लहानपणी बर होत....
वरच्या इयत्तेतल्या मुलांची
पुस्तक अर्ध्या किमतीत आपल्याला चालायची.
आता नवीनचं पुस्तक....
ती हि शाळेतूनच
घ्यावी लागतात.
मोठ्या भावाचा
शाळेचा गणवेश
आपल्याला कामी यायचा ...
आता किमान दोन प्रकारचे गणवेश शाळेत लागतात..
ईतर दिवशी वेगळा आणि पी.टी. च्या दिवशी वेगळा...
आम्हाला एकदा घेतलेला रिलाईबल (Reliable) कंपनीचा रेनकोट दोन तीन वर्ष चालायचा...
आता प्रत्येक वर्षी नवीन कार्टुनच चित्र असलेला रेनकोट आणि सोबत छत्री ही लागते...
आम्ही अर्धा तास चालत मित्रांसोबत गप्पा मस्करी करत शाळा आणि शाळा ते घर गाठायचो...
आता १५/२० मिनिटावरची शाळा गाठायला सुद्धा बस किंवा रिक्षा लागते...
तेव्हा शाळेत फुल दंगा करून एकमेकांना लोळवून घरी गेलो तरी चालायचं...
आता आपल्या मुलाला धक्का लागला तरी पालक तक्रार घेऊन शाळेत पोहोचतात....
तेव्हा बाबा लाईफबॉय साबणाच्या लाल वडीचे दोन तुकडे करायचे आणि आम्ही डोक्यापासून पायापर्यंत तोच साबण वापरायचो...
आता केसांना वेगळा शॅम्पू, चेहेऱ्याला वेगळा साबण, शरीराला वेगळा साबण, ताईला वेगळा साबण, दादाला वेगळा साबण, आईला वेगळा साबण, बाबांना वेगळा साबण लागतो.
तेव्हा आई ५०१ साबणाच्या बार चे चार तुकडे करायची आणि तेच सर्व कपड्यांना वापरायची....
आता वेगळ्या कपड्यांना वेगळा साबण आणि पावडर लागते, वेगळी निळ लागते, स्टार्च ला वेगळं आणि सुगंध यायला वेगळं लिक्विड साबण लागत....
तेव्हा आम्ही सणासुदीला
अत्तर वापरायचो.
आता रात्रंदिवस फॉग चालतोय....
तेव्हा पावसाळ्यात चिखल उडू नये म्हणून पायल स्लिपर्स ला मागे रब्बर लावायचो.
आता घरी वापरायला वेगळी, बाहेर वापरायला वेगळी, पावसाळ्यात वापरायला वेग वेगळी चप्पल लागते...
तेव्हा पावसाळ्यात खाली खराब होऊ नये म्हणून फुल पॅन्ट वर दुमडून विशिष्ट पिन असलेल्या रबर ने फिट्ट करत असायचो.
आता खास पावसाळी कपडे, हाफ पॅन्ट वापरतो.
तेव्हा शाळा सुटली कि... आवळा, बोर, चिंच, पेरू, काळ मीठ, कलर वाला बर्फाचा गोळा खात घर गाठायचो....
आता... कुरकुरे, कॅडबरी, किंडर जॉय, पेप्सी कोला, वेफर्स खातात मुलं....
तेव्हा पेरुवाल्याकडे सहा मित्र जायचे, दोन मित्र दोन पेरू विकत घायचे बाकीचे चार मित्र गलका करत किमान दोन पेरू तरी ढापायचे..
तेव्हाचे पालक अश्या गोष्टींना मुलांचा खोडकरपणा समजायचे.. आताचे पालक चोरी समजतात ...
तेव्हा वाढत्या अंगाचे कपडे मिळायचे
आता तोकड्या अंगाचे कपडे मिळतात..
तेव्हा हे अनुभवायला मिळायचं
आता हे वाचायला लागतयं...
🌸🌸😊😊🌸🌸😊😊🌸🌸
No comments:
Post a Comment