Showing posts with label Lahanpan Dega Deva. Show all posts
Showing posts with label Lahanpan Dega Deva. Show all posts

लहानपणी बर होत....

लहानपणी बर होत....
वरच्या इयत्तेतल्या मुलांची
पुस्तक अर्ध्या किमतीत आपल्याला चालायची.
आता नवीनचं पुस्तक....
ती हि शाळेतूनच
घ्यावी लागतात.
मोठ्या भावाचा
शाळेचा गणवेश
आपल्याला कामी यायचा ...

आता किमान दोन प्रकारचे गणवेश शाळेत लागतात..
ईतर दिवशी वेगळा आणि पी.टी. च्या दिवशी वेगळा...

आम्हाला एकदा घेतलेला रिलाईबल (Reliable) कंपनीचा रेनकोट दोन तीन वर्ष चालायचा...
आता प्रत्येक वर्षी नवीन कार्टुनच चित्र असलेला रेनकोट आणि सोबत छत्री ही लागते...

आम्ही अर्धा तास चालत मित्रांसोबत गप्पा मस्करी करत शाळा आणि शाळा ते घर गाठायचो...
आता १५/२० मिनिटावरची शाळा गाठायला सुद्धा बस किंवा रिक्षा लागते...

तेव्हा शाळेत फुल दंगा करून एकमेकांना लोळवून घरी गेलो तरी चालायचं...
आता आपल्या मुलाला धक्का लागला तरी पालक तक्रार घेऊन शाळेत पोहोचतात....

तेव्हा बाबा लाईफबॉय साबणाच्या लाल वडीचे दोन तुकडे करायचे आणि आम्ही डोक्यापासून पायापर्यंत तोच साबण वापरायचो...
आता केसांना वेगळा शॅम्पू, चेहेऱ्याला वेगळा साबण, शरीराला वेगळा साबण, ताईला वेगळा साबण, दादाला वेगळा साबण, आईला वेगळा साबण, बाबांना वेगळा साबण लागतो.
तेव्हा आई ५०१ साबणाच्या बार चे चार तुकडे करायची आणि तेच सर्व कपड्यांना वापरायची....
आता वेगळ्या कपड्यांना वेगळा साबण आणि पावडर लागते, वेगळी निळ लागते, स्टार्च ला वेगळं आणि सुगंध यायला वेगळं लिक्विड साबण लागत....

तेव्हा आम्ही सणासुदीला
अत्तर वापरायचो.
आता रात्रंदिवस फॉग चालतोय....

तेव्हा पावसाळ्यात चिखल उडू नये म्हणून पायल स्लिपर्स ला मागे रब्बर लावायचो.
आता घरी वापरायला वेगळी, बाहेर वापरायला वेगळी, पावसाळ्यात वापरायला वेग वेगळी चप्पल लागते...

तेव्हा पावसाळ्यात खाली खराब होऊ नये म्हणून फुल पॅन्ट वर दुमडून विशिष्ट पिन असलेल्या रबर ने फिट्ट करत असायचो.
आता खास पावसाळी कपडे, हाफ पॅन्ट वापरतो.

तेव्हा शाळा सुटली कि... आवळा, बोर, चिंच, पेरू, काळ मीठ, कलर वाला बर्फाचा गोळा खात घर गाठायचो....
आता... कुरकुरे, कॅडबरी, किंडर जॉय, पेप्सी कोला, वेफर्स खातात मुलं....

तेव्हा पेरुवाल्याकडे सहा मित्र जायचे, दोन मित्र दोन पेरू विकत घायचे बाकीचे चार मित्र गलका करत किमान दोन पेरू तरी ढापायचे..

तेव्हाचे पालक अश्या गोष्टींना मुलांचा खोडकरपणा समजायचे.. आताचे पालक चोरी समजतात ...

तेव्हा वाढत्या अंगाचे कपडे मिळायचे
आता तोकड्या अंगाचे कपडे मिळतात..

तेव्हा हे अनुभवायला मिळायचं
आता हे वाचायला लागतयं...

🌸🌸😊😊🌸🌸😊😊🌸🌸

कधी कधी वाटत कि आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नंया पेक्षा
तुटलेली खेळणी आणि
अपुरा गृहपाठ खरच खुप
चांगला होता. झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात , पण ती स्वप्ने खरी
होतात ज्यासाठी तुम्ही
झोपणे सोडून देता.

मित्र

आणखी एक शाळेची आठवण.!
शाळेत आपन ज्या मुलीवर लाईन मारायचो😯😯

त्या मुलीला सरानी काही विचारले तर अख्खा वर्ग आपल्याकडे
पाहायचा
हे साले मित्र सगळे असेच असतात,
चिडवून
सतावून
जीव
नकोसा करतात,
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात.............


लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून

" आयटम सही है "
म्हणून चिडवतात , मात्र लग्ना नंतर तीलाच
आदराने
' वहिनी ' अशी हाक मारतात
हे साले मित्र सगळे असेच असतात...............

जेवतांना एकमेकांच्या डब्यावर
सगळ्यांचीच नजर असते,
खास पदार्थ सर्वाना पुरेल , याची मात्र
खात्री नसते.
पण.....................
एखाद्या दिवशी डबा नाही आणला,
तरी आपलेच ताट
इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...................

नाक्यावारती गप्पा मारताना..
तीन में पाँच -
बिस्किट अन् चहाची अशी आँर्डर सुटते,
बिल भरण्याची वेळ
आली कि सर्वांचीच
पांगा पांग
होते ,
मात्र
अचानक
कधी बाबाना admit करावे
लागते,
"आहोत आम्ही पाठीशी" म्हणत
advance
नकळत भरले
जाते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...........................

अवचित
एखादा प्रसंग ओढावला तर, सख्खे
नातेवाईक
ही
पाठ
फिरवतात,
अशावेळी छळणारे हेच
मित्र
पाठीशी भक्कमपणे उभे राहतात,
रक्ताच्या नात्या पेक्षा ही मैत्रीचे
नाते श्रेष्ठ ठरवितात.
हे साले मित्र सगळे असेच असतात........................
चिडवून
सतावून जीव
नकोसा करतात.
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात..........................
 जी गोष्ट आई वडिलांना माहित नसते ती मित्रांना  माहित
असते........................


जी गोष्ट शिक्षकांना माहित नसते ती मित्रांना  माहित असते..............


जी गोष्ट गर्ल फ्रेंडला माहित नसते ती मित्राला माहित असते..................


जी गोष्ट बायकोला देखील  माहित नसते ती मित्रांना  माहित असते...................


आई वडिलांचं एवढंच काय पण बायकोचं सुद्धा उष्टं
खाताना कधी कधी मन संकोच करतं.
पण मित्राचं उष्ट मात्र बिनधास्त चालते..........................


मित्रांवर जळलो असेल मनातून.
 खरं आहे.

पण .....................








शेवटी कोण रडलं नाही तरी मित्र मात्र जिथे असेल तिथे
डोळ्यात पाणी काढेल हे नक्की...........................
Dedicated to all friends

शाळा

शाळेत असताना शाळेच्या
खिडकितुन 🖼बाहेरचं जग फार छान
वाटायचं . बाहेर सायकल ,🏍 गाडीवर
फिरणारे लोक किति लकी आहेत,
मोकळ फिरतायत अन मी मधे अडकलोय वाटायचं ....

आज कळतय की त्या बाहेरच्या
लोकांना किती ताणतणाव आहेत ,
कारण मीही आज त्या बाहेरच्या
गर्दिचा भाग आहे ...

त्यामुळं शाळेतच बरा होतो कारण
तिकडे जगाचा ताणतणाव तर नव्हता.😞
.
.
.
.
शाळा एक आठवण
BY Marathikhichadi

एक गोंडस मागणी.....

एक गोंडस मागणी.....
👶एक छोटासा मुलगा आई वर
 चिडून घरा बाहेर बसला होता......

😍बाबा:-काय झाले बाळा????
मुलगा:-तूमच्या बायको सोबत
 माझे पटत नाही;
मला माझी बायको पाहिजे.....

 ......विषय संपला....... —

Aata urali fakt Duniyadari

गल्लीतल्या क्रिकेटचे नियम==
1.एक टप्पा आऊट.
2.जिंकेल तो पहिला.
3.कट ला एक.
4. टॉससाठी उन्हाळा का पावसाळा.
5 .बॉल घरात गेला की आऊट.
6. भिंतीला फूलटॉस लागला की आऊट.
7.जो कोण लांबचा शॉट मारेल त्यानेच बॉल
आणायचा.
8.पहिल्या बॉलवर आउट झाला की म्हणणार....
अरे यार ट्रायल बॉल होता राव.
9.गटारी मध्ये बॉल गेल्यावर बॅट्समननेच काढायचा...
काय छान दिवस होते राव ते.....
आठवत असतील हे नियम तर जरूर शेअर करा!
शाळा आमची छान होती,
.
.
.
Last bench वर आमची Team होती ….
.
.
.
जन-गण-मन ला शाळे बाहेर सुद्धा उभे
रहायचो …
.
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू
देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो …
.
.
.
प्रार्थनेच्या वेळी मात्र….
.
सगळ्यांसारखे…नुसतेच
.
ओठ हालवायचो ….
.
.
.
पावसाळ्यात शाळेत
.
जाताना,
छत्री दप्तरात ठेऊन?
.
मुद्दामच भिजत जायचं,
.
.
.
पुस्तक भिजू नये
.
म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
.
.
.
शाळेतून येता येता …
.
एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ्
यांच्या अंगावर पाणी उडवायचं
.
.
.
प्रत्येक Off -Period ला P.T.
साठी….आमचा आरडाओरडा असायचा …
.
.
.
शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा
गोळा संपवायचा ….
.
.
.
>इतिहासात होता शाहिस्तेखान
.
>नागरिक शास्त्रात पंतप्रधान
.
>गणित… भुमितीत होतं …
.
पायथागोरसच प्रमेय…
.
>भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉ न्सून
.
का कुठलेतरी … वायव्य….
.
>हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”
.
>English मधल्या Grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
.
शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen
ने
त्या “Pen-fights”
.
खेळणं ….
.
.
.
Exams मधल्या
.
रिकाम्या जागा भरणं…
.
आणि जोड्या जुळवणं …
.
.
.
.
.
पण आता शाळा नाही, मित्र नाही,
.
परीक्षा नाही,
.
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
.
रुसवे फुगवे नाही.....I
.
.
..
आत्ता उरलीय फक्त
.
"दुनियादारी".।।।।
MISSING THAT GOLDEN DAYS OF LIFE.

कागदाची "नाव" होती...
पाण्याचा "किनारा" होता...
आईवडिलांचा "सहारा" होता...
खेळण्याची "मस्ती" होती...
मन हे "वेडे" होते...
"कल्पनेच्या" दुनियेत जगत होतो ...
कुठे आलोय या,
"समजुतदारीच्या" जगात...
या पेक्षा ते भोळे,
"बालपणचं" सुंदर होते...!!!