Malvani couple

मालवणी कपल
प्रेयसी::~ तु माझ्यासाठी काय करतलं..??

प्रियकर::~ तुका काय हव्या.....

प्रेयसी::~ चंद्र देतलस का आणुन...???

प्रियकर::~ तुका चंद्र आणुन दिलय तर, पृथ्वीभोवती काय तुझो बापुस बैटरी घेऊन फिरतलो ......
😝😝😝😂😂😂

आईला द्यावे कधी माहेरपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

कबूल आहे तिचंच असतं घर
पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..

उठू दे तिला कधी सर्वात शेवटी
पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी
नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी
फार नाही, पुरेल तिला मदत जराशी
लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून
सांगावं मनातलं काही जवळ बसून
ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

आई राहून सासरी लेकीला माहेर देते
पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?
जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण
मग आईला कुठलं माहेरपण?

तिला ओळखणारं तिचंच  अंगण
समजुतदारपणावर विश्वासालेल मोकळेपण
शरीर मनाला विसाव्याचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?

आईलाही हवा असेल कधी विसावा
वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा
ज्या हातांना तिनेच लावलंय वळण
आईलाही द्यावं कधी माहेरपण..☺🙏❗

देवाने एका 'आई' ला प्रश्न विचारला.
.
.
.
.
' तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले...

आणि विचारलं दुसरं काही मागा....

तर तुम्ही काय मागणार..??

'..त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;..

''माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागनार....

कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाही.

"हे आहे आईचे प्रेम....''घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही..

जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही ,

सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात  शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात...!

☑☑ आई करीता पुढे पाठवा..
👪👪👪