HR : कूठे गेला होतास ?
Employee : केस कापायला..
HR : ऑफिस टायमींग मध्ये ?
Employee : केस पण तर
ऑफिस टायमींग
मध्ये वाढलेत..
HR : घरी असताना पण
वाढत असतील ना
तुझे केस ?
Employee : टकल्ल थोडेच केलेय ...
जेवढे ऑफिस टायमींग मध्ये
वाढलेत ..तेवढेच कापलेत..😀😀😀
Hair Cutting
Bonus
एकदा बायको आपल्या नवर्याला विचारते,
या जगात वजन,ऊँची ,वेग ,अंतर हे सगळं मोजायला एकक आहे..
.
.
.
.
.
.
जसं आपण वजन किलो मध्ये अणि अंतर किलोमीटर मधे मोजतो पण . . ..
.
.
.
.
.
.
प्रेम
.
.
.
.
विश्वास
.
.
.
.
.
.
मैत्री
.
.
.
.
.
.
सुख
.
.
.
.
.
.
दुःखं
.
.
.
.
.
हे सारं मोजायला काहीच कसं प्रमाण
नाही रे..
.
.
.
.
..
.
असं का असत रे?
?
?
?
?
?
?
?
?
?
तो खुप विचार करतो
😕😕😕😕
.
.
.
.
.
तिचा हात हातात घेतो तिच्या डोळ्यात बघतो,
अणि म्हणतो" हे
बघ "
.
.
.
.
.
.
.
.
अगोदरच कंपनीत बोनस नाही झालाय.....
त्यात तू डोक खाऊ नको...
नाहितर एकाबुक्कीत दात पाडीन..
😀😆😆😆😆😂
Bonus
बोनस म्हणजे काय ?
काळजीपूर्वक वाचा
कामगार जगतात मालकाकडुन प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पुर्वी पद्धत होती.
जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यानी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत आणली. आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वषात 52 आठड्यांचा पगार मिळत होता. 4आठवड्यांचा एक महीना धरला असता वर्षामध्ये 13 पगार मिळायलाच हवेत. परंतु इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात.
ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा 13 पगार मिळण्या करीता महाराष्ट्रात त्यावर निदर्शने झाली. आणि त्यातुन तेरावा पगार द्यावा लागणार या विचाराने तो कसा देता येइल ह्यावर विचार विनिमय होताना तो कधी द्यायचा हे ठरले. भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्या सणाच्या आधी एक पगार द्यायचा असे ठरले. तेव्हा दिवाळीचा बोनस द्यायच्या नियम भारतात लागु झाला.
अत्ताच्या कंपन्या बोनस देतो म्हणजे आपण कामगारांवर उपकार करतो असे त्याना वाटते. परंतु इंग्रजी पद्धत व भारतीय अर्थ व्यवस्था याचा योग्य मेळ घालण्यासाठी केलेली ती एक योग्य उपाय योजना आहे. हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे.
30 जुन 1940 साली याचा निर्णय होवून तो कायदा लागु झाल होता.
हे महत्व कित्येकाना माहीत नाही. म्हणुनच आज आपणास या द्वारे देत आहे.
आपल्या सर्व कामगार मित्रांना शेर करा
माझी नोकरी म्हणजे .......
माझी नोकरी म्हणजे याहूनही खूप काही आहे ,
ती माझा मोकळा श्वास आहे ,
समदुःखी मैत्रीणीँचा सहवास आहे ,
जीवनविषयक अभ्यास आहे ,
तो माझा आत्मविश्वास आहे ,
मनमोकळ्या हास्याचा तास आहे ,
अनुभवाचे आकाश आहे ,
चार भिंतीबाहेर पडण्याचा पास आहे ,
तिथ काम असूनही विश्रांतीचा भास आहे ,
घरगुती ताणतणावातून सुटकेचा निश्वास आहे ,
कर्तुत्व सिद्ध करायचा ध्यास आहे ,
म्हणून जाण्यायेण्याचा त्रास आहे तरी मला नोकरीची आस आहे .
(नोकरी करणाऱ्या व करत होत्या त्या माझ्या प्रत्येक
मैत्रिणीसाठी )
जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर ................,
स्टाफने उशिरा आलेलं त्यांना
अजिबात चालायचं नाही.
उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा......
त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं...........
तब्बल दहा जणांना केबिनमधे बोलवण्यात आलं............,
सगळे लाइनित खाली मान घालून ऊभे होते.
जोशी साहेबांच्या डोळ्यातून अंगार निघत होता आणि त्याची धग एसीत पण जाणवत होती.
एवढ्यात प्यून मिठाइचा बाॅक्स
घेउन आला...
साहेब उठले ......
जळजळीत नजर टाकत त्यांनी प्रत्येकाच्या हातात मिठाइ दिली आणि म्हणाले “खा."
कोणाला काहीच कळत नव्हतं
पण सगळ्यांनी मिठाई खाल्ली.
"अभिनंदन" जोशी गरजले.
"मला अतिशय आनंद आहे की आपल्या ऑफिसमधल्या दहा लोकांच्या बायका प्रेग्नंट आहेत.........
आणि त्याहूनही आनंद म्हणजे सगळ्यांची सोनोग्राफी आजच होती"
"मुर्खांनो मश्टरवर कारण लिहिताना ‘Same As Above' लिहीता........ ,
अरे वरच्याने काय लिहीलय हे वाचायची तरी तसदी घ्या".
😜😜😜गमतीचा भाग म्हणजे त्या दहाजणात दोन बायकाही होत्या😆😆😆
3 Types of people in office
Office मध्ये
3 प्रकारच्या व्यक्ती
सापडतात . . .
1. कष्टाळू 😓
.
.
.
2. कष्ट टाळू 😋
.
.
.
3 कसं टाळू 😏 . . .
😀😜
Bhagavatgita at work
कंपनी भगवतगीता...हे पार्थ
।। तू मागच्या इन्क्रीमेंटबद्दल पच्छाताप करू नको ।।
।। तू पुढच्या प्रमोशनचीही चिंता करू नको ।।
।। फक्त आपल् आताच कर्तव्य पूर्ण करत प्रसन्न राहा ।।
।। तू जेव्हा नव्हतास तेव्हाही ही कंपनी सुरूच होती ।।
।। तू नसशील तेव्हाही ही कंपनी चालूच राहील ।।
।। जे टारगेट आज तुझ्यासाठी आहे ते काल दुसऱ्या कुणासाठी तरी होत ।।
।। तेच उद्या आणखी कुणाच् तरी असेल ।।
।। तू हेच सगळ तुझ आहे, अस समजून मग्न झाला आहेस ।।
।। हेच तुझ्या समस्त दुःखाच कारण आहे ।।
।। प्रमोशन, इन्क्रीमेंट, सुट्टी, बोनस आणि इंसेंटिव्ह असे शब्द मनातून काढून टाक ।।
।। मगच तू कंपनीचा आणि कंपनी तुझी होऊ शकेल ।।
😳Only for private sector people😷
เคाเคฎाเคฒा เคฒाเคा...
เคจเคฆी เคिเคคीเคนी เคฐुंเคฆ เค เคธो,
เคชเคฐ्เคตเคค เคिเคคीเคนी เคตिเคถाเคฒ เค เคธो,
เคเค เคฒเค्เคทाเคค เค ेเคตा ,เคคुเคฎ्เคนाเคฒा เคฏा
เคธเคเคณ्เคฏांเคถी เคाเคนि
เคฆेเคฃ-เคेเคฃ เคจाเคนी,
เคคुเคฎ्เคนी เคเคชเคฒी เคाเคฆเคฐीเคी เคเคกी เคाเคฒा เคเคฃि เคाเคฎाเคฒा เคฒाเคा...
Thought of the day Naukri
Thought of the day....
"नोकरी सुद्धा बायकोसारखी असते....
जी एकदा भेटल्यावर
सोडूनही जाता येत नाही...
आणि
एक असतांना
दूसरी करताही येत नाही !...
आणि ....
जी आहे ती सोडुन
दुसर्या सर्व चांगल्या वाटतात!
😄😄
Varishth kanishth
एक दुकानदार रात्री दुकान बंदच करत असतो, तेवढ्यात तोंडात पाकीट धरलेला एक कुत्रा येतो. पाकिटात सामानाची यादी आणि पैसे असतात. कुत्र्याच्या पाठीवर लावलेल्या पिशवीत दुकानदार त्या वस्तू भरतो आणि 'एवढा हुशार कुत्रा कुणाचा'? या कुतुहलाने त्याच्या मागेमागे जातो. कुत्रा बस स्टॉपवर जाऊन थांबतो. हवी ती बस आल्यावर शिस्तीत बसमध्ये चढतो. त्याच्या पट्ट्यात स्टॉपच्या नावाची चिट्ठी आणि पैसे असतात. आश्चर्यचकित कंडक्टर त्याला तिकीट देतो. स्टॉप आल्यावर कुत्रा शेपूट हलवून कंडक्टरला खुणावतो, बस थांबल्यानंतर उतरतो. दुकानदारही त्याच्या मागोमाग उतरतो. कुत्रा एका बंगल्याच्या दारावर पायांनी टकटक करतो. दोन-तीनदा वाजवल्यावर दार खाडकन उघडलं जातं आणि बाहेर आलेला मालक कुत्र्याला सटकन एक फटका ठेवून देतो. कुत्रा बिचारा कुंऽकुंऽ करत शेपूट घालतो. न राहवून दुकानदार मालकाला विचारतोच. मालक संतापानं सांगतो, गधड्यानं मला उठायला लावलंच. दाराची किल्ली विसरला.
अपेक्षांचं असं असतं. त्यांना अंतच नसतो. कितीही केलं तरी 'वरिष्ठ' चिडचिडलेला राहतो आणि प्रशंसेची अपेक्षा असताना टीका झाल्याने काम करणाऱ्या कनिष्ठाचा वारंवार विरस होतो.
Boss and Manager
बॉस मॅनेजर ला :
काय रे ! ऑफिस मधे तू अगदी वाघ असतोस ...सगळ्यांवर सारखा गुरगुरतोस...
घरी वाघच असतोस ना ..का..???🐯🐯🐯
मॅनेजर :
हो सर ! मग मी घरी सुद्धा वाघच आहे....
फक्त घरी दुर्गा देवी वाघावर बसलेली असते...
🐯🐯🐯
Leave Application
गमतीशिर रजा अर्ज
Conjunctivitis ( डोळे येणे)
To,
The Manager
Dear Sir,
Sub.: leave application for eye coming
I will not come as my eyes have come. If I come with my coming eyes then your eyes will come & you will not come. But still if you come with your coming eyes all office eyes will come & all will not come. So I will not come and all will come. I will come back when my coming eyes will go & all will come without their eyes coming.
Yours Sincerely
Ganya....
Pagarachi Aarti
|| पगाराची आरती ||
जय देव, जय देव, जय जय पगारा !
तुझ्याविना अडतो, संसार सारा !
जय देव, जय देव !
महिन्याच्या पहिल्या, आठवड्याला येशी,
सकलांना सुख आणि आनंद देशी,
काटकसर केली तरी, कमी पडशी,
शेवटच्या आठवड्यात, संपून जाशी.
जय देव, जय देव ! -1
असशी तू तुटपुंजा, घरी ना पटते,
रोज सौ. माझ्याशी, भांडत असते,
तुझ्या हिशोबातच, नोकरी सरते,
मुला-बाळांची, काळजी वाटते.
जय देव ! जय देव ! -2
तुझ्यासवे कधी, ओव्हर टाईम येतो,
दसरा, दिवाळीला, बोनस असतो,
महागाईत थोडा, दिलासा मिळतो,
कर्जाचा डोंगर, जरासा हालतो.
जय देव ! जय देव ! -3
महागाईबरोबर, तुझी शर्यत,
कुर्मगती तुझी रे, नाही जिंकत,
हव्यासे काहीजण, भ्रष्टाचारात,
सांग कुठे कशी, राहिल नियत ?
जय देव ! जय देव ! -4
मागणे इतुकेच, तुजला पगारा !
महिन्याला भेटावे, तुच आसरा,
आणखी विनवितो, तुला रे जरा,
पुरून उरावा तू, आमुच्या संसारा,
जय देव ! जय देव ! -5
जय देव, जय देव, जय जय पगारा !
तुझ्याविना अडतो, संसार सारा !
जय देव ! जय देव !