Showing posts with label अंधश्रद्धा निर्मूलन Andhashradhha. Show all posts
Showing posts with label अंधश्रद्धा निर्मूलन Andhashradhha. Show all posts

Mobile in Heaven

पंडित  बोला फल भोजन कपड़े या
कोई भी चीज आप श्राद्ध मे दोगे तो
आपके पूर्वजो तक पहुँच जाएगी..

हम बोले यह "मोबाईल" पहुँचा
दीजिए बात हो जाया करेगी

पंडित  दुबारा नही आया....

बताओ हमने कौन सा कुछ
गलत बोल दिया था ???
😃😃😃😃😃😂😂😎

पित्र जेवु

माणुस मेल्यानंतर त्याच्या स्वर्गातल्या आत्म्याला शांती मिळावी
म्हणुन पिञ जेवु घालतात,
आता बघा हं...
ब्राम्हणाचा बाप ब्राम्हण....
मराठ्याचा बाप मराठा....
माळ्याचा बाप माळी.....
कोळ्याचा बाप कोळी....
महाराचा बाप महार....
मांगाचा बाप मांगच....
सगळेच वेगवेगळ्या जातीचे
तर मग माणुस मेल्यावर सगळ्यांचा बाप कावळाच का ????
कुणाचा राजहंस असावा, कुणाचा बगळा असावा, कुणाचा मोर तर कुणाचा बदक असावा....
जीवंतपणी माणसां माणसांत भेदभाव,
तर मेल्यावर समानता....
असे का ???...

Shraddha श्राद्ध

एकदा एक साधू कबीराना म्हणाला, ​"आज श्राद्ध आहे, तेंव्हा पितरांसाठी गोड खीर बनवायची आहे. त्यासाठी बाजारातून मला दूध आणून दया"​
त्यावेळी कबीर ९ वर्षांचा होते.

कबीर दुधाचं भांडं घेऊन दूध आणायला निघाले. रस्त्यात त्यांना एक मेलेली गाय दिसली. कबीरांनी आजूबाजूचं गवत गोळा केलं आणि गायीच्या जवळ ठेवलं आणि ते तिथेच बसले. दुधाचं भांडं देखील बाजूला ठेवलं.

बराच वेळ झाला, कबीर अजून आले नाही म्हणून त्याना शोधायला साधू स्वतः निघाला. काही अंतर चालल्यावर कबीर एका मृत गायीजवळ बसलेला त्यांना दिसले

साधूने त्यांना  विचारलं, " दूध आणायला नाही गेले

त्यावर कबीर म्हणाले, ​"महाराज, प्रथम या गायीला चारा तर खाऊ दे. चारा खाल्यावर गाय दूध देईल ना?"​

साधू म्हणाला, "पण, ही गाय तर मेली आहे, मग ती चारा कसा खाणार?"

त्यावर कबीर म्हणाले "महाराज, ​जर मेलेली गाय चारा खाऊ शकत नाही, तर मग तुमचे १०० वर्षांपूर्वी मेलेले पितर खीर कशी काय खाणार ?"​
😷😷😷
यावर साधू निरुत्तर झाला.

अंधश्रद्धा भगाओ... भारत बचाओ...

महापुरुष साधू

बरीच वर्षांपासून ह्या नालायक पाकिस्तानच्या आणि चिनच्या सिमारेषेवरून कुरघोड्या चालू आहेत... त्यांना भारताच्या ताकदिचा अंदाज नाही अजून

दारू गोळा नसला तरी भारता कडे
पावला पावला वर सिद्ध महापुरूष,
साधु,
करणी,
भानामती,
चेटूक करणारे मांत्रिक - तांत्रिक आहेत
जे पाकिस्तान व चीन ला दारू गोळ्या शिवाय जाळून भस्म करतील ...!
*ज्यांना विश्वास बसत नाही त्यांनी कुंभमेळा जरूर बघावा ...!*

उगाच नाही सरकार  कुंभमेळ्या वर *३३ हजार करोड* खर्च करत

विचार करावयास भाग पाडणारी post.

जोड्या जुळवा
१) गणपती      अ) बासुरी
२) मारुती        ब) शुक्रवार
३) शंकर          क) दूर्वा व् मोदक
४)देवी            ड) शनिवार
५) कृष्ण         इ) तिसरा डोळा















शाब्बास

आता ह्या जुळवा

जोड्या जुळवा
१) रेडियो           अ) हापकिन
२)रेफ्रिजरेटर       ब) आलीव्हर ईव्हान्स
३)कॉम्प्यूटर        क) चार्ल्स बाबेज
४) अणू बॉम्ब       ड) गुगलीमो मार्कोनी
५) कॉलरा लस     ई) लिओ सिलार्ड

जे माहिती असायलाच हवं ते खूपदा माहिती नसते. आणि जे माहिती असुन/नसून विशेष फरक पडणार नाही ते मात्र आम्हाला तोंडपाठ असतं.

(१-ड, २- ब, ३-क, ४-ई, ५-अ)

फक्त 9 दिवस चप्पल सोडून जर मनोकामना पुर्ण होत असत्या तर ,

12 महीने शेतकरी बिगर चप्पल शेतात राबतो त्याच्या पण इच्छा , मनोकामणा पुर्ण व्हायला हव्यात ना?

उभे आयुष्य बिगर चपलीने फुटपातवर सडत आसणार्या भिकार्यां कडे देव का पाहत नाही.?

- चप्पल सोडून मनोकामना पर्ण होत नसतात.

श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा नको.

🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏