"गाडीची पुढची काच खूप मोठी असते आणि मागे कोण आहे ते बघण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. असे का? तर भूतकाळाला फारच थोडे महत्व आहे. मागे फक्त लक्ष्य ठेवा. भविष्यकाळ महत्वाचा. पुढे बघा. आणि पुढे जात रहा. आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी अल्पकाळ टिकणार्या असतात. मनासारख्या घडत असतील तेव्हा त्यांचा भरपूर आस्वाद घ्या. कारण त्या लवकर संपतील. आणि मनाविरूध्द गोष्ठी घडत असतील तर काळजी करू नका, त्या लवकर संपणार आहेत..
No comments:
Post a Comment