एकदा एक साधू कबीराना म्हणाला, "आज श्राद्ध आहे, तेंव्हा पितरांसाठी गोड खीर बनवायची आहे. त्यासाठी बाजारातून मला दूध आणून दया"
त्यावेळी कबीर ९ वर्षांचा होते.
कबीर दुधाचं भांडं घेऊन दूध आणायला निघाले. रस्त्यात त्यांना एक मेलेली गाय दिसली. कबीरांनी आजूबाजूचं गवत गोळा केलं आणि गायीच्या जवळ ठेवलं आणि ते तिथेच बसले. दुधाचं भांडं देखील बाजूला ठेवलं.
बराच वेळ झाला, कबीर अजून आले नाही म्हणून त्याना शोधायला साधू स्वतः निघाला. काही अंतर चालल्यावर कबीर एका मृत गायीजवळ बसलेला त्यांना दिसले
साधूने त्यांना विचारलं, " दूध आणायला नाही गेले
त्यावर कबीर म्हणाले, "महाराज, प्रथम या गायीला चारा तर खाऊ दे. चारा खाल्यावर गाय दूध देईल ना?"
साधू म्हणाला, "पण, ही गाय तर मेली आहे, मग ती चारा कसा खाणार?"
त्यावर कबीर म्हणाले "महाराज, जर मेलेली गाय चारा खाऊ शकत नाही, तर मग तुमचे १०० वर्षांपूर्वी मेलेले पितर खीर कशी काय खाणार ?"
😷😷😷
यावर साधू निरुत्तर झाला.
अंधश्रद्धा भगाओ... भारत बचाओ...
No comments:
Post a Comment