एसटी चा जो संप चालू आहे त्यावरून मला एक वर्षांपूर्वीचा अपघात आठवतोय .
स्थळ सावित्री नदी , महाड
रात्री १२ ची वेळ . . .
राजापूर मधून बस निघाली . . .
२३ प्रवासी झोपेत . .
चालक वयाची पन्नासी गाठलेला . .
अचानक . . काय झाले माहित नाही ..
पण गाडीला . . एक मोठा धक्का बसला . .
पूर्ण वेगाने पाणी . . घुसले . .
आणि पूर्ण काळोख . .
दोन दिवसांनी . . बस चे तुकडे मिळाले . .
त्यात मुख्य इंजिन चा भाग . . आणि चालकाची सीट मिळाली . .
आणि
मृतदेह हॅन्ड ब्रेक ओढलेल्या अवस्थेत सापडला . . . . .
बस . .
या पलीकडे नाही लिहू शकत
एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला प्रवाश्यांच्या संतप्त प्रतिक्रिया प्रशासनाने देखील हा संप बेकायदेशीर ठरवला परिवहन मंत्र्यांनी तर धमकीच दिली की सरळ कारागृहात डांबू म्हणून ..
मला एक सांगा अश्या कोणत्या मागण्यासाठी त्यांनी संप केला अवास्तव मागण्या आहेत का ? नाही आपण जी दिवाळी ला उटणे लावून अंघोळ करतो न ती अंघोळ पण त्यांच्या नशिबात नसते ती अंघोळ त्यांची कुठे तरी लॉज मध्ये किंवा एखाद्या डेपोमध्ये होत असते त्यांना सन,ऊन पाऊस वारा माहीत नाही
सण कोणताही असो हिंदू मुस्लिम शीख पारसी यांचा कोणताही सण हा त्याच्या घरी साजरा नाही करत हे नक्की
त्यांचे वेतन जेमतेम दहा हजार आणि त्यांना कपात होऊन मिळते 8 ते 9 हजार
मग त्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी केली तर त्यात गैर काय..
अहो कबाड कष्ट रक्ताचे पाणी करून कष्ट करणाऱ्या प्राध्यपकांना एक लाख ते दीड लाख मानधन असणाऱ्याना सातवा वेतन आयोग मिळू शकतो तर एसटी कर्मचाऱ्यांना मिळायलाच पाहिजे
प्रवाश्याची गैरसोय होतंय हे मान्य पण एसटी कर्मचाऱ्यांची ही गैरसोय बाबत सरकारने दखल घ्यावी यासाठी पण हा संप आवश्यक असेल कदाचित
माझा पाठिंबा आहे या संपास आपण ही पाठिंबा द्यावा
*संपूर्ण आयुष्य झिजवून . . . . . . खालील लोक तमाम मराठी माणसासाठी मरताना दिसतात*
*एसटी - ड्रायव्हर कंडक्टर*
* आपले सैनिक *
*खाजगी दवाखान्यातील* *कर्मचारी ,*
*पोस्टमन*
*कंत्राटी कामगार*
याना . . नेहमी भरभरून मिळावे असे वाटते .
हि लोकं नेहमी झिजताना दिसतात .
मागण्या मान्य होऊन संप लवकर मिटू दे .
एसटी . . पोरकी आहे तुमच्या विना . ...
आवडल्यास जास्तीत जास्त पुढे पाठवा 🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment