Showing posts with label Relationship Sms. Show all posts
Showing posts with label Relationship Sms. Show all posts

कुत्रा आणि गाढव

एकदा कुत्र्यात अन गाढवात
पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन.
तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.

ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले ,

कुत्र्याला वाटले मीच जिंकेन .

कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो ,

पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते .

शर्यत सुरु झाली

कुत्रा जोरात धाऊ लागला.

पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली ,

असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले

कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला

तर बघतो

तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते

तिकडे अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते
अन ते बघून

निराश झालेला कुत्रा बोलला कि

जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते

तात्पर्य काय
१.आपल्याना विश्वासात घ्या

२.आपल्याना  पुढे जाण्यास सहकार्य  करा,त्याना प्रोत्साहन  द्या

३.नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील

४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा

       *🙏आपली_माणसं🙏_मोठी_करा*

मी अणि मी

लेखक कोण आहे माहीत नाही , परंतु खूप मस्त लिहिलं आहे .

*जगण्याचं सूत्र चुकतंय का?* 

         भाऊ काय बहीण काय 

         नुसता फापट पसारा,  

         कोण कोणाला विचारतंय 

         कुणालाही विचारा ...

कुणी कोणाकडे जाईना

कुणी कुणाकडे येईना, 

जगलात काय मेलात काय 

माया कुणाला येईना ...

         संवेदनशीलता आता 

         फारशी कुठं दिसत नाही,  

         बैठकीत किंवा ओसरीवर 

         गप्पाची मैफिल बसत नाही ...

पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी 

इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड,  

यातच हल्ली माणसाचा 

होत आहे The End ...

         Luxury मधे लोळतांना 

         फाटकं गाव नको वाटतं,  

         जवळचं नातं असलं तरी 

         सांगायलाही नको वाटतं ...

उच्च शिक्षित असूनही 

माणूस आज Mad वाटतं,  

इंटेरियर केलेल्या घरामधे 

लुगडं, धोतर Odd वाटतं..  

         सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे

         कसे काय Posh असतील?  

         पार्लर मधून आणल्या सारखे 

         चिकणे चोपडे कसे दिसतील? 

उन्हा तान्हात तळणारी 

माणसं काळी पडणारच,  

गरिबीनं गांजल्यावर 

चेहऱ्याचा रंग उडणारच ...

         कुरूप ते नाहीत 

         कुरूप तू झालास,  

         प्रेम नात्यावर करायचं सोडून

         दिसण्याला भुलून गेलास ..  

..

         पात्र कितीही मोठं झालं 

         तरी गंगेचं मूळ विसरू नये,  

         सुख असो का दुःख असो 

         आपल्या माणसाला विसरू नये.  

दिसण्यावर प्रेम करू नकोस 

आपलं समजून जवळ घे,  

एरव्ही नाही आलास तरी 

दिवाळीला तरी घरी ये..  

      कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास 

      माणसावर प्रेम करायचं शिक,  

      नाहीतर मानसिक आरोग्यासाठी 

      दारोदार मागत फिरशील भीक ...

दुसऱ्याचा  छळ करून 

तुम्ही सुखी होणार नाही,  

पॅकेज कितीही मोठं असू द्या 

जगण्यात मजा येणार नाही. .  

       जग जवळ करतांना 

       आपली माणसं तोडू नका,  

       अमृताच्या घड्याला 

       अविचाराने लाथाडू नका..!

*मी का बोलू?*

*मी का फोन करू?*

*मी का कमीपणा घेऊ?*

*मी का नमते घेऊ?*

*मी का नेहमी समजून घ्यायचं?*

*मी काय कमी आहे का?"*

असे बरेच सारे *"मी"* आहेत ,

जे आयुष्यात विष कालवतात ...

म्हणून , अरे अतिशिकलेल्या माणसा *मी पणा* सोड नि

नाती जोड़ .🙏🏻🙏🏻🙏🏻 कोणी लिहिलय माहीत नाही पण ........ प्रयत्न करतोय मी पणा कमी करणेचा बघा तुम्हाला ही जमतंय का ? 🙏🏻👍🏻

नाते

नातं *.Hang.* झालं की,
एकदा तरी*.Restart .*करून बघावं...

न जाणो परत छान *. Network .*मिळाल तर......
त्या साठी नाती *Switch off .*करायची
काय गरज.....

🌹नाती 🌹

   🌹 ||   *आई- वडील*  ||🌹
*सार्वकालीन  सर्वश्रेष्ठ मानवी नातं
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं, आपल्या घराची जीवित दैवत, तीर्थाचे  सागर , स्नेहाचे आगर
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती, आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर.

       🌹 || *गुरुजन* ||🌹
आपल्या भविष्याचे शिल्पकार
आपल्या जीवनाचा प्रकाश
अज्ञान दूर करणारे वासरमणी
मानवतेचे महादूत.

  🌹 || *आजी - आजोबा* ||🌹
आपले जीवन फुलविणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश, स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती.

      🌹 || *सासू - सासरे* ||🌹
आपल्याला जन्म न देणारे आईवडील
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप.

   🌹|| *काका - मावशी* 🌹
आई वडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या  सागर - सरिता
विशुध्द भावाचे चिंतामणी.

       🌹|| *आत्या - मामा* ||🌹
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती.

             🌹|| *मामा* 🌹
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा, आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार.

            🌹|| *मामी* 🌹
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती.

           🌹|| *दाजी* 🌹
आपल्या आदर भावाचं शिखर
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक.

         🌹 || *बहिण* ||🌹
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका, कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका.

           🌹|| *भाऊ* ||🌹
आपल्या हिमतीच्या धमन्या, आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं,
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं,
आपल्या आवाजातील निनाद.

           🌹||  *साडु* 🌹
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं. इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ.

        🌹 || *मेहुणी* ||🌹
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता, आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी.

  🌹|| *मावस भाऊ - बहीण* 🌹
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस, बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय.

  🌹|| *मेव्हणा भाऊ - बहीण* ||🌹
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी, थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग.

     🌹|| *भाचे - भाची* ||🌹
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे,
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं.

          🌹|| *पुत्र* ||🌹
भविष्याचा प्रकाश, अस्तित्वाचा अर्थ,
वंशाचा कुलदीपक,कुटुंबाचा उध्दारक
म्हातारपणीची काठी.

       🌹 || *मुलगी*  ||🌹
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण,
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी,
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक,
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा, जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती.

         🌹 || *नातवंडे* ||🌹
दुधावरली साय, आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा,
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट.

          🌹 || *मित्र मैत्री* ||🌹
ईश्वरी वरदान, रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं, विश्वासाची आधारशीला,  स्वतःचेच प्रतिरुप.

       🌹 || *शेजार धर्म* ||🌹
मानवी मूल्यांचा ओझोन, संस्कृतीचा संधीप्रकाश, आपल्या  सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन.

       🌹|| *शिष्य* ||🌹
आपल्या कर्तृत्वाचा कळस व
आपल्या कौशल्याची किरणं.

*खरंच* .... *माणुस* नाते जपतो का ?
जो जपतो नात तोच खरा  माणुस .  
नातं जोपासणारा माणूस जणू पिसारा फुलवलेला मोरच ! नाही का ?

               🙏🙏💐🌷

💐🌹अपेक्षा अशी असावी ,
           जी ध्येयापर्यतनेणारी..
            ध्येय अस आसावं ,
       जे जीवन जगने शिकवणारं..
             जगनं अस असावं ,
       जे नात्यांची कदर करणारं..
              नाती अशी असावीत ,
       जी रोज आठवण काढण्यास
                भाग पाडनारी...!

कोणतंच नात warranty card घेऊन येत नाही...
त्यामुळे बिघडल तर repair करायचं असतं...
संपल तर refil करायचं असतं आणि जुनं झालं तर refresh करायचं असतं....!
कारण नात्यांची मजा हळुवार उलगडण्यातंच असते....!🐾

   💐🙏🏻शुभ सकाळ🙏🏻💐

छापा असो वा काटा असो..... नाणे खरे
असावे लागते.....
प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध
असाव्या लागतात.....
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या
फांदिसारखी.....
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण
मने मात्र कायमची तुटतात.....

" चुका" तर "देवात" पण काढतात.

नाते कितीही वाईट असले तरी
ते कधीही तोडू नका,

कारण पाणी कितीही घाण
असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते...

"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...,

लोकांच काय लोक " चुका" तर "देवात" पण काढतात.

अशी नाती हवी....

मन वळु नये,
अशी श्रध्दा हवी.
निष्ठा ढळू नये,
अशी भक्ती हवी.
सामर्थ्यँ संपू नये,
अशी शक्ती हवी.
कधी विसरु नये अशी  नाती हवी....

Naati

नाते कितीही वाईट असले तरी
ते कधीही तोडू नका ,

कारण पाणी कितीही घाण
असले तरी ते तहान नाही पण आग विझवू
शकते...

"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला
पाहीजे...,

लोकांच काय लोक " चुका"तर"देवात" पण
काढतात।!!!

नशीबच लागते

विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,

बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते,

प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,

पण

पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!

॥शुभ सकाळ॥

॥शुभ दिन॥

अंतर्गत एकता ठेवा

रावण जेव्हा म्रुत्युशी zunj देत होता, तेव्हा रामाला ek चांगली गोष्ट सांगून गेला ,
कि मी तुज्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत मोठा आहे .वयाने ,बुद्धीने ,ताकदीने ,माजं कुटुम्ब सुध्दा तुज्या कुटुम्बापेक्षा मोठ आहे.
हे एव्हड सगळ असताना सुध्दा मी हरलो का ??
तर भाऊ तुज्या बरोबर होता आणि भाऊ माज्या विरोधात होता !
म्हणून मित्रांनो अंतर्गत एकता ठेवा ,कारण    

"किसी भी पेड़ के कटने का किस्सा ना होता, अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा न होता..,."

"माणुसकीचं" एक सुंदर नातं

"दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक " दिपमाळ"
तयार होते,

फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक "फुलहार" तयार
होतो..

आणि

माणसाला माणूस जोडत
गेलं की "माणुसकीचं" एक
सुंदर नातं तयार होतं..

नाते

"दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक " दिपमाळ"
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक "फुलहार" तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की "माणुसकीचं" एक
सुंदर नातं तयार होतं..

नातं महत्वाचे असतं

कामापुरते गोड बोलून वार करणारे सारेच असतात
पण नात्यात गोडी ठेवून सोबत राहणारे क्वचितच सापडतात
लोभ नसतो कशाचा फक्त नातं महत्वाचे असतं
असे लोक मात्र नशिबानेच मिळत असतात .....

Relationship

एक आस, एक विसावा...
तुमचा मेसेज रोज दिसावा...
तुमची आठवण न यावी तो दिवस नसावा...
हृदयाच्या प्रत्येक कोप-यात,
तुमच्या  सारख्या जिवलगांचा सहवास असावा..

Nati

नात ते टिकते ज्यात शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त,
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो...!!
          💐💐शुभ सकाळ💐💐

Relations

नातं मनापासून असेल....तर टिकतं...
नातं सहज स्वीकरलं असेल...तर फुलतं...
दोन धीराच्या शब्दांनी...नातं
उमलतं....
विश्वासाच्या आधारावर ...नातं बहरतं...
सहज संवादाने ...नातं सुगंधीत होतं...
मतभेद समजून घेतलें तर...नातं भक्कम होतं...
मनाला मन समजलं की...नातं छान गुंफतं..
दूर असो वा जवळ..खरं नातं अभंग असतं...!!
💐🍃शुभ सकाळ 🍃