या अंगणाची
तू खरी "धनलक्ष्मी" आहे!
💁🍆🍅
जेवणात तीन तीन भाज्या
काहींची सवयच ही प्यारी
एकाच तुझ्या भाजीला
प्रिये चव असते न्यारी!
💰👨👩👦👦🙋
राज्याच्या आर्थिक संसाराचे
शासनाचे तोकडे ग्यान आहे
कमी खर्चात घर चालवण्याचे
तुझ्याकडे खरे ज्ञान आहे
👹🌸🙂
नको बोलावू माहेरच्यांना
हे गाव भुतासारखे काटते
सुटीत जावू तुझ्या माहेरी
तिथे स्वर्गासारखे वाटते!
😌☺🙆
कुणा कशाचा तर
कुणा कशाचा अभिमान आहे
बायकोच्या काटकसरीचा
मला खरा स्वाभिमान आहे!
(कवी- न झालेल्या बोनस मुळे वैतागलेला नवरा...)
💴💶💵💸💳💰💷💴💶
व. पु. .... एक कविता...
लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस
लग्नानंतर मात्र राहत नाही,
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.🤗
मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो..😉
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.
आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं 🙃
त्याचा तो गबाळा अवतार..
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे..😊
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.
लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.😜
ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
असं प्रत्यक्षात घडत नाही.😃
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.
तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,
गच्चीत वाळत घालायला.😀
त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते,
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते.😄
आपली बायको म्हैस आहे,
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो😃
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.
-व. पु.
प्रत्येक नवरा बायकोने वाचावी अशी धमाल विनोदी कविता.😃😃
लग्नात त्याने प्रथमच तिचा हात हाती घेतला आणि मग त्याला आलेला अनुभव आणि त्याचा हातांचा पहिल्यांदा होणार स्पर्श ह्या अश्या सुंदर क्षणाला कवितेत गुंफण्याचा प्रयत्न केलाय !!
चुंबने कोवळ्या तळहातांची
आलिंगने लाजऱ्या बोटांची
हात तुझा सखे घेऊन हाती
भर्जरी स्पर्शाची जणू अनुभूती
झंकारती हळवी स्पंदने
तळव्यांच्या मधुमिलने
बरसती शहाऱ्यांच्या सरी
आषाढातील धुंद घनापरी
हात तुझा सखे घेऊन हाती !!!
लवचीक मनगटांवरी रुंजी
कुजबुजल्या कापऱ्या कांकणांची
अधीर निश:ब्दाची गुंजती
स्वरझंकृत नवथर गाणी
हात तुझा सखे घेऊन हाती !!!
मधु दवात तृप्ततेच्या
हस्त रेषाच विरघळल्या
दव भिजल्या तळव्यांवरी
रेशीम आठवणी लालकेशरी
हात तुझा सखे घेऊन हाती
भर्जरी स्पर्शाची जणू अनुभूती
जिवणीतुनि निथळती
विस्मयीत लाजरे मोती
गंधीत उसास्यांनी न्हाहली
ओठांवरली तीळ चांदणी
हात तुझा सखे घेऊन हाती
भर्जरी स्पर्शाची जणू अनुभूती !!!!
आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.
मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.
बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतो
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतो.
त्याला कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतो
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतो.
तुमचा शब्द तो कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.
तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
तुमच्यासाठी गिळत असतो
नामुष्कीची अवघी लाळ.
तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबा खचत असतो
आधार देता तरी
मान मारून हसत असतो.
तुमच्याकडूनं तसं त्याला
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्याचं
अवघं पोट भरत असतं.
त्याच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाही
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाही.”
त्याच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.
एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल
तेव्हा म्हणाल, “ आपला बाबा
खरंच कधी चुकत नव्हता
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होता.”
तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.
आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..
👪 आजच्या जागतिक कुटुंब दिवसाला सुंदर सलामी 💐💐🌹🌹🙏🙏
तू अनोळखी, तरी ओळखीची..
असुनी दूर, का जवळची....
पाहिले न तुजला कधी
माझी परी तू सावली..
शोधितो मीच मजला
का देहात अशी सामावाली..
बोलणे लटके तुझे
का, कसे हटके असे
मोकळा होवुनी गुंततो मी
का, मन झाले वेडेपिसे...
सांग ना ग कोण तू
बहरले का ऋतू
गंध तू कुसुमातला
का कस्तुरी सुवास तू..
डोळ्यांतली आस तू
का खुळी प्रीत तू..
अनोळखी, का ओळखीची
गूढ सखे हे खोल तू....!! —
आपल्या बापाचं काय जातं
असं म्हणणारी एक जमात आहे.
रस्त्याला पडलेला मोठा खड्डा असो
किंवा नाक्यावर चालणारा दारूचा अड्डा असो
माझ्या घराला कुंपण आहेच
आपल्या बापाचं काय जातं.
रस्त्यावर लहानगं पोरगं भिक मागतं
माझं पोरगं इंग्लीश शाळेत जातं
आपल्या बापाचं काय जातं.
मोर्चे निघतात बंद पुकारतात
जाळपोळीत सारे निरपराध मरतात
मी दारे खिडक्या लावून असतो
आपल्या बापाचं काय जातय.
दिवसा ढवळ्या कळ्या कुस्करल्या जातात
बलात्काराच्या बातम्या रोजच झळकतात
सकाळच्या चहा सह मी वाचत असतो
माझ्या आया बहिणी सुरक्षित आहेत
याच भ्रमात मी नांदत असतो
आपल्या बापाचं काय जातय.
रोजच शेतकरी शेतात राब राब राबतो
धान्याला भाव मिळत नाही म्हणून
शिवारातल्या झाडाला लटकतो
माझ्या घरी वाण्याकडून धान्य घरपोच होतय
आपल्या बापाचं काय जातय.
शेजारीच कुणीतरी मरण भोगत असतो
माझ्या दारावरचं तोरण मी आनंदाने पहात असतो
आपल्या बापाचं काय जातय.
दहशतवादी हल्ले रोजच होतात
जवान आपले नाहक मरतात.
मी आपला श्रद्धांजली वहातो
हुतात्मा होणं फक्त त्यांचंच कर्तव्य समजतो
आपल्या बापाचं काय जातय.
आपल्याच बापाचं खूप काही गेलेलं
कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो.
आपल्याच घरचा वासा नकळत जळालेला असतो.
शैलेन्द्र
*"जेवण आणी राशीचे स्वभाव'*
थोडेसेच जेवण का असेना
*मेष* आवडीने खाणार..
गरम, चमचमीत पदार्थांवर
यांची पहिली नजर जाणार.. ।।१।।
*वृषभे*ची व्यक्ती दिलखुलास पणे
दाद देऊन जाते..
लोणची-पापडासारखे पदार्थही
अगदी चवीचवीने खाते.. ।।२।।
कधी मारुनी मिटक्या,
कधी नन्नाचा चाले पाढा..
*मिथुना*चे कौतुक मधाळ
तर टीका कडवट काढा.. ।।३।।
'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणत
*कर्के*चे होते पूर्ण जेवण..
रुचकर पण थंड अन्नही हे
कसे पटकन करतात सेवन? ।।४।।
राजस जेवणाच्या *सिंहेचा*
केवढा राजेशाही थाट..
थोड्याथोड्या सर्वच पदार्थांनी
यांचे भरुन जाते ताट.. ।।५।।
'कमी-जास्त नाही ना?'
याची उगाच बाळगून भीती..
इतरांकडे पाहून ठरते
*कन्येची* जेवायची नीती.. ।।६।।
भात-भाजी-आमटीबरोबर
पचतील तेवढ्याच पोळ्या..
अशा संतुलित आहारानंतर
*तूळ* खाते पाचक गोळ्या.. ।।७।।
काही Missing आहे का
कधी कळतही नाही..
साधे नेहमीचेच जेवण
पण *वृश्चिकेला* रुचत नाही.. ।।८।।
कधी पटपट-झटपट जेवण
तर कधी अगदीच वेळकाढू..
*धनू* काढत नाही जेवताना खोड्या
पण वेळ मिळताच संधीसाधू.. ।।९।।
ना कधी कौतुक
ना कसली नकारघंटा..
गपगुमानं जेवतो *मकर*
करत नाही कधी थट्टा.. ।।१०।।
निश्चित वेळ जेवणाची
पार्टी असो वा एखादे लग्न..
*कुंभेची* चिकित्सक वृत्ती
नेहमी रेसिपी जाणण्यात मग्न.. ।।११।।
कधी-कुठेही जमते
*मीनेची* खाण्याशी गट्टी..
पोटभर खाताना घेतात
'डाएट' नावाशी कट्टी.. ।।१२।।
😄😋आहे ना गंमत ! 😛😋
स्वतःची रास तपासून बघा😝😝😝
💦 *पावसाचे बहुरंगी ढंग* 💦
*मुंबईचा पाऊस*
*पुरूषांसारखा* असतो.
पुरुष रागावला कि *भडभडा बोलतो*. मग *मन साफ*..
पाऊस पण *रपरपा पडतो*
*सारे साफ* होते.
😂😜😝
*पुण्याचा पाऊस*
*बायकांसारखा*
त्या चिडल्या कि *धड स्पष्ट बोलत नाहीत*. नुसती दिवसभर *पिरपिर* चालु.
पाऊस पण *धड रपरपा पडत नाही*
*दिवसभर पिरपिर रिपरिप भुरभुर चालु असते*...
😂😳😝
*विदर्भाचा पाऊस*
*एका प्रेयसीसारखा*..
सारखी *वाट पहायला लावणार*
*वेळ कधीच नाही पाळणार*...
आला तर प्रेयसीसारखा
*झुळूक दाखऊन भरsकन जाणार*
अन् *पुन्हा वाट पहायला* लावणार..
😨☔🙄☔😂☔
*कोकण चा पाऊस*
*लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा*
*एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो*
*माणसांच्या कविता*
कळलंच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या
संगी , मंगी , कपी , मंदी
हसायच्या फिंदी फिंदी
आणखीही बऱ्याच होत्या वर्गात
कळायचंच नाही
आम्ही वर्गात आहे की स्वर्गात
खेळायच्या बडबडायच्या ,
बागडायच्या , नाचायच्या
म्हणलं तर खूप अल्लड होत्या
त्यांच्या फ्रॉक , पोलके
चापून चोपून घातलेल्या वेण्यांसकट
त्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या ....
कळलंच नाही
वर्गातल्या मुली कुठ गेल्या
आम्ही शेण पाणी आणायचो
त्या वर्ग सारवायच्या
शाळा सुटल्यावर
वर्गही त्याच आवरायाच्या
आम्ही वर्ग झाडायचो ,
त्या बस्करं घालायच्या
आम्ही पटांगण झाडायचो
त्या सडा मारायच्या
त्या लंगडी लंगडी ,
झिम्माड फुगडी घालायच्या
सर्वांशीच मनमोकळं बोलायच्या
अभ्यास मात्र मन लाऊन करायच्या
कवितेत तर खूप खूप रमायच्या
सातवी पर्यंत गावातल्या गावात
त्या आमच्या बरोबर शिकल्या ......
कळलंच नाही
सातवी नंतर घरात
असा काही नियम नव्हता
बाहेर गावी मुलींना
कोणीच पाठवत नव्हता
शाळा सुटली पाटी फुटली
मुली बसल्या घरात
आम्ही दिवटे चिरंजीव
शिकत राहिलो शहरात
अल्पवयातच त्या बोहल्यावर चढल्या ....
कळलंच नाही
मिसुरडं फुटायच्या आतच
आम्ही मामा झालो , काका झालो
त्या आई झाल्या , मावशी झाल्या
काकू झाल्या , सून झाल्या ,
नणंद झाल्या , भावजयी झाल्या
विहिरीवर पाण्याला गेल्या
रानात गेल्या , वनात गेल्या
काही स्टोव्हवर गेल्या
काही शेगडीवर गेल्या
काही परत आल्याच नाही
काही परतल्या
पण पार करपल्या
जळालेल्या भाकरीसारख्या
व्यवस्थेच्या चरकात पिळल्या गेल्या ......
कळलंच नाही
त्या सावित्री होत्या
त्यांना एकही जोतिबा भेटला नाही ?
त्या जिजाऊ होत्या
पण एकही शहाजी भेटला नाही ?
त्या कस्तुरबा होत्या
एकही गांधी भेटला नाही ?
कुणी म्हणतं
त्या परक्याचं धन झाल्या
कुणी म्हणतं ,
निर्माल्य होऊन जीवन गंगेत
वाहून गेल्या ....
मला वाटतं
त्या नवीन प्रकारे सती गेल्या
काही असो
त्या आता दिसेनाशा झाल्या .....
कळलंच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या..
विसरलोय मी....
.
विसरलोय मी...
तिची न माझी झालेली पहिली भेट
विसरलोय मी...
जी मनात बसली होती एकदम थेट
विसरलोय मी....
तिने त्या दिवशी घातलेला अबोली कलरचा ड्रेस
विसरलोय मी....
तेव्हाचे तिचे वार्यावर उडणारे काळे केस
विसरलोय मी....
सरळ मनावर वार करणारा तिचा एक कटाक्ष
विसरलोय मी....
तेव्हाची रिमझिम पावसाची साक्ष
विसरलोय मी....
तिच चिडून मला खडूस म्हणन
विसरलोय मी....
लटक्या रागात सुद्धा प्रेमान काळजी घेण
विसरलोय मी....
दोघांनी घेतलेला वाफाळलेला चहाचा कप
विसरलोय मी....
तिने दिलेलं चाफ्याचं रोप
विसरलोय मी....
मला सतवण्यासाठी तिच मुद्दाम अबोल राहण
विसरलोय मी....
मला बोलता बोलता निशब्द करण
विसरलोय मी....
आमच्यात भांडणाच, मैत्रीच, आणि .....प्रेमाचं बोलण झालेलं
.
.
.
आणि
विसरलोय मी....
तिने मला " मला विसर " म्हटलेलं....