Showing posts with label Husband Wife Marathi SMS. Show all posts
Showing posts with label Husband Wife Marathi SMS. Show all posts

Husband and wife Jokes

#funpost

सकाळी बायकोने नवऱ्याकडे वर्तमानपत्र मागीतले...
.
नवरा :- किती मागासलेली आहेस ग तु?
.
विज्ञान किती पुढे गेले आणी तु अजुन वर्तमानपत्र मागतेस....???
*हा माझा टॅब घे......*

बायको टॅब घेते आणी त्याने झुरळ मारते....।।
.
.
नवरा बेशुध्द...

.
तात्पर्य : बायको जे मागते ते तिला आपलं डोकं न लावता
द्या,
तुमची हुशारी फक्त ऑफीस पुरतीच ठेवा.
😂😂😂

Husband Wife Marathi SMS

*सांगा काय चुकलं त्या नवऱ्याचं ?*

बायको : बाजारातून दुधाची एक पिशवी घेऊन या,आणि जर बाजारात केळी दिसली तर ६ घेऊन या
😳नवऱ्यान दुधाच्या ६ पिशव्या आणल्या ,
बायको : दुधाच्या ६ पिशव्या ?
नवरा: हो,दुधाच्या 6 पिशव्या आणल्या कारण बाजारात केळी दिसली.

आता सांगा काय चुकलं त्या नवऱ्याचं ?

🤔🤭🤫🤗🤠😎
नाही ना कळलं. परत एकदा वाचा.🤣🤣🤣🤣

मिठी

बायको : ए, सांग ना मिठीतली 'मी' पहिली की दुसरी..?
🤔

नवरा : अॅ..? आता हे काय..?
😯

बायको : अरे सांग ना पहिली की दुसरी..?
😠
.
.
.

(चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ नवऱ्याला लपवता येत नव्हता)
.
.
.
.

बायको : अरे लवकर सांग, माझं काम अडलंय.
😡

नवरा : तुला का ते जाणून घ्यायचंय..? कोणाचा तरी भूतकाळ उकरून काढण्याची ही वेळ आहे का..?
😕
.
.
.

बायको : अरे लेख लिहितेय मी, 'मिठी' की 'मीठी' लिहू..?
माझा गोंधळ झाला ना. त्यातून मी इंग्लिश मिडियमची आहे. You know ना, माझ्या किती चूका होतात. म्हणून विचारलं मिठीतली मी पहिली की दुसरी...!
😌

😄😄😆नवरा मरता मरता वाचला😆😆😂😂😂🤣🤣

#बायको #wife

#बायको
बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला समजणं नसत!!!
किंबुहना
पोस्ट टाकून कधी ती समजत हि नसते !!! बायको ह्या शब्दाला जर फोडले तर "बा" म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी "य" म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि "को" म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी !!! सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात!!! मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल !!!!!
बाहेर मैत्री आणी मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायको मध्येच मैत्रीण सापडली तर तिला आणखी काय हवं !!!!!! प्रत्येक नवऱ्याला वाटत बायकोसाठी खूप काही करावं लागतं पण सत्य परिस्थिती अशी असते तिला लागते नवऱ्याची साथ!!!! हातात भक्कम हात!!! समजून घेणार हृदय !!! इतकं प्रेम कि तिला माहेरच्या लोकांची आठवण हि ना यावी !!!! एक जवळचा मित्र !!! आणि जो अहंकार बाजूला ठेवून तिच्याशी वागेल !!! ज्याच्या जवळ इतकं मन मोकळं करता येईल की मैत्रिणीची हि गरज नाही भासणार!!!" जिच्या डोळ्यात आपल्यामुळे कधीच अश्रू नाही येणार !!!!!! एक स्त्री म्हणून मान!!! आणि तिच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भक्कम साथ बस इतकंच मिळालं कि ती झोपडीला हि स्वर्ग बनवेल !!!!! आणि भाकरीचा तुकडाही तिला पंचपक्वान्न वाटेल आणि नवऱ्याच्या मिठीत स्वर्ग सुख बस आणखी काहीही नको असत कुठल्याही बायकोला म्हणून म्हणते ,,,,,,,,,,,,
बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला समजणं नसत
बायको म्हणजे एक संसारासाठी सतत तेवणारी ज्योत असते !!!!
स्वतःला विसरून नवऱ्यासाठी जगणारी आयुष्यभराची साथ असते!!

सरकारी नवरा

सरकारी शाळेत शिकायला नको
सरकारी बस मध्ये बसायला नको
सरकारी दवाखान्यात इलाज नको

मात्र नवरा पाहिजे

सरकारी नोकरी वाला

वा गं 👩🏻‍💼👩🏻‍💼👩🏻‍💼भवानी
😂😂😂😂😂

एक सुंदर लेख

चाक....

प्रिया आणि समरच्या लग्नाला आता जवळजवळ तीन वर्ष होत आली होती. Love Marriage च्या जमान्यात त्यांच Arranged Marriage होत. सुरवातीला सगळं सुरळीत चालू होत पण नंतर काही ना काही कारणामुळे खटके उडू लागले. प्रिया बँक मध्ये कामाला होती तर समर एका परदेशी कंपनीत. घरात सगळ्या सुख-सोई होत्या. नव्हता तो फक्त एकमेकांसाठीचा वेळ आणि एकमेकांना समजून घेण्याची समज. भांडणाच कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल तर कधी किचनमध्ये सुरु राहिलेला पंखा. आजकाल तर काहीही शुल्लक कारण पुरेस होतं होत.
आज सकाळीहि खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठवून गेला. दोघे एकमेकांशी तावातावने खूप भांडले नी काही न खाता उपाशी ऑफिसला निघून गेले. आज नवीन महिन्याचा पहिला आठवडा त्यामुळे ऑफिसमध्ये काम भरपूर असणार ऐखाद वेळेस लंचसाठी देखील वेळ मिळणार नाही हे प्रियाला माहित होत पण तरी देखील ती तशीच निघून आली.
आज ४ तारीख, म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज पाटील आजी आजोबा पेंन्शन साठी बँकमध्ये येणार. पाटील आजी आजोबा संपूर्ण बँकमध्ये कौतुकाचा विषय होता. दोघे जोडीने नेहमी येत, कडक इस्त्री केलेली कॉटनची साडी आणि तसाच कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट. दोघे सत्तरीच्या घरात होते, पण एकमेकांना खूप सांभाळत होते. दरवेळी येताना बरोबर शबनम बॅग त्यात पाण्याची बाटली, छत्री, बिस्कीटचा पुडा आणि दोघांची डॉक्टरची फाईल न चुकता असे. त्यांच्याकडे बघून प्रिया नेहमी विचार करत असे कि आपल्या नशिबात हे सुख का नाही. नेहमीप्रमाणे आजोबांनी स्वतःचा फॉर्म भरला नी कॉउंटर वर दिला आणि आजीकडे तिचा फॉर्म घ्यायला वळले आणि नेहमी प्रमाणे आजी रिकामा फॉर्म घेउन तशीच उभी होती. "अगं काय हे, एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला? आणखी किती वर्ष माझ्याकडून भरून घेणार आहेस, आज शेवटचा भरतो आहे, पुढच्यावेळी तूच भर" "असू द्या ओ तुम्ही आहात ना, मग मी कशाला चिंता करू?" आजीचं गोड हसून उत्तर, थोड्याफार प्रमाणात हा संवाद दर महिन्याचा होता. आज कॉउंटरवर प्रिया होती, प्रियाच्या हातात फॉर्म देत "बावळट आहेस" आजोबा पुटपुटले आणि आजी लाजली. "इथेच थांब, मी मॅनेजरला भेटून येतो, जाउ नकोस कुठे, हरवशील, वेंधळी आहेस तू" म्हणत आजोबा केबिन कडे गेले. "आजी, अहो इतके बोलतात आजोबा तर शिकून घ्या ना फॉर्म भरायला, त्यात काहीच कठीण नाहीे" प्रिया वेळ काढण्यासाठी बोलली. आजी हसली " अग मला येतो भरता फॉर्म, पण मला तो येत नाही म्हणून ह्यांची होणारी ती प्रेमळ चिडचिड मला आवडते" "मी एकटी सगळं करू शकते, पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदरीने करतात ते मला आवडत" "ह्या वयात आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो आणि मग ते स्वतःची काळजी घेतात मला ते हवं आहे" "संसारात दोघांनाहि दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाउन गाडी ओढायची असते" आजी गोड हसली. कॅबिन मधून आजोबा बाहेर आले नी आजी त्यांच्या पाठीमागे चालू लागली.
दाराशी येत इथेच थांब मी रिक्षा घेउन येतो म्हणून आजोबा निघाले नी आजी ने त्यांना मागून हाक मारून छत्री हातात दिली. सगळा प्रसंग गोड होता, "किती प्रेम आहे ना आजींचा आजोबांवर" बाजूला बसलेल्या सरिताला प्रिया म्हणाली"अग दोघाचं बोल, आजीला उन्हाचा त्रास होतो म्हणून पाटील आजोबा तिला इथेच थांबवून चालत जाऊन रिक्षा आणतात, नेहमी बॅगमध्ये कोकम सरबताची बाटली घेउन फिरतात, खूप काळजी घेतात ते एकमेकांची"
प्रियाला सकाळी घडलेला प्रसंग आठवला. समरने काल लवकर आला तेव्हा दोघासाठी चहा करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा-जेव्हा लवकर यायचा तेव्हा-तेव्हा करत होता. आज समरशी शांतपणे बोलायचं प्रियाने ठरवलं. तिने समरला फोन लावला " काही खाल्लस का?" "नाही गं आज एक महत्वाची मिटिंग आहे, तू काही खाल्लस का? "नाही, चल कामं होत राहतील काहीतरी खाऊन घे, उपाशी काम करत बसू नकोस, मी हि ब्रेक घेते" संद्याकाळी जेवायला बाहेर जायचं ठरवून प्रियाने फोन ठेवला.
हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला, खटके उडत होते पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं.
ह्यात तीन-चार महिने गेले आणि आज पुन्हा सकाळी बेडवर ओलो टॉवेल बघून प्रियाचा पारा चढला. समरने सॉरी म्हणून टॉवेल उचलला पण तोपर्यँत प्रिया खूप चिडली होती "नोकर नाही आहे मी इथे, नाही जमणार मला सारखं ऍडजस्ट करायला, इतका आळशी स्वभाव बरा नाही." रागारागात प्रियाने तयारी केली नी ती ऑफसला निघून गेली. कॉउंटर वर ती बसली होती आणि तिला दारातून पाटील आजोबा आत येतांना दिसले आज ते एकटेच होते आणि पेंन्शनचा दिवसहि नव्हता काहीतरी वेगळं काम असेल म्हणून प्रिया पुन्हा आपल्या कामात गुंगली. शिपायाने, साहेबांनी आत बोलावलं आहे हा तिला निरोप दिला. आत पाटील आजोबा बसले होते, "प्रिया पाटील आपल्या बँकचे सगळ्यांत जुने कस्टमर आहेत, त्यांना आज पर्सनली मदत कर, मी दुसऱ्या ब्रँच मध्ये चाललो आहे त्यामुळे you can sit here and help him with all the formalities" नायर साहेब निघून गेले.
" बोला आजोबा काय करायच आहे" "मला सावित्रीच अकाऊंट क्लोज करायच आहे, गेल्या आठवड्यात ती हार्टअटॅक नी घरी बसल्या जागी गेली" कोणीतरी जोरात ओरडल्यावर जसं कान सुन्न होतात प्रियाच तसं झालं "I am sorry" च्या वतिरिक्त ती काहीच बोलू शकली नाही. आजोबा बोलत होते " खूप काळजी घ्याची माझी ती, सगळं वेळच्या वेळी, मी सुरुवाती पासून वेंधळा, पण ती प्रत्येक वेळी माझ्या चुका लपवायची माझ्या पाठीशी कायम उभी राहिली, तिला बहुतेक ती जाणार हे कळलं होत, आज पर्यंत तिला कित्येक वेळा मी जेवण करण्यासाठी बाई ठेवू सुचवलं होत पण तिने कधीच ऐकलं नाही, पण एक १५ दिवसापूर्वी तिने जेवणासाठी बाई ठेवली तिला मला लागत तसं जेवण शिकवलं, मी तिला चिडवलं देखील कि पाटलिणबाई आता बसल्याजागी ऑर्डर देणार" आजोबानी डोळ्याला रुमाल लावला, प्रियालाहि रडू आवरलं नाही, formalities पूर्ण करून आजोबा निघून गेले. प्रियाच लक्ष फोनकडे गेल, समरचा मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होत होता "सॉरी प्रिया मी आज पुन्हा टॉवेल विसरलो, I will try not to do it again, पण यार तू त्यामुळे काही न खाता ऑफिस ला जाऊ नकोस, I feel guilty, please don't do that again. I have been pampered, spoiled brat till date and I m trying to change that, please give me time to change myself, I promise I will change, I never have said this before but I always want you in my life, No one can understand my mood the way you do, Please" काहीवेळ प्रिया फोन कडे बघत राहिली आणि तिला पाटील आजीच वाक्य आठवलं "आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो." "संसारात दोघांनाहि दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाउन गाडी ओढायची असते"
"sorry, I too loose my control every now and then, I will also try to work on it, you too please give me time for that, I too always want you to be their in my life, you are my entire support system and we both will work towards understanding each other"..प्रियाने रिप्लाय सेंड केला....

Wife Jokes

एकदा एका बायकोने आपल्या नवर्याला विचारले..

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

बायको-का ओ जर मी तुम्हाला 3-4 दिवस दिसले नाहीतर..

😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌

तुम्हाला कस वाटेल??

नवरा मनातल्या मनात जाम खुष झाला..

😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋

आणि  पटकन बोलला..

नवरा-मला तर खूप बर वाटेल आणि  मी लय खुष होईल..

😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

.
मंग काय..
.

.
बायको सोमवारी नाही दिसली..

😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

.
मंगळवारी नाही दिसली..
.

😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

बुधवारी नाही दिसली..

😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

.
गुरूवारी नाही दिसली..

😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

.
शुक्रवारी

जेव्हा डोळ्याची सुज कमी झाली..

🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
.
तेव्हा कुठ थोडी थोडी दिसली!

😂😂😂😂😂😂😂😂

उटण्याचा उग्र वास

एकदम झक्कास जोक
सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले, "अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय..."
.....
(थोडावेळ.एकदम शांतता)
......
.............
.......
पत्नी:-"अरे देवा..देवा...देवा....काय बाई तुमचा हा वेंधळेपणा. मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या. एक उटण्याची व दुसरी हिंगाची.
तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली, अन फासली सगळ्या अंगाला."
"काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..अरे देवा...कसं होईल या संसाराचं. .? काय म्हणावं या माणसाला.... बाई बाई बाई ...!!!!"
पती - "अग अग किती किंचाळतेस...तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय...तू कशाला एवढं टेंशन घेतेस?"
पत्नी- "अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या मला काही पडले नाही त्याचे पण ..
.



















तुमच्यामुळें मी भाजीत उटणे टाकले त्याचं काय?.."
तात्पर्य....बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात..​
बिच्चारा हिंगाळलेला नवरा...​😂😂😝😝😝😳😳

Bharosa

नवरा: आपल्याला ऊगाचच मुलगी झाली, मुलगा व्हायला हवा होता

बायको: तुम्ही तर गप्पच बसा
.
.
.
.
.
तुमच्या भरवश्यावर राहीले असते तर मुलगी पण नसती झाली😝😜😝🤣😂😝😜😜😜😅😎🤣😂😂😅😝😊😜👊😎😊😝😅🤣🤣😂😂😂🙏🏻🙏🏻🙏🏻

बायको

*बायको आसावी तर अशी...*

साडेसातचे दरम्यान मऊशार हात अतिशय प्रेमाने कपाळावर ठेऊन " उठताय ना?" अशी लाडिक हाक मारून उठवणारी...

दात घासून घेईपर्यंत बाल्कनीत कॉफी टेबलवर 'सकाळ' व ' लोकसत्ता ' रेडी ठेवणारी...

मस्कापाव,आवडती बिस्किटस् चहाच्या कपाशेजारी आवर्जुन ठेवणारी...

नवरा  घेत असलेल्या चहाच्या स्वादास तिच्या चटकदार गप्पा व खळाळत्या हास्याची साथ देणारी ...

आंघोळीस बाथरूममध्ये रोज टॉवेल इ. न विसरता ठेवणारी....

आंघोळ करून बाहेर आल्यावर छान मॅच होणारे कपडे तयार ठेवणारी....

नवर्‍याचे तयार होणे सुरू असताना अगदी शांतपणे मुलाला तयार करणारी....

नवरा अाॅफिसला बाहेर पडताना मुलाला ' किशी ' करायला  पाठवणारी...

नंतर मुलाची नजर चुकवून नवर्‍याला  गुड बाय Flying किस करून आॅफिसला पाठवणारी...

१२.३० दरम्यान फोन करून टिफिनमध्ये दिलेले टेस्टी सरप्राइज खाण्याची अाठवण करणारी..

४.३० वाजता पुन्हा ' लवकर घरी या ' असा लाडिक हट्ट करणारी...

७ वाजता आॅफिसमधून परत येतोयं तर छानसे नटून नवर्‍याने बेल वाजवायच्या अगोदरच दार उघडणारी...

चेहर्‍यावर छानसे हास्य विलसवणारी...

नवरा फ्रेश होऊन येईपर्यंत टेबलवर रुचकर मेनू तयार ठेवणारी...

जेवण झाल्यावर  रोज लिटिल वॉक अराऊंड ला बाहेर येणारी...

रस्त्याने चालताना कळत नकळत हळुवार स्पर्श होतील...मधूनच हात धरला जाईल हे पहाणारी......

मॉल मधे चिअरफुली शॉपिंग करताना बजेट डोक्यात ठेवणारी...

घरी परतताच 'तुम्ही आता जरा टी व्ही बघा, मी मुलाचा होम वर्क घेते ' असं म्हणणारी...
.

.

.

अतिशय प्रेमाने न रागवता न वैतागता मुलाचा होम वर्क घेणारी......

कधी कोणतीही कट कट न करणारी..

नवर्‍याला एकही प्रश्न ऊलट न विचारणारी...

सासू सासऱ्यांवर आई वडिलांसारखे प्रेम करणारी...

सगळ्या नातेवाईकांस आपलेसे करून टाकणारी....

अशी सर्वगुणसंपन्न सौंदर्यवती स्री














*कुणाची बायको आहे का हो.....अशी ?....*

😜😝😛
असेल तर अभिनंदन💐

Dasara special

एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच

जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती... तेवढ्यात...
नवरा:- अगं हे काय करतेस?बायको:- अहो दसरा आलाय  ना जवळ !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..
😃😃😜😛😜😃😛😜😃😜😛😜😃😃😃
नवरा  .फरार..😜😛😜

Wife knows Everything

😳 क्रुपया हसु नका
मध्यरात्री नवरा बायकाेचे फाेनवरील संभाषण

बायकाे = इतका उशीर झाला,कुठे आहात तुम्ही ? आणि तुमचा आवाज टेन्शनमध्ये असल्या सारखा का येताेय ? काय झालयं ?
नवरा = अगं मी आपल्या कारमध्ये आहे. पण एक गडबड झाली आहे. आपल्या गाडीचे स्टेरींग, क्लच, ब्रेक, एक्सीलेटर सर्व चाेरीला गेलंय. काय करु समजत नाही आहे.

बायकाे = तुम्ही परत दारू प्यायलात काय?

नवरा = थाेडीशी... पण ते महत्वाचे नाही.  गाडीचं काय करायचं त्याचा विचार करं.

बायकाे = वाटलंच हाेतं
आता एक काम करा... डाव्या सिटवरून उठा आणि उजव्या सीटवर बसा .... मग सगळं जागेवर सापडेल....

🍺🍻🍷🥃🍾
Nobody knows you better than your WIFE..💐 🙏😂

Wife knows Everything

😳 क्रुपया हसु नका
मध्यरात्री नवरा बायकाेचे फाेनवरील संभाषण

बायकाे = इतका उशीर झाला,कुठे आहात तुम्ही ? आणि तुमचा आवाज टेन्शनमध्ये असल्या सारखा का येताेय ? काय झालयं ?
नवरा = अगं मी आपल्या कारमध्ये आहे. पण एक गडबड झाली आहे. आपल्या गाडीचे स्टेरींग, क्लच, ब्रेक, एक्सीलेटर सर्व चाेरीला गेलंय. काय करु समजत नाही आहे.

बायकाे = तुम्ही परत दारू प्यायलात काय?

नवरा = थाेडीशी... पण ते महत्वाचे नाही.  गाडीचं काय करायचं त्याचा विचार करं.

बायकाे = वाटलंच हाेतं
आता एक काम करा... डाव्या सिटवरून उठा आणि उजव्या सीटवर बसा .... मग सगळं जागेवर सापडेल....

🍺🍻🍷🥃🍾
Nobody knows you better than your WIFE..💐 🙏😂

Sukhkarta Dukhharta

गणपती पुढे - सुखकर्ता दुखहर्ता




नवऱ्यापुढे - असकर्ता तसकर्ता
😂😂😂😂😂

Happy पोळा

*बैलपोळा स्पेशल : स्थळ मंडई पुणे*

बाई: एक बैल द्या हो.

विक्रेता: अहो,जोडी घ्या.

बाई: नाही फक्त एकच द्या

*...एक आहे घरी...*
😉😜😜😜

आग लावणार्‍या वस्तू

पेट्रोल पंपवर पाहीले प्रत्येकजण आपल्या बायकोला पेट्रोल पंपाच्या बाहेर उतराउन पेट्रोल भरायला जात होता.
मी खुप विचार केला असे का??
😇😇😇😇
नंतर तिथला बोर्ड पाहीला आणि खुप हसलो राव
.
.
.
बोर्ड👇👇👇👇
आग🔥 लावणार्‍या वस्तु दुर ठेवाव्यात !!!
😜😜😜😜😜😜😜😜      लवकर पुढे पाठवा खरीच नवीन आहे...........

नवरा म्हणजे कोण?

*नवरा म्हणजे कोण ?*

जे आहे ते सारं
तुझंच म्हणत
सगळं
स्वतःच्या नावावर ठेवणारा!

*नवरा म्हणजे कोण?*

मी तुझा गुलाम म्हणत
सगळी कामं करवून घेणारा..

*नवरा म्हणजे कोण?*

तुझ्या हाताला
आईसारखी चव नाही
म्हणत फर्माईशी करणारा!

*नवरा म्हणजे कोण?*

तू म्हणशील तसं करु
म्हणत
अंतीम निर्णय देणारा!

*नवरा म्हणजे कोण?*

रविवारभर टी.व्हीसमोर लोळून
सुट्टी साजरी करणारा...

*नवरा म्हणजे कोण?*

स्वतःची ढेरी नजरेआड करुन
बायकोचा बांधा सुटलाय म्हणणारा!

*नवरा म्हणजे कोण*

*मी बायकोला*
*घाबरून आहे दाखवत*
*तिला शेंड्या लावायची*
*संधी शोधणारा!*

*नवरा म्हणजे कोण?*

उधळलेल्या वारुला जणू
लग्नाचा लगाम घातलेला.

*नवरा म्हणजे कोण?*

*पदरी पाडून पवित्र*
*मानून घेतलेला....*

😉 dedicated to all loving
(😜)husbands and all my lovey married sisters

मोबाईल

नवरा : अग कुठे चाललीस तू ?

बायको : दिसत नाही काय ? आंघोळीला चाललीय ते !

नवरा : अग पण मोबाईल घेऊन ?

बायको : *मग , बादली भरेपर्यंत काय करू ...............*

नवरा :😷😷😷😷😷😷

गाजर आणि गजरा

बायकोला *गजरे* हवे होते...

तिनं मेसेज पाठवला इंग्रजीत....

Yetana 5 Gajre gheun ya...

तो येतांना 5 *गाजरं* घेऊन आला...

उपाशी झोपला
काय चुकल बिच्याऱ्याच ..??
😏🤔😒

म्हणून मेसेज मराठीतच टाईप करा. 😜😜😜

Husband Wife

प्रिय मित्रांनो, लग्न होणार
असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख
वाचवा आणि आणि कुठेतरी सांभाळून सेव्ह करून ठेवा परत
वाचण्यासाठी.....:

'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी,
चारचौघींत
उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत
तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण,
तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना,
इच्छा-
आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र
या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे
पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...

- उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल,
त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.

- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत
असेल.

- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं
असतील, आवडी असतील,

- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल,
अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं..

- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून
कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे
जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!

- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण,
भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील,

- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं
यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब,
तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.

- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक
करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल

- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र
सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी,
अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.

- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात
द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं
अशी अपेक्षा असेल,

- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर
होत
असेल,

- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच,
तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल.

- नोकर, स्वयंपाकी, बायको,
यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्य
काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत
राहील...

- तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये
आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये
या अपेक्षाही तिला माहिती असतात.

- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात
आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या,
अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात
घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते.

- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल
करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू
सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.

मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच
तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत,
संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग
आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे
समजूनच घेत नाहीत...
एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल,
तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं
सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल....