Showing posts with label Family SMS. Show all posts
Showing posts with label Family SMS. Show all posts

Brother Sister Relations

भाऊ आणि बहिणीने हे स्टोरी नक्की वाचा डोळ्यात पाणी येईन अशी शब्द रचना😢😢😢😢

💕भाव बहिणीचं नातं खूप गोड असत
म्हणून भांडण झाल तरी एकमेका कडे ओढ असते💕

" एकदा तुझं लग्न झाल ना की मग संपली जबाबदारी..."  आणि हा  "तुझ्या लग्नात मी अजिबात रडणार नाही " अस म्हणणारा तो भाऊच असतो...

"चल हट ...काळी कुठली..तुझ्यापेक्षा मीच गोरा आहे.." अस म्हणून चिडवणारा तो भाऊच असतो...

सर्वाचे कपडे आपल्या पसंतीनुसार घेतो आणि स्वतःचे कपडे बहिणीच्या पसंतीनुसार घेणारा तो भाऊच असतो...

ही स्टाईल मला शोभुन दिसेल का..? अस १००वेळा विचारणारा तो भाऊच असतो...

"मला नवीन गाडी घ्यायची आहे प्लीज बाबांना सांग..?" असा मस्का मारणारा तो भाऊच असतो...

"माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाही,..असे म्हणून बहीणीचा फोन हक्काने घेणारा तो भाऊच असतो...

दादागिरी करून स्वतःचे कपडे धुवायला लावणारा तो भाऊ च असतो..

घरात जरी बहीणीशी भांडण झालेले असले तरी चारचौघात तिची स्तुती करणारा तो भाऊच असतो...

"आई..तु हीला समजावून सांग..नाहीतर मी हीला मारीन बरं का..?" असा टपोरी भाषेत धमकी देणारा तो भाऊच असतो...

परंतु.......

बहिणीच्या लग्नात शांतपणे
एका कोपर्यात....
आपलं तोंड लपवून ढसाढसा
रडणारा...तो...भाऊ..च असतो...!

ज्यांना बहीण आहे ते खरच खुप नशीबवाण आहे कारण बहीणीच्या तोंडुन शिव्या खाण्याचा आनंदच वेगळा असतो☺😛😄😃😌😙

खरचं बहीणीची काळजी घ्या कारण बहीन तुमच्यासंघ आयुष्यभर नही राहात

वेगळं राहायचं सुख ।
ऊन ऊन खिचडी, साजुकसं तुप,
वेगळं राहायचं भारीच सुख !
एक नाही दोन नाही माणसं बारा,
घर कसलं मेलं ते बाजारच सारा.
सासुबाई- मामंजी,नणंदा नी दीर,
जावेच्या पोराची सदा पीर पीर.
पाहुणे रावळे सण नी वार,
रांधा वाढा जीव बेजार.
दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक,
वेगळ राहायचं भारीच सुख!
सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ,
प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू,
अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु.
चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,
वीतभर लाकडाला हातभर ढलपी.
बाबांची माया काय मामंजीना येते ?
पाणी तापवलं म्हणुन साय का धरते?
बहीण अन् जाऊ यात अतंरच खुप,
वेगळं राहायचं भारीच सुख !
दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,
दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा.
दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,
गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायचं .
आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,
फिटतील सा-या आवडी निवडी.
दोघांचा असा स्वयंपाकच काय?
पापड मेतकुट अन् दह्याची साय ,
त्यावर लोणकढ साजुक तुप,
वेगळ राहायचं भारीच सुख. !
रडले पडले नी अबोला धरला,
तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.
पण मेलं यांचं काही कळतंच नाही,
महिन्याचा पगार कसा पुरतंच नाही.
साखर आहे तर चहा नाही,
तांदुळ आहेत तर गहु नाही.
ह्यांच्याही वागण्याची त-हाचच नवी,
घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी.
बाळ रडलं तर ते खपायचं नाही,
मिनीटभर कसं त्याला घ्यायचंही नाही.
स्वयंपाक करायला मीच,
बाळ रडलं तरी घ्यायचं मीच.
भांडी घासायची मीच,
अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.
जिवाच्या पलीकडे काम झालं खुप,
वेगळं रहायचं कळायला लागलं सुख. !
सासुबाई रागवायच्या पण ब-याच होत्या,
सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या.
मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,
बाजारहाट करायला भावजी जायचे.
कामात जावेची मदत व्हायची,
नणंद बिचारी ऊर नि पुर निस्तरायची.
आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,
बारा महिन्याला एकच साडी!
थंडगार खिचडी, संपलंय तुप,
अन् वेगळं व्हायचं कळलंय सुख.!!!

सासूबाई (नव्या सुनेला) :- या घरात मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच सांभाळते.
तुझे सासरे परराष्ट्र तर
तुझा नवरा अन्नपुरवठामंत्री आहे.
तुझी नणंद नियोजन मंत्रालय सांभाळते.
तुला कोणतं खातं हवं...?
.
सूनबाई :- मी विरोधी पक्षात बसते अन बघते तुमच सरकार कस बदालता येईल ते😃😃😂😂😂

सासरवाडी हा माझा देश आहे.........
माझे मेव्हणे माझ्या बायकोचे बांधव आहेत........
माझ्या बायकोवर माझे प्रेम आहे.......
तिच्या सामुदायीक विविधतेने
जोडलेल्या संपत्तीवर माझा डोळा आहे........
तिच्या बापाची संपत्ती लुटण्याची माझ्या अंगी
पाञता यावी म्हणुन
मी सदैव प्रयत्न् करीन.
मी माझ्या सासुचा मान ठेवीन
आणि माझ्या मेव्हणीला पटविण्याचा प्रयत्न
करीन.
माझी बायको आणि माझी मेव्हणी यातच
माझे सौख्य सामावले आहे.
||जय बायको जय मेव्हणी||...........
😝😛😝😛😛 🌹

Age & salary

कोणत्याही स्त्रीला तिचे वय आणि कोणत्याही पुरुषाला त्याचा पगार कधीही विचारू नये....
याच्या पाठीमागे एक मजेदार गोष्ट लपलेली आहे.....
कोणतीही स्त्री स्वतःसाठी कधीही जगत नाही आणि कोणताही पुरुष स्वतःसाठी कधीही कमवत नाही.....!

बाजीराव ने इश्क किया है.. अय्याशी नही...

बाबा : काय चाल्लय तुझ..?? तुझा खर्च आता आम्हाला परवडत  नाही..त्या पोरगीला घेउन दिवसभर फिरतोस.. लोक चर्चा करतात.. काय सांगायच त्यांना.. ??
.
.
.
.
.
.
मुलगा : बाबा... बाजीराव ने इश्क किया है.. अय्याशी नही...
.
.
.
.
.
.
बाबांनी तुडवून तुडवून मारला...😝😝😝😝😝😂😂😂😂😂

Ek Bahin

💖बहीण 💖                        
       💖एक अनोखं नातं💖

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे "बहीण...."
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली...
आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली... कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते...
गुणांचं तोंड भरून कौतुक करते...
अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते...
बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते...
‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो...
तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!

Bhau

रावण जेंव्हा मृत्यूशी झूंज देत होता,
तेंव्हा रामाला एक चांगली गोष्ट सांगून गेला,
कि मी तुझ्या पेक्षा प्रत्येक गोष्टीत मोठा आहे. वयान, बुद्धीन, ताकतिन, माझ कुटुंब सुध्दा तुझ्या कुटुंबा पेक्षा मोठ आहे.
हे एवढ सगळ असताना सुद्धा मी हरलो का?
तर तुझा भाऊ तुझ्या बरोबर होता आणि माझा भाऊ माझ्या विरोधात होता .
म्हणून अंतर्गत एकता ठेवा कारण
[किसी भी पेड के कटने का किस्सा न होता"अगर कुल्हाडी के पीछे लकडी का हिस्सा न होता]

Family sathi Time

वडिल दिवसभर काम करुन थकून भागुन रात्री ९.३०
ला घरी येतात.
त्यांची आतुरतेने वाट बघणारा ५ वर्षाचा मुलगा दार
उघडतो.

मुलगा: मी तुम्हाला एक प्रश्र्न विचारु का?

वडिल: हो

मुलगा: बाबा, तुम्ही तासाला किती पैसे मिळवता?

वडिल: तुला काय करायचय

मुलगा: प्लिज सांगाना

वडिल: रु.500 तासाला

मुलगा: बाबा मला २५० रु. उसने देता का?

वडिल रागाने मुलाला ओरडले व म्हणाले जा झोप जा.

मुलगा बेडरुम मध्ये गेला व दार लाऊन घेतले.

काही वेळाने वडिलांचा राग शांत झाल्यावर ते
मुलाच्या खोलीत गेले व रागावल्याबद्दल
मुलाला साँरी म्हणाले व त्यानी त्याला २५० रु. दिले व
म्हणाले हे तुला घे व काय ते कर.

मुलगा: थँक यु
त्यानंतर त्या मुलाने आपल्या मनी बाँक्स उघडला व
तो त्यातील पैसे मोजू लागला व नंतर
म्हणाला आता माझ्याकडे रु.५०० जमा झाले आहेत.

मला तुमचा एक तास विकत देता काय.
प्लीज उद्या एक तास लवकर याल काय?
मला तुमच्या बरोबर जेवायचे आहे.

बापाने मुलाला गहिवरुन कवेत घेतले.
पुढचे सारे तुम्ही इमँजीन करा.

तुम्ही सारे तरुण पैसे मिळवण्यासाठी फार कष्ट करता,

पण हे विसरु नका कि त्यांच्यासाठी सुध्दा थोडा वेळ
द्या जे तुमच्यावर जीव लावत आहेत, जिवाला जीव
देण्यास तयार आहेत.

जर उद्या आपण मेलो तर ज्या कंपनीसाठी आपण
मरेस्तोवर काम करतो ती कंपनी काही दिवसातच
आपल्या जागी दुस-याची नेमणूक सहजपणे करेल.
पण
जे कुटुंबीय व मित्र तुमच्यावर जिवापाड प्रेम करतात
त्याना मात्र तुमची उणीव कायमचीच वाटेल.    👍👍👍👍👍 kharach far chhhan vichar ahe....  aplya family sathi vel dya mg bagha life kiti sundar ahe

कुटुंबापेक्षामोठं
         धन कोणतंच नाही...
वडिलांपेक्षा चांगला
         सल्लागार कोणीही नाही...
आईच्या सावलीपेक्षा मोठं
         जग कोणतंच नाही...
भावापेक्षा उत्तम
         भागिदार कोणीही नाही...
बहिणीपेक्षा जवळची
         शुभचिंतक कोणीही नाही...
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं
         दुसरं जग व जीवन
                 असूच शकत नाही.....

👪आज जागतिक कुटूंब दिन,👪

👬सर्व सदस्यांना माझ्या परीवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा!!!!.👬