Showing posts with label Fakt ti.... Show all posts
Showing posts with label Fakt ti.... Show all posts

भेटत ती पण नाही,भेटत मी पण नाही..

भेटत ती पण नाही,
भेटत मी पण नाही....
निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवण मला पटत नाही.
.
फसवत ती पण नाही,
फसवत मी पण नाही....
तिला रुसण्याचे दु:ख आहे,
मला एकटेपणाची भीती आहे....
.
समजत ती पण नाही,
रागवत मी पण नाही......
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
.
बघत ती पण नाही,
थांबत मी पण नाही....
जेव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी
बोलेन तिच्याशी....
.
ऐकत ती पण नाही,
सांगत मी पण नाही....
पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
प्रेम माझे आजही आहे तिच्यावर
नाकारत ती पण नाही,
सांगत मी पण नाही.......


You can visit
http://meemarathikavita.blogspot.in/

एकदा का होईना,

ठाऊक होतं मला,
मी नसताना तू रडशील..
एकदा का होईना,
आठवण माझी काढशील...
विसरलेल्या सर्व गोष्टींना,
आठवण्याचा प्रयत्न करशील..
आठवेल जेव्हा भेटणं माझं,
तू एकदा तरी हसशील..
माझ्याबरोबर घेतलेला निरोप,
तू शेवटचा असं म्हणशील..
तो निरोप शेवटचा नव्हताचं,
हे एकदा तरी मान्य करशील..
ठाऊक होत मला,
तू माझ्या प्रत्येक गोष्टीला
नाही म्हणशील..
नाही नाही म्हणताना,
तू एकदा तरी माझ्या प्रेमात
पडशील

Gajaraa

Tujhya Wenitil Gajaraa Banlo Asto
Pan Aaplyakade Full Sukale Ki
Gajaraa Fekun takanyachi Paddhat Aahe.

Tu nahi boli tar....

तु नाही बोललीस तर ...!!
--------------------
तु ठरव , तुला मी हवा नको
माझे जीवन तुझ्याच हाती
तुझ्या अबोल्यानं माझं आयुष्य
घटत
तुझ्या बोलण्यानं माझं आयुष्य
वाढतं ...!!
तु नाही बोललीस तर
सिगरेटचे आणखी दोन झुरके जास्त
घेतो
स्वताःलाच आणखी जाळून घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
दारूचे आणखी दोन पेग जास्त घेतो
स्वताःलाच आणखी नासवून घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
भाकरीचे आणखी दोन घास कमी
खातो
स्वताःलाच आणखी ऊपाशी ठेवून
घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
दुःखाचे आणखी दोन भार ऊराशी
घेतो
स्वताःलाच आणखी मी कैद करून
घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
दररोज आणखी थोडा थोडा मरत
जातो
स्वताःलाच आणखी मी मारत जातो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!

Aathavan

तुझ्यावर्च प्रेम व्यक्त कर्ण,
मला काही जमत नाही ................
तुझ्या आठवणी शीवाय ,
मन मात्र कशात रमत नाही