अनंत चतुर्थीचा दिवस होता त्या दिवशी ऑफिस असल्यामुळे सकाळपासून चीड चीड चालू होती माझी मला त्या दिवशी सुट्टी हवी होती कारण बाप्पा चालले होते.
मी विचार करत होतो बॉस ला सांगून लवकर निघूयात पण दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तस झालं त्या दिवशी बॉस ने माझ्यावर एक जबाबदारी टाकली आणि माझ्या वाटेला नाहुर ते कंजूरमार्ग अशी मला पायपीट करावी लागली. आणि त्या दिवशी नेमका पाऊस होताच सोबतीला, मनातून कोसत होतो माझ्या नशिबाला काय हा जॉब काय हि फिरफिर देवाला विचारात होतो मनातून काय हे देवा काय असा जॉब दिलास थोडाही शांती नाही जिथे कसतरी काम संपवून मी घरी आलो. तर घरी आलो तर प्रचंड भूक लागली होती आणि मनातून नशिबाला दोष देणे चालूच होते, कदाचित त्या दिवशी बाप्पा ने माझं ते बोलणं ऐकलं असावं असाच वाटत. मी भूक लागली म्हंजन जेवायला बसलो मस्त पराठे केले होते आईने भूक लागली होती म्हणून तुटून पडलो जेवणावर जेवत असताना एकदम दारावरची बेल वाजली वैतागलो जेवताना उठाव लागेल म्हणून मी उठलो दार उघडलं तर समोर एक म्हातारी व्यक्ती माझ्या बँकेचं कुरिअर घेऊन आली होती साधारण त्यांचं वय 60किंवा 65 घरातलं वाटत होत त्यांनी मला ते कुरियर दिल, आणि मला म्हटले बाळ थोडं पाणी दे त्याच्याकडे बघून वाटत होत कि ते थकलेलं आहेत मी पाणी दिल ते म्हटले बाळ चहासाठी पैसे असतील तर देऊ शकतोस का पहिलेच त्यांना बघून मला कसतरी झालं होतं हे म्हटल्यावर मला अजूनच कसतरी झालं पाकीट घेतलं आणि 50 नोट त्यांना दिली विचार होता चहाबरोबर काही खातील हि ते उतरायला लागलेत उतरताना त्यांचे पाय थरथरत होते त्यांना उतरायला हि नीट जमत नव्हतं ते बघून माझं मनही तेवढ्याच जोरात थरथर झाली . प्रचंड वाईट वाटलं एवढा वेळ मी स्वतःच्या नशिबाला किती दोष देत होतो काय माझ जीवन म्हणून पण जेव्हा ती वृद्धद व्यक्ती बघितली तर माझी बोलती बंदच झाली हे हि दिवसभर फिरले असतील वय बघावं तर माझ्यपेक्सा 30,35 वर्ष सहज मोठे असतील मग ह्या माणसाने काय तक्रार करावी कोणाकडे करावी दिवसभर फिरताना मी सामोसा पाव तवा पुलाव आणि मग संध्याकाळी ते पराठे एवढं सगळं खाऊन माझ्या नशिबाला दोष देत होतो आणि ती वृद्धद व्यक्ती फक्त चहासाठी माझ्यासमोर लाचार झाली होती ते जात असताना त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून काही प्रश्न पडलेत
सुखी कोण ते का मी?
नशीब कोणच चांगलं माझं का त्यांचं??
ह्या वयात हि व्यक्ती का काम करते आहे ??
आणि मग त्या दिवशी कळलं कोणीतरी म्हटलं आहे ना तुम्ही जे जीवन जगत असतात ते लाखो लोकांचं स्वप्न असत ते मनोमन पटलं. बाप्पा ने जात जात माझे डोळे उघडले
बाळ हेय जीवन आहे चढ उतार येणार फक्त जगात राहा लढत रहा बाकी मी आहे सांभाळायला त्या वृद्ध व्यक्तीच्या स्वरूपात त्या दिवशी बाप्पा च आला होता.
आता नशिबाला दोष देण्यापेझा मला काय करायचं आहे ते कळलं होतं.
पण एक कळलं सुखी तू का मी हा प्रश्न नसतो फक्त आपण कशे जगतो त्यावर सुखाची व्याख्या होत असते.
बाप्पा तुझे आभारी डोळे उघडल्याबद्दल
😊गणपती बाप्पा मोरया😊
😊मंगल मूर्ती मोरया😊
Give Respect to Take Respect
👍: लाईक नाही केले तरी चालेल, पण जरूर वाचा
एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे
कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार
होते
तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला
म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला
त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद
झाला
लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले
अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे
निश्चित होते
त्या माणसाला काही सुचेनासं झालं
पण तासा भरात एक चमत्कार झाला
आणि कोणी तरी दरवाजा उघडला
तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन
उभा होता
त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला
प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले
की तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय
सुरक्षा रक्षक म्हणाला
या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे
आहात की
जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता
आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण
संध्याकाळी गेला नाहीत
म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो
त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे
एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे
एक दिवस त्याचा जिव वाचवेल
म्हणून नेहमी लक्षात ठेवा
जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.
माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल...
म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा...
Give Respect Take Respect 💐💐💐
स्त्रीयांनी वाचाव अस काही -
खूप घाबरलेली आणि अगदी एकटी….
तिचा नवरा, आयुष्याचा जोडीदार असतो पुलाच्या दुसऱ्या टोकाला …
तिला तो दिसत नसतो आणि त्याला ती …
त्याने याव म्हणून ती खूप साद घालते त्याला …
पण त्याच्याकडून प्रतिसाद शून्य ….
घाबरलेली बावरलेली ती पुन्हा पुन्हा हाक मारत राहते … आर्ततेने
त्याच उत्तर येत
"मी बिझी आहे तू कर ना प्रयत्न स्वत:च,
जिथे तिथे मीच का हवा तुला …
स्वत:च काम स्वत: करायला शिक ना जरा"
ती दुखावते … मोडते
पण लगेच सावरते
आणि हिमतीने पाउल टाकते त्या धोकादायक उंचच्याउंच पुलावर
…. कशीबशी पार करते तो पूल
मनातली अपमानाची धग दडपून
मात्र त्याला बघताच
बांध फुटून रडत धाव घेते त्याच्याकडे
कारण …
…. कारण पुलाची मोडलेली बाजू सावरलेली असते त्याने आपल्या खांद्यावर …. तिच्या सुरक्षिततेसाठी .
कधी कधी स्त्रियांना वाटते कि आपला नवरा गप्प गप्प का?
काहीही मदत नाही करत…
भलेही तो काही करतांना दिसत नसेल…
पण जेव्हा तुम्ही आत्मविश्वास गमावतात तेव्हा
तो कदाचित पुलाची दुसरी बाजू सावरत असेल …
असा असतो तो..
"पुरुष कोण आहे ?"
पुरुष हा देवाने बनवलेली अशी एक सुंदर गोष्ट आहे, जो आपल्या अगदी कमी वयापासून compromise करायला चालू करतो!
तो आपल्या हिश्श्यातील chocolate सुद्धा आपल्या बहिणीला देतो!
तो आपल्या आई-वडिलांच्या सुखासाठी आपल्या स्वप्नांचे बलिदान देतो!
तो आपले सर्व pocket money अशा मुलीसाठी खर्च करतो जिच्या चेहऱ्यावरील हसू पाहायला त्याला आवडते!
तो आपले पूर्ण तारुण्य आपल्या बायको आणि मुलांच्या सुखासाठी रात्री-बेरात्री काम करून कुठल्याही तक्रारीविना खर्च करतो!
तो त्यांच्या भविष्यासाठी बँकेतून लोन आणि कर्ज घेतो आणि जन्मभर ते फेडत बसतो!
तो खूप संघर्ष करतो आणि तरीही त्याच्या आईचे, बायकोचे आणि बॉस चे ओरडे खातो!
शेवटी त्याचे आयुष्य दुसऱ्यांसाठी झटण्यातच संपते!
आईचे ऐकले तर त्याला MAMA's Boy बोलतात आणि
बायकोचे ऐकले तर त्याला बायकोचा बैल बोलतात!
प्रत्येक पुरुषाचा आयुष्यात respect करा!
कारण तुम्हाला माहित नसेल त्याने आयुष्यात तुमच्यासाठी कुठले बलिदान दिले असेल!
हा message प्रत्येक पुरुषाला पाठवा, त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी आणि
प्रत्येक स्त्रीला पाठवा तीलाही किमंत समजायला हवी......
Avinash Ghadshi / Marathi Khichadi / Hindi Tadaka / Marathi khichadi Youtube / Marathi Boli / Hindi Tadaka Youtube
टार्गेट सर्वाना असतात राव
स्थळ: L.I.C रोड Nagpur
नितिन सिग्नलवर थांबला होता.
अचानक मागुन एक मोटारसायकल स्वार आला आणि सिग्नल तोडून पुढे निघून गेला. त्याला पाहून अजुन २-३ जण सिग्नल तोडून पुढे निघाले. नितिनला वाटले इतके जण सिग्नल तोडून निघाले मग आपणही जाऊया.
पुढे गेल्यावर त्या सगळ्यांना वाहतुक पोलीसांनी पकडले. अर्थात नितिनलाही पकडले. पोलीसांनी नियमभंगाखाली सगळ्यांनाच दंड आकारला. पण ती जी पहिली व्यक्ती होती ज्याने सिग्नल तोडला होता त्याच्याकडून दंड घेतला नाही, उलट त्याला काही पैसे दिले.
हा प्रकार पाहून नितिनला आश्चर्य वाटले. त्याने त्या पोलीसाला विचारले,"काय हो साहेब, तुम्ही आम्हां सगळ्यांकडून पैसे घेतले. पण त्या व्यक्ती कडून काहीच न घेता उलट त्याला पैसे दिले. असं का?"
तेव्हा तो पोलीस म्हणाला: ज्या मानसानं सिग्नल तोडला, तो आमचांच माणुस आहे. आता तो परत फिरुन येईल, सिग्नल तोडील आणी तुझ्यासारखी वेडी लोकं त्याच्या माग येतील.
मार्च एंड जवळ आला आहे, आम्हाला पण टार्गेट असतो बाबा.
😜😜
जबाबदार माणूस जरुर व्हायचं
मी चहा घेतला.
तेवढ्यात तिथे एक ५०-५५ वर्षाची म्हातारी बाई आली.
डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिनं बाजूला टाकल.
कुठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कूंकुवाची छटा.
घामामुळे कूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यत आलेला,
धारदार नाक, सूरकुतलेले हात,
तिन-चारजोड देऊन
हातानेच शिवलेल
नववारी लुगड
आणि चोळी......
असा काही
तिचा वेश होता....
म्हातारी -
"नुस्तच कालवण
मिळल का गं बाई?????
माझ्याकडं
भाकर हाय".....
'तिचा होकार'
मिळताच
काळपट फडक्यातून
त्या म्हातार्या बाईने शिळी भाकर काढली.....
आणि
दिलेल्या कालावणावर अधाशिपणाने खाऊ
लागली......
मी
विचार करायला लागलो...
- आपण पैसे द्यावे
का?
हिला कुणीच नसेल का?
आणि असेल तर?
अशी वेळ का यावी तिच्यावर??
इतक्यात
तिची भाकरी
संपण्याच्या आत
ती हाँटेलवाली मुलगी म्हणाली,
"आजी, मिसळपाव घ्या!!
पैसे नाही घेणार!"
ती आजी बाई म्हणाली :- पोरी,
आज खाईन
पोटभरून.......
पण उदया??
मुलगी म्हणाली :- तुम्हाला मुलबाळ नाही का?
त्यावर ती म्हणाली,-
" तसं नाय काय,.........
पोरगा मोठा सायब हाय,.....
परदेशाला इंजीनियर
हाय.....
पण त्याला येळच न्हाय!!!!!!!
कानाखाली कोणीतरी
जोराची चपराक
मारावी
आणि
त्याचा आवाज
मेंदूपर्यत
घुमावा
तसे हे शब्दमाझ्या कानावर पडले
आणि
विचारांच काहूर माजलं............
'माणूस इतका बदलतो का?'
आपल संपूर्ण आयुष्य वाहून घेणा-या
या माऊलीची
त्याला क्षणभरही
आठवण येतनसेल का? आणि
सगळच
अनुत्तरीत होतं.
माझा चेहरा
खाली घालून
मी आता विचार करीत
होतो........
इतक्यात्......
माझ्या
पाठीवर
तोच
थरथरता
हात
फिरला.......
मी वरती पाहीलं
तर
तीच बाई
मला म्हणाली. :-
"इतका विचार करु नकोस बाळा",,,,,,,,,
तुझ्या आई-
बापाला निट जप... म्हणजे झालं.......
मग तर
मेल्याहून मेल्यासारख
झालं,
मी आता फक्त रडायचाच बाकी होतो.
कारण
एका क्षणात माझं पूर्ण अंतरंग
त्या माऊलीन
वाचलं.
पण
आम्हाला आमच्याच
आई-वडीलांच थोडस
दु:ख सुद्धा कधीच जाणता येत नाही.......
वेड घेउन पेड गावला तर अगदी रोजच जात असतो आम्ही........
जिवनाच्या सचोटीत
एवढं शिक्षण
घेऊनही आम्ही
अगदीचअडाणी
वाटतो यांच्यासमोर!
कुठं शिक्षण घेतल असेल यांनी हे???? ,
सेटलमेंट,
न्यू जॉब,
इनक्रिमेंट,
प्रमोशनच्या घोळात
आम्ही ही
"आमची माणसं"
कुठ हरवुन बसतो
आम्हालाच कळत नाही.
डोक जड झालं.
मी उठलो
आणि
चालू लागलो.....
शेजारच्या जिल्हापरिषदेच्या शाळेत मास्तर
मूलांना विचारतात आपण काय शिकलो?
मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनिअर
नाही होता आलं तरी चालेल पण,
चांगला,
जबाबदार माणूस जरुर व्हायचं ....
बास!
हे सगळं शेयर करताना आपण विचार नाही करत ना...
मि नाही म्हणत हा sms १० लोकांना पाठविल्यावर तुम्हाला सुख मिळेल
पण तुम्हिच विचार करा वाटलं तर परत एकदा वाचा आणि ठरवा कोणाचा फायदा होईल का? तुम्हाला सुख भेटेल का?
आणि मगच आपल्या आई वडिलांसाठी whatsapp चा 1 मिनिट खर्च करा plz
सहमत असाल तर नक्की शेअर कर..............
चहा…! की कॉफी…!!
कॉफी म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..
कॉफी म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..
कॉफी अक्षरशः निवांत..!
चहा म्हणजे झकास..
कॉफी म्हणजे वाह मस्त..!!
चहा म्हणजे कथा संग्रह..
कॉफी म्हणजे कादंबरी..!
चहा नेहमी मंद दुपार नंतर..
कॉफी एक धुंद संध्याकाळी.!!
चहा चिंब भिजल्यावर..
कॉफी ढग दाटुन आल्यावर.!
चहा = discussion..
कॉफी = conversation..!!
चहा = living room..
कॉफी = waiting room..!
चहा म्हणजे उस्फूर्तता..
कॉफी म्हणजे उत्कटता..!!
चहा = धडपडीचे दिवस..
कॉफी = धडधडीचे दिवस..!
चहा वर्तमानात दमल्यावर..
कॉफी भूतकाळात रमल्यावर..!!
चहा पिताना भविष्य रंगवायचे..
कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!
खास मुलींसाठी
मुली लग्न करताना ...मुलगा सरकारी नोकरीत आहे का?..
लाखो रुपये पगार आहे का?
मुम्बईत प्लॅट आहे का?
कार आहे का?
ह्या गोष्टी सर्रास विचारतात.....
पण त्या कधीही हा विचार करत नाहीत की स्वत:चा बाप 20-25 वर्ष मुम्बईत राहुन एक झोपडं नाही घेउ शकला ..कधि शेअर रिक्षाने पण स्टेशन ला नाह्रे गेला...अजुन भाड्याच्या खोलीत राहतो....
मग हा काल आलेला किंवा नुकताच नोकरिला लागलेला मुलगा एवढ्या सगळ्या अपेक्षा पुर्ण करु शकतो ?...नाही ना ...
स्वत:कधी साधा वडापाव वर खर्च नाही करत आणी मुलांची लायकी ठरवायला त्याना CCD लागतं..
.आणी खरच सुखी संसार व्हायला पाहीजे अस वाटत असेल तर जे मिळतय ते पण गमावण्याचची वेळ येते...कितीही बरी परिस्थिती असली मुलाची तरी मुलीला ते कमी लायकिच वाटत...
आणी उगाच आपल्या सासरला आपल्या माहेरला कमी लेखतात..
खरच ज्याच्याशी लग्न करायचय त्याच्यावर विश्वास ठेवा ..त्याच्या चांगल्या वाईटात त्याला साथ करा..खरच एक दिवस तो तुमच्या स्वत:च्या हिमतीवर कमीत-कमी 60%अपेक्षा नक्की पुर्ण करेल...
तुम्ही पण खुश रहाल आणी तो पण...उगाच अती अपेक्षा करणे चुकिचच...
या पोस्ट च बर्याच मुलीन्ना राग येयील पण काही बाबी यातील नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत ते नक्की...
‘किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार’
![]() |
| Boy at Road Doing Sales |
साधारण २००४ च्या सुमारासची गोष्ट असेल. भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता.
‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला.
मी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती. पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका. स्वस्तात देतो म्हणाला. मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच. पण एक विचार करून त्याला म्हणालो मी १० सेट घेतो. कितीला देणार? क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला. त्याला विचारलं किती दिवस पुस्तकं विकतोयस? तर म्हणाला, पुस्तकं नाही, मला हातात जे काही मिळत ते सगळं मी विकतो.
मला जाता जाता ‘सेल्स’मधला एक गुरु भेटला होता. नाव विचारलं म्हणाला ‘दत्तू’, गाव उमरगा.
मनात म्हणलो चला आज गुरुवार, बहुतेक प्रत्यक्ष ‘दत्तगुरूंच ‘आले आपल्याला ज्ञान द्यायला.
त्याला म्हणालो काही खाणार? बहुतेक त्याचा विश्वास नाही बसला. म्हणला ‘पुस्तकांचे पैसे आधी देणार का नंतर?’ हसू आलं मला. म्हणलो दे पुस्तकं आणि घे पैसे. १० सेटचे १०० दिले. वरती शंभरची नोट ठेवली त्याच्या हातात, म्हणलो असुदे तुला बक्षीस.
एक मिनिट शांत झाला आणि म्हणाला ‘चला साहेब, आपण डोसा खायला जाऊ, समोर लई भारी डोसा भेटतो बोलत्यात’. अस्मादिकांनी गाडी पार्क केली रस्त्यावरच. त्याच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करून समोर ‘मॉर्डन कॅफे’मध्ये शिरलो. मला त्यांच्याबरोबर आत शिरताना काऊंटरवरच्या अण्णांनी थोडसं आश्चर्यानी पाहिलं. आत पाहिलं तर हॉटेल बऱ्यापैकी रिकामं होतं. समोरच बसलो. त्याला मेनुकार्ड दिलं. म्हणलो काय हवं ते मागव. समोर पाण्याचे ग्लास आणून ठेवणाऱ्या वेटरला त्याने झोकात मसाला डोस्याची ऑर्डर दिली वरती ‘अमूल ज्यादा मारना’ असही ऐकवलं, माझी ऑर्डर घेत, वेटर त्याच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकत काही न बोलता निघून गेला. मला पोराच्या ‘कॉन्फिडन्सचं’ कौतुक वाटायला आधीच सुरुवात झालेली होती. आजुबाजूची टेबले आमच्याकडे कुचेष्टेनी बघतच होती. मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एखादा ठेवणीतला पुणेरी कटाक्ष टाकत दुर्लक्ष करत होतो. (मला काय किडा कमी नाहीये, पण त्याच्याबद्दल परत कधीतरी)
मग आली आमच्या मुलाखतीची वेळ, म्हणलो काय रे दत्तू? पुण्यात कधी आलास?
“२-३ वर्षे झाली म्हणाला. “आईबा मजुरी करायची, बा वारल्यावर तिला कामं मिळण कमी झालं. मी आणि माझ्यापेक्षा बारकी बहीण हाय, मग एका नात्यातल्या मामानी सांगितलं पुण्यामुंबैकडे लई कामं भेटत्यान, तिकडच जा, ऱ्हावा आणि खावा. आईनी जरुरीपुरती चा भांडी, होते नव्हते ते कपडे गोळा केले, घराला अडसर लावला आणि आलो मंग पुण्याला.”
विचारलं राहता कुठे? इथेच राहतो म्हणाला. रस्त्याच्या पल्ल्याडच्या झोपडपट्टीत. खोली घेतलिया भाड्यानी. आई सोसायट्यांमध्ये धुण्याभांड्याची कामं करते, मी इकडे येतो. त्याला विचारलं ‘कोण देतं रोज विकायच्या गोष्टी?’ म्हणाला “हाय ना ठेकेदार आमचा”. रोज सकाळी ‘बॉम्बे ‘वरून आलेल्या वस्तू देतो, काय बोलायचं असत ते आणि भाव सांगतो, पैसे घेतो आणि निघून जातो.”
आता धंद्याच्या गप्पा सुरु झाल्यावर पोरगा बोलायच्या मूड मध्ये आला होता.
मी विचारलं ‘म्हणजे कमिशन वर काम करतोस का?’ तर अभिमानानी दत्तू म्हणला “नाय सायेब, आता आपला आपण माल रोज इकत घेतो आणि दुसऱ्यांना इकतो. स्वतः दुपारी काहीतरी खातो आणि रात्री राहिलेले पैशे आईकडे देतो’’ आता गेल्या वर्षीपासून आईपेक्षा लई जास्त कमावतो” मी विचारलं, बहिणीचं काय? तिला तरी शाळेत पाठवता का? हां मंग? ती जाते की कॉर्पोरेशनच्या शाळेत. शिकते, अन मलाबी थोडं शिकवते. गावाकडे पन जास्त नाही जायचो शाळेत. पर आई बोलते थोडातरी लीव्ह्याला वाचायला शिक, कुठंतरी उपेगाला येईल. म्हून थोडं शिकतो. सायेब दिवसभर बाह्येर फिरल्यावर लई कटाळा येतो. पर आता धाकल्या बहिनीसमोर गप बसतो. ते पाढे अन इंग्लिशभाषेचे धडे काय केल्या डोक्यात नाही शिरत, पर आईला दाखवायला हो हो करतो. आता एकदोन वर्ष जावूदे, मग बघा आईचे काम बंद करायला लावतो का न्हाई?पलीकडच्या सोसायटीमध्ये flat घेणार भाड्यानी. तिकडे राहणार.
मी मनात म्हणलं दिवसभर शेकडो लोकांशी बोलणाऱ्याला आणि त्यांना दररोज वेगवेगळी वस्तू घ्यायला “कन्व्हिन्स “करणाऱ्याला काय फरक पडतो भाषेचे धडे नाही म्हणता आलेतर? आणि या वयात सगळा घरचा खर्च भागाणाऱ्याला कशाला आले पाहिजेत पाढे यायला?
तेवढ्यात आमचा डोसा आला. दत्तूनी एकदा माझ्याकडे हळूच बघत दिलेला काटाचमचा बाजूला ठेवून मस्तपैकी हातानी चटणी, सांबारात बुडवून डोसा खायला सुरुवात केली. मला तर कधीच डोसा हा प्रकार फोर्क नि खाता येत नाही, त्यामुळे मी पण तसाच खायला सुरुवात केल्यावर एकदम मनमोकळ हसला. म्हणला साहेब आज तुम्ही आणल ना बरोबर म्हणून हॉटेलवाल्यांनी आत घेतला, नाही तर बाहेरूनच “चल जा असं म्हणत्यात. आपले कपडे नसतात ना चांगले म्हून. नाय तर आपणपण इथल्या वेटर एवढंच कमावतो”.
क्षणभर विचार आला; श्रीमंतीची व्याख्या कुठेही गेलं तरी साधारण एकसारखीच. प्रत्येकाला दुसऱ्या बरोबर बरोबरी करतच पैसा कमवायला लागतो. मग तो खराखरा पैशांनी श्रीमंत असो किंवा रस्त्यावर वस्तू विकणारा मुलगा.
सहज विचारलं किती सुटतात रे महिन्याचे? म्हणाला ”सांगू नका कोणाला, हफ्त्याला खर्च जावून ९-१० हजार मिळतात. पन आक्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं. कधी रस्ता बंद करतात, कोणी मोठी पार्टी (मंत्री वगेरे) येणार असली की पोलीसलोक हाकलून देतात, मग जरा कमी होतो” मी मनात म्हणलं, म्हणजे महिन्याचे कमीतकमी ३५-४० हजार? आयला, माझी आजची ऑर्डर झाली असती तर त्यात मला जेमतेम २० हजार मिळाले असते, ते पण सगळं सुरळीत पार पडल्यावर एक महिन्यानी.
मनात म्हणलं “लेका तुला सगळ्या वेटर्सपेक्षा जास्ती पैसे मिळतात. कशाला त्यांच्याशी बरोबरी करतोस? तू तर स्वतःचा राजा आहेस” डोसा खावून झाल्यावर त्याला विचारलं आता अजून काय घेणार? म्हणाला तुम्हीच सांगा तुम्ही काय घेणार साहेब? मी म्हणलो आरे मी आणलंय ना तुला इथे,तर आता तू सांगायचं. आपण ऑर्डर करू. दत्तू म्हणाला साहेब तुम्ही दिले ना पैसे एवढे? आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी. मी ओशाळलो, म्हणलं ह्या छोट्या गरीब पोराकडे मन केवढं मोठं आहे? मी म्हणलो “दत्तू आज तू मला पहिल्यांदा भेटलास ना? म्हणून आज हॉटेलचे पैसे मी देणार, आता बोल अजून काय घेणार?” त्याचा कोमेजलेला चेहेरा समजत होता, म्हणाला, नको साहेब, भूक संपली. आता मला जेवण पण नाय जानार, जाऊ आपण” असं म्हणून पटकन हॉटेलच्या बाहेर जाऊन उभा राहिला.
मी बिल भागवून वेटरला टिप ठेवून निघालो. बाहेर पडत असताना हॉटेलच्या काऊंटरवरचा अण्णा जरा सलगीत येवून म्हणला, “साब ये बच्चा दिनभर इधर चौकमे क्या क्या बेचता रेहता है, हम लोग हमेशा देखते है उसको. आज पेहेली बार इधर अंदर आके खाना खाके गया. बहोत अच्छा बच्चा है, गंदे बच्चोसे हमेशा दूर रेहता है. लेकीन क्या करे साब, हमलोगका भी धंदा है ना? हम लोग उसको अंदर आके खानेके लिये बोलेगा तो बाकीका कस्टमर आना बंद करेगा” मला त्याचंही पटले. पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरना? जाताना हॉटेलमध्ये सहज नजर टाकली तर जे लोक बसलेले होते,त्यातल्या कित्त्येकांपेक्षा तो पोरगा कितीतरी जास्त कमवत असणार. फक्त रस्त्यावर काम करतो म्हणून त्याला ‘ते स्टेट्स’ नव्हतं.
बाहेर पडलो तर दत्तू गाडीपाशी जावून थांबला होता. आत बघत होता. त्याला विचारलं, मारायची का एक चक्कर गाडीतून? तुम्हाला सांगतो, ते ऐकल्यावर त्याच्या चेहेऱ्यावर जे भाव पाहिले ना, खल्लास.
त्याला शेजारच्या सिटवर बसवून एक छोटीशी चक्कर मारून पुन्हा सिग्नलला सोडले. गाडीच्या बाहेर नवलाईने बघत होता.उतरल्यावर बघून समाधानानी हसला. म्हणाला “साहेब, पुन्हा कवा येनार?” म्हणलो अरे मी येत असतो मधूनमधून इकडे, आता तुला बघितलं की थांबीन नक्की. “हात मिळवल्यावर तर ते दत्तगुरू एकदम प्रसन्नच झाले” नक्की या म्हणाला, मी आईला आणि बहिणीला काहीतरी चांगलं घेऊन सिधा घरी जानार. सांगनार आज आपण गाडीतून चक्कर मारली, अजून माझ्याबरोबरची कोणी पोरंपन गाडीच्या आत बसली नाय. मीच पहिला.” मी नंबरात आलेल्या त्या पोराला हसून टाटा केला.
तो जाताना बघत क्षणभर विचार करत बसलो, या पोराकडे शहरातल्या कित्येक पोरांपेक्षा केवढ्या गोष्टी जास्ती आहेत? याला पैशांची किंमत समजते, आई कष्ट करून घर चालवते त्याची जाणीव आहे. स्वतः शिकत नसला तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करायची अक्कल आहे. पुढे काय करायचं त्याचा प्लानिंग तयार आहे. आज हा पोरगा कष्ट करून एवढे पैसे कमावतोय, आपल्याकडे १२ वर्षांच्या एखाद्या मुलाला चाळीस हजार नुसते मोजायला सांगितले तरी नीट जमतील की नाही शंका आहे. पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींपेक्षा, नुसतेच बडेजाव दाखवणाऱ्याची चलती जास्ती असते.
हा पोरगा नक्की पुढे जाणार आयुष्यात, अशी खुणगाठ मनात बांधून गाडी सुरु केली, रेडियो लावला, नेमकं अनाडीमधलं ‘किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार’ लागलं. योगायोगच म्हणायचा नाहीतर काय…
महासंग्राम वार्ता (अंबर कर्वे)
मैत्रीचे नाते
नटसम्राट नाना पाटेकर
Prem
वर्षाची होतीस...मी म्हणलो...
.
.
.
.
.
.
.
.
" माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे " तू विचारलस "ते काय
असत ..?"
... ... आठवतंय..? मी २५
व्या वर्षी तुला म्हणालो "मी तुझ्यावर
खूप प्रेम करतो..."
तू म्हणालीस..."मला एकटी तर
नाही ना सोडणार..?"आणि अलगद
माज्या मिठीत विरघळलीस...!!
३५
व्या वर्षी ...जेव्हा एकदा मी रात्री
उशिरा घरी आलो..तू
आणि मी सोबतच डिनर घेतलं...
मी तुला जवळ ओढून म्हणालो..."I love
you...!!" तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत
म्हणालीस..
" I know that.." पण सकाळी मुलांचा पेपर
आहे...उशीर
नको व्हायला आता जास्त...आता झोपू यात लवकर...!!
माझ्या ५० व्या वाढदिवशी सगळे
पार्टी मध्ये गुंग असताना,मी हळूच
म्हणालो..."I love you very much "
तू हसत हसत म्हणालीस ..."माहित आहे अगदी २० वर्ष आधी पासून माहित
आहे.." आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून
गेलीस...!!
तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...
आपल्या मुलाच्या लग्नात तू
घातलेली पैठणी पाहून
मी म्हणालो...
" छान दिसतेस...आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो...तू
मला खूप आवडतेस...आणि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस..."ते
ठीक आहे हो...!! पण सगळ व्येवास्थित अरेंज
झालाय ना..?"
मी आत ७५ वर्षाचा..,आराम खुर्चीवर
बसून....आपला जुना अल्बम बघत होतो...,
तू स्वेटर वीणत होतीस..नातवासाठी..मी म्हणालो "माझ तुझ्यावर अजून
हि तितकाच प्रेम आहे ..!"
आणि तू म्हणालीस...."माझ पण तुझ्यावर
आजही तितकच प्रेम आहे जितक तुला होकार
देताना होत.."
माझ्या हातातील
तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून
गेला...
डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते ...कारण आज
इतक्या वर्षांनी ...तू
स्वतः म्हणाली होती...तू
सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!!
{फक्त प्रेम पुरेसे नसते...कारण तुमच्यावर प्रेम
करणाऱ्या व्यक्तीला काहीच
नको असत...त्याला ओढ असते ती फक्त असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे
सांगतात ..."हो माझ पण तितकाच प्रेम आहे
तुझ्यावर ..जितका तुझ माझ्यावर आहे....म्हणून जेव्हा पण
संधी मिळेल सांगायला चुकू
नका....तुम्ही सुद्धा प्रेम करा
Think on it
कुतूहलाने पाहत होता;
म्हणाला,
"आज देवळात खूप गर्दी आहे, असे उभे राहून दर्शन
होणे कठीण, इथे विशिष्ट व्यक्तींसाठी विशेष
व्यवस्था आहे, मला ५०१/- रुपये दे, मी तुला थेट दर्शन
करवून देतो!
"५००१/- रुपये देतो, देवाला सांग, बाहेर ये, मी
आलोय!"
"मस्करी करतोस, देव कधी देवळाबाहेर आलाय का?
आणि तू कोण आहेस?"
"मी ५१०००/- रुपये देतो, देवाला सांग, माझ्या
घराजवळ येऊन भेट!"
"तू देवाला समजतोस तरी काय?"
"तेच तर मी म्हणतोय...
"तुम्ही सर्व जण देवाला
समजता तरी काय..?
पैसे कमावनेचे साधन?"
Penachi nali..
पेनची नळी!!
"भूक लागली का?" विचारल
"नाही."
"मग.??"
घेऊन द्या न ..!!"
मी म्हटलं "का?"
दातृत्वाच ढोंग त्याच्या एका संस्कारापुढे कवडीमोल ठरलं.
मी गाडीतून उतरलो ...त्याच नाव विचारल ..बंड्या .
पेन घेतल्यावर बंड्या खुलला
माझ्या डोक्यातल्या प्रश्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो. .
बंड्या:- मराठी ७ वित ...
मी :- काय लिहितोस ???
बंड्या :-निबंध... माझी आई !!!!
मी :- कुठ राहतोस ?
बंड्याने शेताकड बोट दाखवलं ...लांब वर एक झोपडी दिसत होती ..बंड्याचा बाप शेतावर
जागल्या होता.. आई शेतावर मजुरी करत होती ..बंड्याला चार लहान भावंड होती.
मी वही हातात घेऊन चाळली...
त्याच पूर्ण नाव वाचल.
बंड्या गांगरला ..
मी परत विचारल "इथ इतके लोक आहेत मग माझ्याकडच नळी का मागितली.?"
मग मी सगळीकडे बघितलं ...बरेचसे लोक टी शर्ट वर होते .काहींना खिसे नव्हते ..तर काहींच्या खिशाला पेन नव्हते ..
बंड्याचे निरीक्षण अचूक होते ...
माझ्या खिशाला माझा आवडता पेन होता .
मी : "फौजदार ? कसा काय ?? कुणी सांगितलं .??"
माझ्या बरोबरचे मित्र वैतागले होते ...!
निरागस डोळ्यांमध्ये फौजदार होण्याच स्वप्न देणाऱ्या झेड पी च्या गुरुजींना मी मनोमन नमस्कार केला.!!!.
गाडीकडे बघत हात हलवत होता ...!!.
कितीही भ्रष्टाचार वाढो...…
जो पर्यंत अशा माऊल्यांचे संस्कार आहेत तोवर माझ्या देशाच भविष्य उज्वल असल्याबद्दल मला खात्री पटली ……!!

