हरवलेल्या कोकणची गोष्ट

*कोकणचं भोळंभाबडं गाव हरवून गेलं...*

##########################

      *पूर्वी कोकण गरीब होतं... गावे भोळी-भाबडी, साधी होती... माणसे गरीब होती... प्रेम आपुलकी होती... शेती करून पोट भरत होतो... भात, नाचणी, वरी, कुळीथ, उडीद, हरिक ही पीक पिकवून बाराही महिन्याचे दिवस उजळलेले असायचे... नानातऱ्हेच्या भाज्यांची तर कमतरता नव्हती... परसवनात आठ दिवसाने टोपलीभर भाजी तयार होत होती... शेतीला जोडव्यवसाय म्हणून डझनभर गुरेढोरे होती... घरात घागरभर दूध दुभत होतं आणि कोणाकडे नसेल तर मागील दाराने शेजाऱ्याकडून चहा पुरते आणून पाहुण्यांचे आदरातिथ्य होत होतं... डालगाभर कोंबड्याही होत्या... घरात सात आठ माणसे असूनही तीन वेळच कसंबसं पोटभर अन्न मिळत होतं... पेज, जाडा तांबडा भात, हरकाचा भात, नाचण्याची भाकरी, कुळथाची पिटी आणि कधी ना कधी सुकी भाजलेली तारली किंवा बांगडा खाऊन मन तृप्त होत होतं... त्याला अमृताची चव येत होती आणि रात्री निजताना डोक्यावर पळीभर खोबरेल तेल घसघसून घासायला मिळाले की आम्ही ऐहिक जगातल्या सुखाच्या राशीवर लोळत होतो...*
       *आमचे ते दिवस मंतरलेले होते... पैसा गाठीला नसला तरी ते वैभव आणि खरी श्रीमंती होती... दरम्यानच्या काळात आम्ही परंपरे प्रमाणे मुंबईत आलो आणि मुंबईतल्या जीवनशैलीचे गावाला बरे वाईट परिणाम दिसू लागले... गेल्या काही वर्षात हळू हळू कोकणची जीवनशैली बदलू लागली आणि आमचे भोळे भाबडे गाव हरवून बसलो... गावात शहरी जीवनशैलीचं अनुकरण होऊ लागलं... आता तसेच झाल्याचे दिसून येते... दिवस बदलत आहेत... गावात सरकारच्या आशीर्वादाने पिवळ्या आणि केसरी रेशनकार्डावर तीन रुपयात तांदूळ आणि दोन रुपयात किलोभर गहू मिळू लागले आणि नाचणी, वरीची भाकरी मागे पडत चपाती दिसू लागली... हरिक, वरी ही कॅल्शियम युक्त धान्ये जवळ जवळ संपून गेली... आता तर आम्ही जमिनीच संपवायला निघालोय, परप्रांतियांच्या घशात घालून.!*
       *चहापुरते दूध, सारवायला शेण हवे म्हणून गुरे ठेवून कुठेतरी भात शेती दिसतेय... पण ती करताना आधुनिक यंत्राने करू लागलो... कोल्हापूरवरून येणारे वारणा आणि गोकुळ दूध व घाटावरच्या भाजीवर कोकण जगू लागले...*
       *लग्न समारंभ मुंबईसारखे होऊ लागले... पण पत्रावळीवर असलेलं भाताचे मूद, गोडी डाळ, काळ्यावाटण्याची उसळ, खीर, वडे हे आपले पारंपरिक सात्विक जेवण मागे पडले... पुऱ्या, कुर्मा भाजी, छोल्याचे जेवण मुंबईसारखे जेवू लागलो... असे नाना तऱ्हेचे बदल दिसू लागले... पूर्वीच्या नळ्याची कौलारू, लाकडी अशा गार गार आणि हवेशीर घरांऐवजी स्लॅबची आणि लोखंडाची झ्याकबाज घरे गावात दिसू लागली... आणि ती फक्त सणासुदीपुरती उघडू लागली... गावची खुशाली पत्रव्यवहार हे मोबाईल फोन, व्हाट्सअप आणि मनिऑर्डर या बँक ट्रान्सफर द्वारे होऊ लागले...*
       *सर्वसाधारणपणे सध्या मुंबईची जीवन शैली तीच कोकणची जीवन शैली बनू लागली आहे... गावची माणसे अलीकडे कामे सोडून टीव्ही सिरियल्स, मोबाईल यामध्ये गुंतलेली आहेत... आम्ही गाव सोडून मुंबईला आलो, याचे दुःख अजिबात नाही त्यामुळे प्रगती झाली, याचे समाधान जरूर आहे... पण माझे भोळेभाबडे गाव आता कायमचे हरविले याचे शल्य माझ्या मनात कायम राहणारे आहे...*
**************************************
*(कोकणची सत्य परिस्थिती मांडलेली आहे)*

⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱

बाळासाहेब ठाकरे

साहेबांचे काही वाक्ये

अन्याय करू नका, आणि सहन तर मुळीच  करू नका....
           - बाळासाहेब ठाकरे🚩

जो तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जाईल त्याचाच मान राखा.
               - बाळासाहेब ठाकरे🚩

तुकड्यासाठी शेपूट हलवाल तर तुम्ही कुत्र्याच्या आवलादीचे मानला जाणार.
               - बाळासाहेब ठाकरे🚩

हिंदूस्थानात राहून हिंदूधर्मावर शस्त्र उचलनार्याला चिरडून टाका
               - बाळासाहेब ठाकरे🚩

प्रत्येक हिंदू. हा झोपलेला वाघ आहे, फक्त जागं व्हायची वेळ आहे.
                 - बाळासाहेब ठाकरे🚩

दाऊद तुमचा तर अरुण गवळी आमचा.
                - बाळासाहेब ठाकरे🚩

गांडूची आवलाद म्हणून जगू नका.
              - बाळासाहेब ठाकरे🚩

हिंदू असून हिंदू धर्माचा अपमान करता, तर तुम्ही हिजडे आहात
            - बाळासाहेब ठाकरे🚩

मुंबई कुणाच्या बापाची नाहीए. मुंबई आपली आहे आपली...आणि इकड आवाज ही आपलाच हवा.
             - बाळासाहेब ठाकरे🚩

मला अभिमान आहे त्या शिवसैनिकांचा ज्यांनी बाबरी पाडली.
                 - बाळासाहेब ठाकरे🚩

शिवसेनेच्या नादी लागू नका. जळून भस्मसात व्हाल.
            - बाळासाहेब ठाकरे🚩

कधीही कुणाची गुलामगिरी पत्करू नका. नाहीतर तुम्ही षंड आहात हे सिद्ध होईल.
                - बाळासाहेब ठाकरे🚩

शिवसेना ही मराठी माणसाच्या मनातील एक आग आहे.  
             - बाळासाहेब ठाकरे🚩

मी उगाच मानत नाही बाळासाहेब ठाकरे यांना. त्यांचे विचार आणि हिंदू धर्मावरील कार्य आणि लढा हा मला प्रेरित करतो

बाळासाहेब नसते तर हा महाराष्ट्र  अखंड राहिला नसता

मुंबई सुरक्षित राहिली शिवसेनेमुळ. बाळासाहेब ठाकरे या नावामुळ.

मुंबई सोडा ओ .... हा महाराष्ट्र सुरक्षित राहिला तो बाळासाहेबांमुळ.......

बाळासाहेब जाता जाता सांगून गेले.
    "रडायचं नाही, लढायच"....

      एक कट्टर हिंदू
  🚩
        : बाळासाहेब ठाकरेंच एक वाक्य कायम लक्षात ठेवा

"ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेड म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवितात आणि हुशार लोकं तोच इतिहास वाचतात...!!!"
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹
💐💐💐💐💐💐💐💐   
   🚩🙏जय महाराष्ट्र🙏🚩

आदर्श गाव बामण डोंगरी

*👉*बामणडोंगरी *  एक आगळेवेगळे आदर्श गाव .... 👌👌*

               * पनवेल * पासून 14 की मी *व्* *मुम्बई * पासून फक्त 35 कि. मी. अंतरावर *बामणडोंगरी * गाव* आहे. गावाची एकूण लोकसंख्या पाच हजाराच्या वर आहे.
             
*गावाचे आगळेवेगळे उपक्रम*

*१)* गावात एकच पिठाची गिरणी आहे. जे ग्रामपंचायतचा कर १००% भरतात त्यांना वर्षभर दळण मोफत दळून मिळते.
*२)* गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
*i)* पिण्याचे RO चे पाणी
*ii)* वापरायचे पाणी
*iii)* साधे पाणी
*iv)* गरम पाणी

  पिण्याचे RO चे पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत. ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
  गरम पाणी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
*३)* ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
*४)* गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
*५)* गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
*६)* गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
*७)* नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
*८)* सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
*९)* संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
*१०)* लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
*११)* एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
*१२)* हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
*१३)* ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या व बाके आहेत.
*१४)* गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
*१५)* गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
*१६)* गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व देणगीदार गावकऱ्यांना मोफत जेवन देतो.
*१७)* गावात ग्रा. पं. द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
*१८)* गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
*१९)* सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिबय पक्ष नाही.
*२०)* प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
*२१)* घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
*२२)* गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
*२३)* गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
*२४)* धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत
*२५)* ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .

*२६)* ग्रामपंचायत कार्यालयात  व सभागृहात वातानूकुलित ( ए.सी.) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
  
*👉 असे हे आगळेवेगळे आदर्श गाव .... 👌👌*

आपल्या गावात आशी व्यवस्था व्हावी वाटेत आसेल तर गावातील सर्व नागरिकांना हा मेसेज पाठवा आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केले तर आपलेही गाव आदर्श गाव बनेल

*धन्यवाद .... 🙏*

(ही बातमी आपल्या *सरपंचा* पर्यंत जाऊ द्या ....)