Showing posts with label Mumbai Meri Jaan. Show all posts
Showing posts with label Mumbai Meri Jaan. Show all posts

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय?

१० रूपयाला वडापाव आणी ८ रूपयाला चाय.

आला पाहुणा घरी तर आखडून बसायच पाय.

आणायची १०० रु. किलोचे चिकन नी सांगायचे

... बोकडाच मिळतचं नाय.

अहो पगार कमी सांगुन इज्जत

गमवायची नाय.

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय?

सकाळी सकाळी 7:30 वाजता उठायच.

बिना तोंड धुता खिडकित यायच.

शेजारच्या पोरीला collegeला जाताना

हळूच म्हणायच, हाय.

तीने रागात पाहिलं तर,

म्हणायच सुंदर माझी ताय..

मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच..

राँग नंबर लागला की काय?

अहो मुंबई मुंबई मुंबई तिथं आहे तरी काय??

रिक्षाची भीड, गल्ली बोलातले रस्ते

बाइक वाल्यांची किर किर,

फेरीवाल्यांची दादागिरी,

सडलेली कोथींबीर,

कच्चा कुच्चा वडापाव,

आणि पानी पुरी खाऊन

पर प्रांतीयांनाच म्हणायचे भाय.

अहो मुंबई मुंबई मुंबई तिथेआहे तरी काय??

पाण्यासाठी पळायच, गॅससाठी रांगा

कामाला जाण्या अगोदरच

फैक्ट्रीचा वाजतो भोंगा.

धावत धावत टाकाव्या लागतात

ट्रेन मधे ढेंगा.

ट्रेन मधल्या गर्दीत

आपण असतो आतमध्ये

आणि बाहेरच लटकतात पाय..

दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय??

काही ही असुद्यात

पण करोडो कुटुंबाची पोशिंदा ती

तीच आमची ताय आणि तीच आमची माय..

आमच्या मुंबईचा आम्हाला अभिमान हाय

आहो मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय

गरिबाच पोट आणि दुधावरली साय....😄😊😊

Mumbaikar

*पुणेकरां* बद्दल बर्‍याच आख्यायिका ऐकल्या असतील. आता पहा *सच्च्या मुंबईकराची* काही लक्षणे -
*□□□□□□□□□□□□*

१. सगळे पैसे एका जागी ठेवणार नाही. थोडे पाकिटात, थोडे ह्या खिश्यात, थोडे त्या खिश्यात आणि थोडे बॅगमध्ये..

२. ऑफिसमध्ये वापरायचे बूट ऑफिसमध्येच ठेवेल. घरून ऑफिसला जाताना चप्पल किंवा दुसरेच बूट घालेल.

३. पावसाळ्याच्या दिवसात ऑफिसला जाताना काहीही विसरेल पण चुकूनसुद्धा छत्री विसरणार नाही.

४. बाळासाहेब ठाकऱ्यांसाठी मनात एक विशेष स्थान असेल. भले मत शिवसेनेला देत नसला तरी.

५. थंडगार पाणी प्यायल्याशिवाय तहान शमणार नाही. साधं पाणी एरंडेल प्यायल्यासारखं तोंड करून पिईल.

६. भरपूर वेळ हातात असला तरी समोर असलेली ट्रेन, बस जाऊ देणार नाही. सुटत असेल, तर धावत जाऊन लोंबकळेल.

७. चौथी सीट किंवा दारातल्या फूटबोर्डवरील जागा मिळाली की गड सर केल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकेल.

८. बसमध्ये 'स्त्रियांसाठी' लिहिलेल्या जागेवर बसणार नाही. बसल्यास 'ऑन डिमांड' लगेच सीट रिकामी करेल.

९. प्रत्येक पोलिस त्याचा 'मामा' असेल.

१०. सचिन तेंडूलकरला 'सच्या' किंवा 'तेंडल्या'च म्हणेल.

११. भूक लागली आहे म्हणून नाही तर वेळ आहे म्हणून खाईल.

१२. घरच्या धकाधकीतून विश्रांती मिळण्याचं 'ऑफिस' हे एकमेव ठिकाण आहे, हे त्याला फार लौकर समजलेलं असेल. त्यामुळे कितीही, काहीही होवो. पाण्यातून, गर्दीतून, घाणीतून, वाट काढत काढत ऑफिसला जाईलच. दांडी मारणार नाही.

१३. पारसी व्यक्तीसाठीही मनात एक विशेष स्थान असेल.

१४. कुणाशीही बोलताना संभाषणाची सुरुवात नेहमी हिंदीतूनच करेल.

१५. 'बस'च तिकीट लांब घडी करून घड्याळाच्या पट्ट्यात खोवून ठेवेल. कंडक्टरनी विचारलं तर पेपरमधून वर न पाहता मनगट तिरकं करून दाखवेल.

१६. चुकूनही टॅक्सीने जाणार नाही, लोकल किंवा BESTच.

१७. पत्ता विचारला तर नीटपणे आणि खरा सांगेल.

१८. एकदा कामाला भिडला की बाकी गोष्टींकडे त्याचे लक्ष जाणार नाही. बाजूला रंभा येऊन उभी राहो नाहीतर उर्वशी.

१९. शेअरबाजाराबद्दल त्याच्या मनात आदर असेल. स्वत: त्यात उतरला नाही, तरी घृणा तर निश्चितच नसेल.

२०. लोकलमध्ये शेजारच्याला धक्का न लावता व्यवस्थित फोल्ड करून पेपर वाचेल

*तर असा असतो मुंबई कर*

.           *|| कहाणी मुंबईची ||*

एक शहर आहे जगात
म्हणतात ते फार वेगळे आहे,

*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

सकाळी उठणे हे सुद्धा एक काम आहे,
रात्रीची झोप हा फक्त काल्पनीक आराम आहे,

दात घासणे, आंघोळ करणे यासाठी पुरेसा वेळ नाही,
नाश्ता करत असताना तयारी करणे यापेक्षा मजेशीर खेळ नाही,
देवासमोर एक मिनीट हिच आमची देवपुजा असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

बिल्डीँगचा गेट सोडला कि रांगांची रांग लागते,
रिक्षा बस ट्रेनचे टिकीट अगदी काहिहि कारण चालते,

रस्त्यावरून चालणारा प्रत्येक माणुस धावत असतो,
मिनीटाला शंभर पाऊले असा इथे नियम असतो,
रस्ता आपल्याच बापाचा समजून चालायचे असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

शिव्या देत शिव्या खात प्लँटफाँर्मवर पोहोचायचे असते
मुंग्यांमधली साखर शोधावी तसे मित्रांना शोधायचे असते
ट्रेनमधले मित्र मैत्रीला जागणारे असतात

एकामुळे दुसऱ्याला जागा मिळेल असे जागा अडवून बसतात
रिझर्वेशन नसुनही प्रत्येकाची जागा फिक्स असते
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

घरी पोहोचण्याचा विचारच फार आनंददायी असतो
पण पुन्हा ट्रेन बस हा विचारच मनाला टोचत असतो

आईच्या हातचा चहा हेच घरी पोहोचल्याचे समाधान
तिची सिरीयल माझी मँच यासाठी रिमोटची ताणाताण
ब्रेक वगळून एकाच वेळी तीन सिरीयल पहायची असते
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

जेवणानंतर लगेच झोप एक वाईट सवय आहे,
म्हणूनच बाहेर फेरफटका आता आमची गरज आहे,

एका तासात चाळीतल्या नव्या जुन्यांची खबर होते,
आपणही याचा एक भाग आहोत याची गोड जाणीव होते,
झोपण्यासाठी नव्हे तर सकाळी उठण्यासाठी घरी परतायचे असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

असाच हा नित्यक्रम सोमवार ते शुक्रवार असतो,
पण बाकिचे दोन दिवस आमचा दिनक्रम बदलतो,

जे पाच दिवस भेटले नाहीत असे मित्र भेटतात,
मग थिएटर, पब, बिचेस, टेरेस सगळी ठिकाणे गाजवतात,
आईला एक दिवस आराम हे बाहेर जेवण्याचे कारण असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

असा हा आठवडा त्याचेच महिने घडावे,
दिवसातील चोवीस तासही इथे कमी पडावे,

अशी हि श्रमाची बँक जिथे तक्रार काउंटर नाही,
मैत्रीचे व्याज मिळत राहते पण जास्त नोटा मात्र नाहीत,
शोधनाऱ्यासाठी सगळे आहे फक्त वेळ मात्र मिळत नसते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते. .......*                                 🚄🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃

कुठे गेले ते समाजसेवक ?
कुठे गेल्या त्या दानशूर व्यक्ती ?

थंडीत कपडे, स्वेटर, ब्लैंकेट वाटत फिरत होते,                                                                                                                                                        

आणि आता या मरणाच्या उन्हाळ्यात 
थंड  थंड  बियर वाटणे
हे  त्यांचे कर्तव्य नाही का ? 
🍺🍻❄तापलेले मुंबईकर

.           *|| कहाणी मुंबईची ||*

एक शहर आहे जगात
म्हणतात ते फार वेगळे आहे,

*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

सकाळी उठणे हे सुद्धा एक काम आहे,
रात्रीची झोप हा फक्त काल्पनीक आराम आहे,

दात घासणे, आंघोळ करणे यासाठी पुरेसा वेळ नाही,
नाश्ता करत असताना तयारी करणे यापेक्षा मजेशीर खेळ नाही,
देवासमोर एक मिनीट हिच आमची देवपुजा असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

बिल्डीँगचा गेट सोडला कि रांगांची रांग लागते,
रिक्षा बस ट्रेनचे टिकीट अगदी काहिहि कारण चालते,

रस्त्यावरून चालणारा प्रत्येक माणुस धावत असतो,
मिनीटाला शंभर पाऊले असा इथे नियम असतो,
रस्ता आपल्याच बापाचा समजून चालायचे असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

शिव्या देत शिव्या खात प्लँटफाँर्मवर पोहोचायचे असते
मुंग्यांमधली साखर शोधावी तसे मित्रांना शोधायचे असते
ट्रेनमधले मित्र मैत्रीला जागणारे असतात

एकामुळे दुसऱ्याला जागा मिळेल असे जागा अडवून बसतात
रिझर्वेशन नसुनही प्रत्येकाची जागा फिक्स असते
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

घरी पोहोचण्याचा विचारच फार आनंददायी असतो
पण पुन्हा ट्रेन बस हा विचारच मनाला टोचत असतो

आईच्या हातचा चहा हेच घरी पोहोचल्याचे समाधान
तिची सिरीयल माझी मँच यासाठी रिमोटची ताणाताण
ब्रेक वगळून एकाच वेळी तीन सिरीयल पहायची असते
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

जेवणानंतर लगेच झोप एक वाईट सवय आहे,
म्हणूनच बाहेर फेरफटका आता आमची गरज आहे,

एका तासात चाळीतल्या नव्या जुन्यांची खबर होते,
आपणही याचा एक भाग आहोत याची गोड जाणीव होते,
झोपण्यासाठी नव्हे तर सकाळी उठण्यासाठी घरी परतायचे असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

असाच हा नित्यक्रम सोमवार ते शुक्रवार असतो,
पण बाकिचे दोन दिवस आमचा दिनक्रम बदलतो,

जे पाच दिवस भेटले नाहीत असे मित्र भेटतात,
मग थिएटर, पब, बिचेस, टेरेस सगळी ठिकाणे गाजवतात,
आईला एक दिवस आराम हे बाहेर जेवण्याचे कारण असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

असा हा आठवडा त्याचेच महिने घडावे,
दिवसातील चोवीस तासही इथे कमी पडावे,

अशी हि श्रमाची बँक जिथे तक्रार काउंटर नाही,
मैत्रीचे व्याज मिळत राहते पण जास्त नोटा मात्र नाहीत,
शोधनाऱ्यासाठी सगळे आहे फक्त वेळ मात्र मिळत नसते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते. .......*

เคฎुंเคฌเคˆเค•เคฐ

เคจिเคฐाเคถाเคตाเคฆी:- เคนी เคŸ्เคฐेเคจ เค…เคฐ्เคงी เคญเคฐเคฒेเคฒी เค†เคนे.

เค†เคถाเคตाเคฆी: เคนी เคŸ्เคฐेเคจ เค…เคฐ्เคงी เคฐिเค•ाเคฎी เค†เคนे












เคฎुंเคฌเคˆเค•เคฐ:- เค…ंเคฆเคฐ เคšเคฒो เคญाเคˆ, เคชुเคฐा เคŸ्เคฐेเคจ เค–ाเคฒी เคนै.๐Ÿ˜ƒ

2611

ताज हॉटेल
जळत होते
लाल रक्त
गळत होते
खरे भक्त
साळसकर
दूर शासना आळसकर
पुन्हा सव्वीस
अकरा नको
कसाब सारखा
छोकरा नको
नापाक पाकडे
भामटे होते
शर्थीने लढणारे
कामटे होते
तुकारामाने
कमाल केली
कसाब पकडून
धमाल केली
लढता -लढता
शहीद झाले
तेंव्हा आम्हाला
माहित झाले
नांगरे पाटलांचा
विश्वास होता
ताज हॉटेलचा
अभ्यास होता
आत शिरून
आतंकी मारले
ओलीस धरलेले
नागरिक तारले
नमन त्यांच्या
कार्याला आहे
सलाम त्यांच्या
शौर्याला आहे
🇮🇳🇮🇳२६/११ 🇮🇳🇮🇳
🙏भावपूर्ण श्रद्धांजलि💐🙏

2611

ताज हॉटेल जळत होते
लाल रक्त गळत होते
खरे भक्त साळसकर
दूर शासना आळसकर
पुन्हा सव्वीस अकरा नको
कसाब सारखा छोकरा नको
नापाक पाकडे भामटे होते
शर्थीने लढणारे कामटे होते
तुकारामाने कमाल केली
कसाब पकडून धमाल केली
लढता -लढता शहीद झाले
तेंव्हा आम्हाला माहित झाले
नांगरे पाटलांचा विश्वास होता
ताज हॉटेलचा अभ्यास होता
आत शिरून आतंकी मारले
ओलीस धरलेले नागरिक तारले
नमन त्यांच्या कार्याला आहे
सलाम त्यांच्या शौर्याला आहे

🇮🇳🇮🇳२६/११ 🇮🇳🇮🇳
💐भावपूर्ण श्रद्धांजलि💐