Showing posts with label God Thoughts (Marathi). Show all posts
Showing posts with label God Thoughts (Marathi). Show all posts

सत्य परिस्थिती

सत्य स्विकारा

गायीच्या पोटातील ३३ कोटी देव गायीचे रक्षण करू शकत नाही त्यासाठी माणसांना कायदे करावे लागतात आश्चर्य आहे राव...

निर्जीव खांबातून नरसिंह बाहेर येतो... आणी सजीव गाईतून कत्तलखान्यात नेली तरी 33 कोटी बाहेर येत नाहीत...
मित्रांनो पुढच्या काळात आपल्याला बहुजन समाजासाठी खुप कष्ट घ्यायची गरज लागणार नाही कारण पुढची पिढी इतकी चिकित्सक आणि हुशार झाली आहे... याच श्रेय मी (तात्पुरता) महाभारत रामायण सिरीयल वाल्यांना देतो. सिरियल बघताना या मुलांना सहज पडणारे प्रश्न...

🔺पांडव कसे जन्माला आले ?
🔺रामाचा खरा बाप कोण ?
🔺आकाशात उडणारे बाण बरोबर समोरासमोर कसे येतात ?
🔺द्रोणाने एकलव्याचा अगंठा कोणत्या अधिकारा खाली घेतला ?
🔺राक्षसांना शिंगे होती तर त्यांच्या पुढच्या पिढी कुठे आस्तित्वात आहेत ?  कारण परशुरामाने पृथ्वी 21 वेळा निक्षेत्रीय केली आहे तरी अजून क्षत्रिय जीवंत आहे मग राक्षशांचे वंसज कुठे आहे
🔺जर त्या लुप्त झाल्या आहेत तर इतिहासात डायनासोर प्रमाणे त्यांचा उल्लेख का नाही ?
🔺विमान वापरणारे पूर्वजांचे वशंज राइट बंधूच्या पेटंटवर ऑब्जेक्शन का घेत नाहीत?
🔺तेव्हा जर विमान होते तर घोङ्यांना का रथाचा त्रास ? विमान असताना.
🔺रणगाङ्यांचा शोध अवघङ होता का ?
🔺हनूमान जर पर्वत उचलून आणू शकत होता तर त्याच पर्वतावर बसवून सर्व सैन्य का नेलं
नाही ? सेतू बांधण्याची उठा ठेव वाचली असती
🔺दुर्योधन जर एका सुतपूत्राला राजा बनवत असेल तर तो समानतेचा पुजारी होता ! मग सगळे पांङवाना का मानतात ?
🔺जर हजारों वर्षापूर्वीच्या ''बौद्ध '' स्तुपांचे आवशेष सापङत असतील तर पांडवाचे महाल त्यांची मोठमोठी शहरं कूठ गेली ?
🔺जर भारतात हजारो वर्षापासून हिंदू धर्म होता तर "बौद्ध " लेण्यांची संख्या एवढी जास्त कशी ?
🔺आणि नेमके "बौद्ध " लेण्यांच्या बाहेर हिंदू देवांची मंदिर कशी ?
🔺हिंदू धर्मातील देवतांनी पृथ्वी आणि जिवांची निर्मिती केली तर भारत सोडून इतर देशात हिंदू देव वा हिंदू धर्म का नाही ?
🔺देवांना वर स्वर्गातून फक्त भारत देश, हिमालय, हिंदी महासागर, गंगा, यमुना नद्या च का दिसत होत्या
🔺त्यांना अमेरिका , फ्राँन्स , इंग्लंड , रशिया , चिन ,जपान , आफ्रिका असे कितीतरी देश आहेत. ते का दिसले नाही किंवा तिथे ते गेले नाही ?
🔺नाईल , अॅमेझोन सारख्या मोठ्या नद्या शंकराच्या जटेतनं का निघाल्या
नाहीत?
🔺त्यांना हिमालय सोडून अंटार्टीका जे हिमालयापेक्शा कीतीही पटीने बर्फाच्छिद आहे तिथं रहायला का गेले नाही ?
🔺३३ कोटी देव असुनही आपण एवढे वर्षे गुलाम , अज्ञानी , मागास कुपोषित कसे ?
अवश्य विचार करा !
सत्याची चिकित्सा करा !
इतिहास वाचा, समजा, समजावून सांगा !
▶आणि सत्य आहे तेच कबूल करा◀
         जय भारत…

देव दगडात असतो कि नसतो?

☝एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान(अतिहुशार) व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले.
👉जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी विवेकानंद यांना सहज हसत हसत म्हणटले की,
" स्वामीजी बघाना काय मूर्ख लोक असतात, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात.
किती मूर्खपणा आहे.
मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे.
तेहतीस कोटी काय या जगात एकही देव अस्तित्वात नाही."
सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का?❔
आणि.....
तो व्यक्ती खदखदा हसू लागला. 👉हे सर्व स्वामी विवेकानंदांनी
शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की,
" तुमच्या पाठीमागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? "
त्या व्यक्तिने होकारार्थी मान डोलावून म्हटले "हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे."
✨ स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले.
तो व्यक्ती निरूत्तर झाला.
त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणुन ठेवण्यास सांगितलं.
त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणुन ठेवला.
स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले कि,
🌟आता एक काम करा, या फोटोवर थुंका.
तो व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाला. "काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो."
स्वामी विवेकानंद म्हणाले, " तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत."
त्यावर तो व्यक्ति म्हणाला "मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो. त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही."
✨🌟
यावर स्वामी विवेकानंद म्हणाले कि
👉 "जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते."
हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागु लागला.
☝ परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे. कोणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो.
💐 संत तुकाराम महाराज म्हणतात.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ।
तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा।
☝ देव जाणून घेण्यासाठी पॆसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो.
☝देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा.🙏🙏🙏🙏