जमलं तर करून बघ.
रागामध्ये असतानाही एखाद्याशी प्रेमाने बोलून बघ...
राग नाही गेला तर सांग...
पण करून तर बघ.
स्वतःला शोधतोयस....
आजूबाजूचे तुझ्याबद्दल जे बोलतात त्यामध्ये....
एकदा स्वतःच्या मनात डोकावून बघ...
स्वतःशी ओळख नाही झाली तर सांग...
पण करून तर बघ.
सुखाच्या मागे धावतोयस...
थोडसं समोरच्याला सुख देऊन बघ...
मग तुला नाही मिळालं तर सांग...
पण करून तर बघ.
रस्त्यावरील झाड देखील सगळ्यांना सावली देतय...
तू पण त्या झाडासारख वागुन बघ...
आनंद नाही मिळाला तर सांग...
पण करून तर बघ
रक्ताची नाती जपतोयस...
एकदा फक्त आपुलकीच नात जोडून बघ..
आयुष्यभर टिकल नाही तर सांग...
पण करून तर बघ.
आयुष्य यंत्राप्रमाणे जगतोयस...
एकदा निवांत जगून बघ...
जगल्यासरख नाही वाटलं तर सांग...
पण करून तर बघ.
No comments:
Post a Comment