Showing posts with label Guru Paurnima SMS. Show all posts
Showing posts with label Guru Paurnima SMS. Show all posts

*एक शिष्य आहे ज्याला सुपारी खाण्याचे व्यसन आहे*

*खूप जणांनी समजवले पण सवय काही जात नाही*............

*त्याला स्वतःला हे व्यसन सोडायचे आहे पण व्यसन काही सुटत नाही*

*शेवटी कंटाळून आपल्या गुरूंकडे आला आहे......आणि संवाद चालू आहे......................*

*शिष्य: प्रणाम गुरुवर्य,.......(चाचरत...) मला, सुपारी खाण्याचे व्यसन लागले आहे........मला स्वतःला ते सोडायचे आहे..........पण काही केल्या सुटत नाही........काय करू* ?

*गुरुवर्य: (हसत)...थांब, तुला उपाय सांगतो*........

*(जागेवरून उठून एका झाडाभोवती मिठी मारतात)*

*शिष्य: (मनातल्या मनात) अरे, हे काय ......मला उपाय सांगतो म्हणाले आणि झाडाला का असे मिठी मारून बसले आहेत*

*आपण थांबूया*.......
*बराच वेळ जातो*.......
*गुरु झाडाला मिठी मारून आहे तसेच उभे आहेत*........
*तो शिष्य आता वैतागला आहे*.......

*शिष्य(कंटाळून) गुरुवर्य, मला माफ करा*.....
*पण तुम्ही मला उपाय सांगणार होता*......
*हे झाडाला असे का मिठी मारून बसलात*?

*गुरुवर्य: अरे काय करू*.....
*बघ ना.....या झाडाने मला कसे घट्ट धरले आहे*.....
*याने जर मला सोडले नाही तर मी कसा तुला उपाय सांगणार*........

*शिष्य(हसत) गुरुवर्य, झाडाने तुम्हाला नाही तर तुम्ही झाडाला धरले आह*....
*तुम्ही सोडा ना त्या झाडाला* ........
*तर ते झाड तुम्हाला सोडेल*.............

*गुरुवर्य (झाडाची मिठी सोडत आणि हसत*)
*अरे तुला जर एवढे समजते*....
*कि झाडाने मला नाही तर मी झाडाला धरले आहे*.....
*मग माझे व्यसन सुटत नाही तू असे कसे म्हणतोस*......
*अरे व्यसनाने तुला नाही तर तू व्यसनाला धरले आहेस*.......
*तू जर स्वतःच ठरवलेस तरच तू व्यसन सोडू शकतोस*.......
*नाहीतर तुझे व्यसन कधीच सुटणार नाही*...........
*आणि एक दिवस हेच व्यसन तुला शारीरिक,मानसिक धोकादायक ठरणार आहे*.......
*वेळीच सावध हो*................

*शिष्य: माफी असावी.....मी आज आपल्या समोर संकल्प करतो*....
*कि माझे सुरु असलेले व्यसन मी आताच सोडून देतो*............
*मित्रानो, आज आपण व्यसन हि संकल्पना फक्त विडी,सुपारी,मद्य,गुटखा, तंबाखू या बाबतीत मर्यादित ठेवतो*
.....
*पण आपण प्रत्येक जण व्यसनी आहोत.......आश्चर्य वाटले ? काहीजण म्हणतील .......नाही, नाही...व्यसन आणि मी.......शक्यच नाही........कधीच केले* *नाही*..........
*पण मित्रानो*....
*आज प्रत्येकाला व्यसन आहे*..........
*कोणाला रागात बोलण्याचे व्यसन आहे*.........
*कोणाला निंदा करण्याचे व्यसन आहे*.............
*कोणाला वाईट नजरेने बघण्याचे व्यसन आहे*..........
*कोणाला दुसर्याचे वाईट कसे करता येईल., याचे व्यसन आहे*..........
*कोणाला अहंकाराचे व्यसन आहे*.........
*कोणाला मी पणाचे व्यसन आहे*...........
*कोणाला दुसर्याला लुबाडण्याचे,फसवण्याचे व्यसन आहे*........
*कोणाला दुसऱ्याला विनाकारण कुजके,कोपरखळीने बोलण्याचे व्यसन आहे*........
*कोणाला आपल्या आई-वडिलांचे न ऐकण्याचे व्यसन आहे*..........
*कोणाला काही काम न करता फिरण्याचे व्यसन आहे*.........
*कोणाला अमुल्य वेळ वाया घालवण्याचे व्यसन आहे*.........
*आता प्रश्न राहतो तो विडी,तंबाखू,गुटखा,मद्य, यांचे व्यसन चालू असलेल्या मित्रांचा*.........
*आपण जरी लपून एखादे लहान-मोठे व्यसन करत असलो*......
*जरी कोणालाच त्या व्यसनाबद्दल काही माहिती नसेल* .....
*असे असले तरी दोन व्यक्तींना मात्र नक्कीच माहित आहे*.......

*१. आपले गुरु आणि*
*२.आपण स्वतः*

*वरील पैकी एखादे व्यसन जरी आपल्यात असेल तर संकल्प करूया आणि त्या व्यसनापासून मुक्त होवुया*....

*मला घडविण्यात मोलाचा हातभार लावलेल्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा*
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.
       आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घेतू' असे म्हणून सुरुवात केली.
   
     व्यासपौर्णिमेच्या दिवशी 'ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे' अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
 
     आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
 
     भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
 
     गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
 
     गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 'गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?' हेच खरे आहे.
 
गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

Guru Paurnima

आज गुरू पौर्णिमा.,..
🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला
जगायला शिकवलं ,
लढायला शिकवलं...
अशा प्रत्येकाचा
मी ऋणी आहे...
असेच पाठीशी उभे रहा...
माझ्यासाठी
प्रत्येक व्यक्ती गुरू आहे,
मग ती लहान असो वा मोठी...
आपण प्रत्येकाकडूनच
नकळत खूप काही शिकत असतो....
ज्ञान, विवेक, व्यवहार
आणि आत्मविश्वास देणाऱ्या
विश्वातील सर्व गुरुजनांना 
माझा साष्टांग नमस्कार.
🙏🙏🙏🙏🙏🙏

ज्याच्या मनी गुरु विचार।।
तो नसे कधी लाचार।।
ज्याच्या अंगी गुरु भक्ती।।
त्याला नाही कशाची भिती।।
ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती।।
त्याची होई जगभरात किर्ती।।
जो करेल गुरुं ची पुजा।।
त्याच्या आयुष्यातुन संकटे होती वजा।।
गुरू पौर्णिमेच्या मंगल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🍂🍁शुभ दिवस 🍁🍂