हटके birthday Wishes

*आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
PMVK ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, *Kokankar Avinash *
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

By Bhushan H

*रेशनिंगचे नियम*

रेशनिंग मिळणे आपला हक्क वाचा जागृत व्हा जागृती करा आणि शेअर करा                                        
     *रेशनिंगचे नियम*
रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.
बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.

बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.

रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.

ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो.

इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.

*रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही*

रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे.

आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे.

आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते.

*रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन,भाव व देय प्रमाण, उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते*.

बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.

*वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा*

*दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा*
*जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा*

*तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात*

*तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो*

दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे.

ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

*लेखी तक्रार तहसिलदार किंवा रेशन ऑफिसर यांच्‍याकडेही करता येते*

प्रत्येकाने शेयर करा👍

निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...😊

🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा.

🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.
कारण..पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही..                                       

 🔴आणि वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.."                                  

🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!

🔴मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि...राजहंस मरताना सुद्धा गातो...दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात.

🔴किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. 😊😊 😊😊 म्हणून नेहमी आनंदी राहा🤗🤗🤗🤗

*मला हि पोस्ट आवडली म्हणुन मि खास लोकांना पाठवत आहे.."      "       🤗🤗🤗🤗🤗

"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"...
*"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!!