Jarur vacha...

                     🙏 नमस्कार 🙏

दुष्ट माणसांना हे जग शुध्द नरकासारखे दिसते, सज्जनांना ते सर्व श्रेष्ठ स्वर्गा सारखे दिसते, द्वेष करणा-याला सर्वत्र द्वेषच  आढळतो, भांडखोरांना भांडणा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही.....!

शांत स्वभावाच्या माणसांना सर्वत्र शांतीचा प्रत्यय योतो, पुर्णत्वाप्रत पोहोचलेल्या माणसाला ईश्वरा व्यतीरीक्त दुसरे काहीच दिसत नाही....!!
                                   स्वामी विवेकानंद...

मित्रानों जरुर वाचा......!!
एकदा गाडगेबाबा पंढरपुरला गेले होते. चंद्रभागेच्या तीरावर फिरताना त्यांना एक भट् काही लोकांसमोर पिंडदान विधी करत होता. भट् त्या लोकांनी तयार केलेले पक्वान्न वरच्या दिशेने फेकत होता व काहीतरी बडबड करत होता...!

गाडगेबाबा भटाला म्हणाले, " ये काय करुन राहीलाय, बाप्पा......?"

भट् म्हणाला, " तुला दिसत नाही का "..... ?
मी हे अन्न या लोकांच्या स्वर्गातील " मातापित्यांना " पाठवत आहे....

संत गाडगेबाबांनी थोडावेळ विचार केला. भटाला धडा शिकवायचा हे ठरवले. गाडगेबाबा चंद्रभागेत उतरले व हातातील गाडग्याने जोरजोरात पाणी भटजी कडे फेकु लागले. भटाला राग आला. तो रागाने ओरडला," हे मुर्ख मानसा हे काय करतोस तु ".......?,"

गाडगेबाबा शांतपणे म्हणाले, " माझी अमरावतीला संत्र्याची बाग आहे, तीला मी पाणी घालतोय " सर्वजण हासायला लागले. भट् म्हणाला," अरे वेड्या इतक्या दुर आमरावतीला येथुन पाणी कसे जाईल....?"

बाबा पटकन बोलले," तुम्ही जर मेलेल्या लोकांना स्वरगात जेवण पाठवता. मग मी इथुन फेकलेलं
पाणी आमरावतीला का नाही जाणार., बाप्पा "......?"

तात्पर्य : -  बुद्धीचा वापर करा....!!!

No comments:

Post a Comment