Showing posts with label Marathi Motivational. Show all posts
Showing posts with label Marathi Motivational. Show all posts

खूप छान संदेश फॉरवर्ड करतोय नक्की वाचा आणि शेर करा.

एक मुलगा प्रिन्सिपलकडे गेला आणि म्हणाला, "मॅडम, आता मी शाळेत येणार नाही."
प्रिन्सिपलने विचारले "पण का?"
मुलगा म्हणाला " मी एका शिक्षकाला दुसऱ्या शिक्षकांबद्दल वाईट बोलताना पाहिले ; आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते चांगल शिकवत नाहीत ; कर्मचारी चांगले नाहीत ; विद्यार्थी त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांना त्रास देतात आणि इथे अनेक चुकीच्या गोष्टी होतात ....
प्रिन्सिपल ने उत्तर दिले "ओके. पण आपण शाळा सोडण्यापूर्वी, माझ्यासाठी कृपा करून मी सांगतो ते काम कर. एका काचेच्या प्यालात पाणी घ्यायचं आणि एकही थेंब न सांडता शाळेभोवती तीन वेळा चक्कर मार व नंतर, तू तुझी इच्छा असल्यास शाळा सोड "
मुलाने विचार केला: हे खूप सोपे काम आहे!
प्राचार्यांनी सांगितले म्हणून त्याने शाळेला तीन वेळा चक्कर मारली . जेव्हा त्याचे तीन राऊंड संपले तेव्हा त्याने प्रिन्सिपलला सांगितले
प्रिन्सिपलने विचारले "जेव्हा तुम्ही शाळेला राऊंड मारत होता, तेव्हा तुम्ही एका शिक्षकाने दुसर्या शिक्षकांबद्दल वाईट बोलत असताना पाहिले का?"
त्या तरुणाने उत्तर दिले, "नाही."
" सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर विद्यार्थ्यांशी चुकीच्या पद्धतीने वागताना पाहिले का?"
"नाही"
"शिक्षक शिकवताना पाहिले का?"
"नाही"
तेव्हा प्रिंसिपल त्याला म्हणाले की
"तुझे लक्ष फक्त पाण्याच्या ग्लासावर होते, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुझ्या ग्लासातील एकही थेंब न सांडता तू तुझं ध्येय पूर्ण करु शकलास .
आपल्या आयुष्याचेही असेच आहे .जेव्हा आपण आपले लक्ष्य / ध्येय (Target ) सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो "
मतितार्थ.....
इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा व त्यालाच प्राधान्य द्या .....
Be Positive & remains always in positive mind peoples for success.

पालकांसाठी थोडं महत्वाचे नक्की वाचा

एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर.
घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती.
एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.
इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले.
त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे.
आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत......
आपल्या मुलांच्या बाबतीतही विचार केलेलाच बरा........
आवडले तर शेर करायला विसरू नका

खूप छान आहे नक्की वाचा आणि शेर करायला विसरू नका

पियाँटिक ह्या जनरल मोटर्स च्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली.
' माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही '
जनरल मोटर्स ने साहजिकच ह्या तक्रारीकड़े दुर्लक्ष केले.
काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तिने हीच तक्रार केली.
ह्यवेळी जनरल मोटर्स ने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्ति ला त्याची तक्रार व्यवस्थित सांगणयास सांगितले.
व्यक्ति ने उत्तर दिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हेनीला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाड़ी सुरु होत नाही.
जनरल मोटर्स ने असे होउच शकत नाही असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यानीसुद्धा त्या व्यक्तिची चेष्टा केली.
काही दिवसांनी त्या व्यक्ति ने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्स पुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्ति कड़े पाठवला. इंजीनिअरने गाड़ी चेक केली. सगळे व्यवस्थित असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्ति सोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअरपण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तिने व्हेनीला आईसक्रीम आणले आणि काय आश्चर्य त्या व्यक्तिने सांगितल्या प्रमाणे गाड़ी सुरुच झाली नाही.
इंजीनिअरने परत गाड़ी चेक केली पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तिने सांगितलेली तक्रार खरी आहे.
कंपनीने इंजीनियर ला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्ति बरोबर आईसक्रीम खायला गेल्यावर काही दिवसानंतर इंजीनिअर च्या लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो.
पण व्हेनीला फ्लेवर ला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो. आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअर ला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टिवर खुप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यन्त गाडीचे इंजिन थोड़े गार होते. आणि गाड़ी पुन्हा लगेच चालू होते.
पण ती व्यक्ति जेव्हा व्हेनीला फ्लेवर घेते तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हेपरेशन होते आणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही.
आणि मग गाडीच्या इंजिन ला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सेडीज़ ने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैक च्या मदतीने 1901 साली आपल्या 'मर्सेडीज़ 35' साठी पहिला रेडिएटर बसवला जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे.
एकाधी फालतु वाटणारी गोष्टसुद्धा जगाला किती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.
-अनामिक