माणसं

खूप भावली ही कविता !
माहिती नाही कोणी लिहली आहे !
---------------------------------------
*दोन शब्द जगण्याविषयी* 🕊

कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये

चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये

कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये

नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये

गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये

जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये

सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये

नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये

हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.

*कारण*
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... *माणसं !*

संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... *माणसं !*

वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... *माणसं !*

पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... *माणसं !*

शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... *माणसं !*

दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात
*सारी आपलीच माणसं !*

No comments:

Post a Comment