Showing posts with label Positive Status (Marathi). Show all posts
Showing posts with label Positive Status (Marathi). Show all posts

Be Positive always

*THINK POSITIVE*

मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात.
यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात.
नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.

सकारात्मक विचार आपली शक्ती,
आत्मविश्‍वास,
मनोबल वाढवतात.

नकारात्मक विचारांना -
सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!

*थॉमस् अल्वा एडिसनने* 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?

थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)

*नेपोलियन* समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला,
छाती चिखलाने माखली. 
तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं.
आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार,
आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले.
नेपोलियनने ही बाब हेरली.

तो उठताना छातीत झटकत म्हणाला,  ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार,
जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे -
मी तुझी आहे,
मी तुझी आहे.... ...

मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. 
हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.

टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की,
अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं.
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं.

सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो.

नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो.
परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.

*गौतम बुध्दाजवळ* एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’

बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’

तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’  भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला,

बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.

मी अस्वस्थ आहे,
पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.

माजी राष्ट्रपती *अब्दुल कलामांना* नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.

काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

*कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत*
*डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत* ....😊
👍 *So Be Positive !*

नक्की वाचा

👇🏽👇🏽Nakki wacha👇🏽👇🏽

📍कधीही शाळेत न गेलेले छत्रपति
स्वराज निर्माण करतात
📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'
नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो
📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे
साम्राज्य उभे करतात...
📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून
बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम'
राष्ट्रपती पदापर्यंत जातात
📍जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.
📍रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.
📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला'
जगाला प्रेम शिकवतात.
📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे
'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात...
"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग
निर्माण करतात..."
मग, आम्ही का नाही???"
🍒
माणूस किती किंमतीचे कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते ,
🍒
परंतु , तो इतरांची किती किंमत
करतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .
🍒

🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा 😏अपमानही करू नका आणि कोणाला 😇कमी लेखु नका.
👉तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे.
🌳एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे 🔥जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही.
🌅✨कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले.
🌄✨ रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.
🌇✨ ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.
🏕✨ दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला.
👏 हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल.
🍀🍀🍀
लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागुन चालत असतात.🌿
याचाच अर्थ असा की लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दुःखात मागुन चालत असतात.
लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय, आपलं जीवन आपण आपल्या हिमतीवर व निश्चयानेच जगायच असत..💐

🎄थोडस महत्वाचं____🌿

1)🌅 अन्य जाती-धर्मांवर टिका
     करत वेळ वाया घालवू नका.
     जे चांगलं असेल त्या गोष्टी
     आत्मसात करा.💮

2)🌅 दंगली- मारामारी करुण आपलं
     नाव खराब करुण घेऊ नका.
     आता लढाईचा काळ
     राहिलेला नाही.💮

3)🌄 उच्च शिक्षण तुम्हाला आणि
    तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
    जीवन देऊ शकतं.💮

4) 💐राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
    गुलामी करू नका.

5) 💪आजचा तरुण एकमेकांना मदत
    करुण प्रगती करू शकतो.
    त्यासाठी राजकीय पक्षाची  वा
     नेत्याची गरज नाही.💮

6)👬 मंदिरात दान करण्याऐवजी
    गरीब आणि गरजू तरुणांना
    मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी
    मदत करतीलच.💮

7) 🙏चार दिवस सुट्टी काढून कुटुंबा  सोबत प्रेक्षनीयस्थळी जरुर फिरा पण त्यातला कही वेळ
    समाजाच्या प्रगतीसाठी द्या
    समाजही तुम्हाला कधीतरी
    मदत नक्कीच करेल.💮

8) 👆इंग्लिश बोलायला शिका.
     हा मराठीचा किंवा हिंदीचा अपमान नाही  काळाची गरज  आहे.💮

9) 💪व्यायाम, योग, मैडिटेशन करीता स्वतःसाठी दिवसातून तास भर वेळ द्या. 💮

🌅🌳🎄"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल.💐🌻🌺

It's Fact

👌👌👌👌
👉तीन मित्र S.T. बस मधून जात असतात     👈   

बस थांबते🚌

तिघेही मित्र बस मधून उतरतात 👬
बस 10 मीटर पुढे जाते तितक्यात
गाडीवर दरड कोसळते 
😞😞😞😞
बस मधील सगळी माणसे मरतात

👉पहिला मित्र ----  *नशीब आपण इथेच उतरलो , नाहीतर आपण पण मेलो असतो....!*👈

👉दुसरा मित्र..... *हो रे खरंच*👈

👉तिसरा मित्र ----- *नाही रे जर आपण इथे उतरलोच नसतो तर बस इतक्यात आजून पुढे गेली असती आणि सगळे वाचले असते...*👈😘😘😘

*It‘s a fact...*

👉*विचार चांगलाच करा.... तुम्ही जसा विचार कराल तसच तुम्हाला जाणवेल.*
*आवडलं तर नक्की शेअर करा*👌🏻👈

🌿🌿🌿🌿🌿

क्षण आनंदाचे

एक चांगला मेसेज फॉरवर्ड करीत आहे....

*क्षण आनंदाचे*

सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, "भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?" तो म्हणाला,"पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन." "मग काय करणार?" हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,"मग काय, निवांतपणे जगेन." यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का निवांत जगत नाहीस?

यातुन सिकंदरला काय कळलं माहीत नाही;पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगुन जाते.आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय ती पुढे कधीतरी निवांत जगू, या भाबड्या आशेवर.
बर्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं, याचं भानही रहात नाही.

कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहुन सुंदर असणारच हे आपणा विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या प्रक्रुतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं; अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो.म्हणून केवळ एकटं पुढे रहाण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बर्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते, करायच्या राहुन गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात.

यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यात फरक करणं नितांत गरजेचं आहे. इतरधावतायेत म्हणून आपणही धावणं ठीक नाही. जगणं हे राईसप्लेटसारखं असावं, त्यात कसं सार्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचंही काहीसं असंच आहे, ते सर्वसमावेशक, चौफेर असेल, तर ते सुखकर ठरते. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटुन जाऊ देऊ नका, ते क्षण तेव्हाचे तेव्हाच जगून घ्या, लुटून घ्या.

आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलेय, हे पालुपद आयुष्यच कुरतडून टाकते, त्यामुळे ते क्षण वेचा. तारुण्यात शक्ती आसते, वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो; पण वेळ नसतो आणि उतारवयात वेळही आसतो, पैसाही असतो पण शक्ती उरत नाही.यातील सुवर्णमध्य गाठुन समरसुन जगावं.

स्टीव्ह जॉब्स म्हणतात, हरवलेल्या वस्तु गवसतील; पण वेळ नाही. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर "निरोगी कसं जगावं" हे पुस्तक वाचुन काय उपयोग ?

*एक शायर म्हणतो*......
उम्र-ए-दराज से
माँगकर लाये थे चार दिन,
दो आरजु में कट गये,
दो इंतजार में.....
बघा,आपलं असं होऊ नये......

जगण्याची कला

*जगण्यातली मजा*
*वाढवण्याचे उपाय...*
*पटलं तर असे वागा ..*

1) जिथे राहता त्या गावात

चार तरी कुटुंब जोडा

अहंकार जर असेल तर

खरंच  लवकर सोडा

2) जाणं येणं वाढलं की

आपोआप प्रेम वाढेल

गप्पा च्या मैफिलीत

दुःखाचा विसर पडेल

3) महिन्यातून एखाद्या दिवशी

अंगत-पंगत केली पाहिजे

पक्वान्नाची गरजच नाही

पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे

4) ठेचा किंवा भुरका केल्यास

बघायचंच काम नाही

मग बघा चार घास

जास्तीचे जातात का नाही

5) सुख असो दुःख असो

एकमेकांकडे गेलं पाहिजे

सगळ्यांच चांगलं होऊ दे

असं देवाला म्हटलं पाहिजे

6) एखाद्या दिवशी सर्वांनी

सिनेमा पहावा मिळून

रहात जावं सर्वांशी

नेहमी हसून खेळून

7) काही काही सणांना

आवर्जून एकत्र यावं

बैठकीत सतरंजीवर

गप्पा मारीत बसावं

8) नवरा बायको  दोन लेकरात

" दिवाळ सण " असतो का ?

काहीही खायला दिलं तरी

माणूस मनातून हसतो का ?

9) साबण आणि सुगंधी तेलात

कधीच आनंद नसतो

चार पाहुणे आल्यावरच

आकाश कंदील हसतो

10) सुख वास्तुत कधीच नसतं

माणसांची ये-जा पाहिजे

घराच्या उंबर्ठ्यालाही

पायांचा स्पर्श पाहिजे

11) दोन दिवसासाठी का होईना

जरूर एकत्र यावं

जुने दिवस आठवताना

पुन्हा लहान व्हावं

12) वर्षातून एखादी दुसरी

आवर्जून ट्रिप काढावी

"त्यांचं आमचं पटत नाही"

ही ओळ खोडावी

13) आयुष्य खूप छोटं आहे

लवकर लवकर भेटून घ्या

काही धरा काही सोडा

सगळे वाद मिटवून घ्या

14) पटलं तरच पुढे पाठवा

तसेच आपल्या ह्रदयातही साठवां

आपल्या चार माणसांसाठी

थोडं रक्त आटवा...

  ********/¤\********
*माझ्या सर्व जुन्या-नव्या मित्र व नातेवाईकांना....* 👆
💐💐💐💐💐💐🌹

नाते

नातं *.Hang.* झालं की,
एकदा तरी*.Restart .*करून बघावं...

न जाणो परत छान *. Network .*मिळाल तर......
त्या साठी नाती *Switch off .*करायची
काय गरज.....

नावलौकिक केलेल्या व्यक्ती

"प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या ज्याच्या हाती फक्त  शुन्य होते..."

🌸डाँ.ए.पी.जे.अब्दुल कलाम🌸
वडील नावाडी होते .विद्यार्थीदशेत असताना ते वर्तमानपत्र विकत होते ते शास्त्रज्ञ झाले राष्ट्रपती झाले.

🌸 शेक्सपिअर 🌸
  खाटीकखान्यात नोकरी करत होते रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभळता सांभळता एका नाटककाराचा जन्म झाला..

🌸 लता मंगेशकर 🌸
वडिल वारल्यावर त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी केली.कष्टात दिवस काढले .घर सांभाळले .विविध भाषेत पन्नास हजार गाणि म्हंटली .भारतरत्न हा त्यांना सर्वोच्च किताब मिळाला ...

🌸 ग.दि.माडगूळकर 🌸
मँट्रिक नापास झाल्यावर उदबत्त्या विकल्या .अनवाणी आयुष्य जगले.त्यांनी गीतरामायण लिहले..

🌸 गुलजार 🌸
फाळणी नंतर दिल्लीला आले.मोटार गँरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल राँय भेटले .मोटार गँरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रित आले...

🌸 सुधिर फडके 🌸
चहा भाजीचा व्यापार करत होते .प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्य विकावी लागली .भटकंतीतून त्यांना सुर शोधला .ते गायक झाले, संगीतकार झाले ....

🌸 नीळू फुले 🌸
पुण्याला काँलेमध्ये अकरा वर्षे माळी होते.झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले .नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले...

🌸 विष्णूपंत छञे 🌸
घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वताःच स्वताःचा मार्ग शोधला.भारतातील पहिली ग्रेट सर्कस निर्माण केली ...

🌸 दारा सींह 🌸
पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते .रानात गुरं चरायला जात होते .गुरांना सांभाळता सांभाळता कुस्तीची आवड निर्माण झाली.जगभर कुस्त्या जिंकल्या .चित्रपटात कामे केली .राज्यसभेत खासदार म्हणून जाताना मनात एकच भावना असते एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला...

🌸एम. एफ. हुसेन 🌸
मुंबईच्या फुटपाथवर सीनेमाची पोस्टर्स रंगवली .पुढच्या आयुष्यात त्यांची चित्रे शंभर कोटींना विकली गेली .भारतात चिञकलेच्या इतीहासात एक नवा विक्रम नोंदवला गेला....

🌸 कर्मवीर भाऊराव पाटिल 🌸
कंदिल आणि नांगराचे विक्रेते होते.कंदिल नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली ....

🌸 ग्रेटा गार्बो 🌸
गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला.तेराव्या वर्षी गरीबीमुळे शाळा सोडावी लागली .दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असताना अचानक हाँलीवुडचे दरवाजे उघडले ....

🌸 चार्ली चँपलिन 🌸
प्रचंड गरिबी अनुभवली विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासुन अनेक कामे केली .आपल्या विनोदाने जगभरच्या लोंकाना हसवले...

🌸 सुशीलकुमार शिंदे 🌸
सोलापूरला कोर्टात शिपाई होते.कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले....

🌸 लक्ष्मणनराव किर्लोस्कर 🌸
दहा वर्षे ड्राईंग टिचर होते.त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला ..

🌸 यशवंतराव गडाख 🌸
अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते .मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले वयाच्या पंचविशीत सोनाईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली ....

🌸 धिरुभाई अंबानी 🌸
वडिल प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते.भाऊ रेशनिंग आँफिसात नोकरीला होता .स्वताः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते .अशा वातावरणात स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले ....

🌸 स्टीव्ह जाँब्स 🌸
कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले .जगातल्या मोठ्या काँम्प्युटर कंपन्यापैकी एक 'अँपल'
ची स्थापना केली....

🌸 सुनील दत्त 🌸
रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला.अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले....

🌸 जाँनी वाँकर 🌸
बस कंडक्टर होता.प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकिटे लोंकानी घ्यायला सुरुवात केली .एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर स्थीरावला....

🌸 महेमूद 🌸
ड्रायव्हर होता.चलती नाम गाडी ,सबसे बडा रुपया त्याने म्हणायला सुरुवात केली .आणि गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते स्वताःलाही समजले नाही.....

"या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शुन्य होते .त्यांनी अथक परिश्रमाने शुन्यातून विश्व निर्माण केले .अनवाणी आयुष्याला आकार दिला परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसापुढे आदर्श ठेवला ..👍

इतिहास...

🌸🉑आयुष्यात स्वत:ला कधी
"उध्वस्त" होऊ देऊ नका.
कारण लोक "ढासाळलेल्या" घराच्या
वीटा सुद्धा सोडत नाहीत..

संकटावार अश्या प्रकारे तुटून पड़ायच की
.... जिंकलो तरी "इतिहास"
आणि
हरलो तरी "इतिहास" च घडला पाहिजे..!

Marathi Positive Status

*समजदार व्यक्तीसोबत*
*काही मिनीट केलेली चर्चा...*
*ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा*
*श्रेष्ठ आहे....!!!*

हृदयाला स्पर्श करणारी चार्ली चॅप्लिन ची तीन वाक्ये..

💐👉🏼हृदयाला स्पर्श करणारी चार्ली चॅप्लिन ची तीन वाक्ये........👍🏼
🍃🌹१) या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा.
🍃🌹२) मला पावसात चालायला आवडतं कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकंत नाही.
🍃🌹३) ज्या दिवशी आपण हसलो नाही,तो दिवस आपल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस.
👉🏼"कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही."
👉🏼डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत....
👉 गोड असेल तर माणसं तुटत नाहीत....!"

Positive Thoughts

🙏🏼*कर्मावर आणि देवावर निसंकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतके देणार, की मागायला काहीच उरणार नाही......!*🙏🏼