Varishth kanishth

एक दुकानदार रात्री दुकान बंदच करत असतो, तेवढ्यात तोंडात पाकीट धरलेला एक कुत्रा येतो. पाकिटात सामानाची यादी आणि पैसे असतात. कुत्र्याच्या पाठीवर लावलेल्या पिशवीत दुकानदार त्या वस्तू भरतो आणि 'एवढा हुशार कुत्रा कुणाचा'? या कुतुहलाने त्याच्या मागेमागे जातो. कुत्रा बस स्टॉपवर जाऊन थांबतो. हवी ती बस आल्यावर शिस्तीत बसमध्ये चढतो. त्याच्या पट्ट्यात स्टॉपच्या नावाची चिट्ठी आणि पैसे असतात. आश्‍चर्यचकित कंडक्‍टर त्याला तिकीट देतो. स्टॉप आल्यावर कुत्रा शेपूट हलवून कंडक्‍टरला खुणावतो, बस थांबल्यानंतर उतरतो. दुकानदारही त्याच्या मागोमाग उतरतो. कुत्रा एका बंगल्याच्या दारावर पायांनी टकटक करतो. दोन-तीनदा वाजवल्यावर दार खाडकन उघडलं जातं आणि बाहेर आलेला मालक कुत्र्याला सटकन एक फटका ठेवून देतो. कुत्रा बिचारा कुंऽकुंऽ करत शेपूट घालतो. न राहवून दुकानदार मालकाला विचारतोच. मालक संतापानं सांगतो, गधड्यानं मला उठायला लावलंच. दाराची किल्ली विसरला.

अपेक्षांचं असं असतं. त्यांना अंतच नसतो. कितीही केलं तरी 'वरिष्ठ' चिडचिडलेला राहतो आणि प्रशंसेची अपेक्षा असताना टीका झाल्याने काम करणाऱ्या कनिष्ठाचा वारंवार विरस होतो.

No comments:

Post a Comment