Grampanchayat Elections

ग्रामपंचायत निवडणूका

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
👇👇👇👇👇👇👇
👏👏👏👏👏👏👏
तुमचा खेळ होतो
आमचा जीव जातो...
 
ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात 
तरूणांसाठी दिलेला संदेश...

निवडणूक आली वाटतंय ...
पुढारी पांढरी कपडे घालून 
फिरायला लागलेत...
कार्यकर्ते घरोघरी प्रचार करतायेत...
दिवसभर हे घर ते घर...
रात्री बीअरबार...
काय सांगावे...
ही ग्रामपंचायतीची निवडणूक 
राष्ट्रपतीच्या निवडणूकीपेक्षा महत्त्वाची...
१००% मतदान होते...
जिवंतच नाही मेलेले सुद्धा मतदान करतात...
पाच वर्षासाठी...
आणि पुढील पाच वर्षे हे पुढारी 
गावगाडा चालवतात...

गाव गाडा याचा अर्थ कळला का ?
दहा दिवस दारू पाजा..
आणि 
पाच वर्षे गाव मातीत गाडा...
म्हणजे गावगाडा...

हा गावगाडा चालवणारे कोण?
हे पुढारी...
आणि गाडा ओढणारे कोण ?
बैल...
नाही ..हो...
गावची लोक..
म्हणजे आपण ....

विचार करा...
आता पटायच नाही...
पण अनुभव आला की पटेल...

काय हो...
आपल्या घरातील माणूस आजारी पडले 
तर हे येतात का हो दवाखान्यात न्यायला...
देतात का हो डाँक्टरची फी...
पण निवडणूक आली की कसे उचलून नेतात...

असो...

हे तुम्हाला कळतं 
मला कळतं 
पण निवडणूक आल्यावर का कळत नाही...

या काळात 
भावा भावात भांडण...
जावा जावात भांडण...
देवा देवात भांडण...
बांधावरून जाऊ देणार नाही..
रस्ता बंद करील...
पाणी बंद करील...
कशासाठी ?
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी...

निवडणूक कशासाठी असते...
गावचा कारभार चांगला चालावा,
विकास व्हावा,
प्रगती व्हावी...
या साठी...

पण आत्ता निवडणूक कशासाठी होते,
कशी होते...
याचा विचार करा...

मि हा लेख कोणा 
फ्युज गेलेल्या व्यक्तीसाठी लिहीत नाही..
तर हा लेख 
नव्या दमाच्या
सळसळत्या रक्ताच्या 
तरूणांसाठी लिहीतोय...

भावांनो,
जे झाले ते आपण बदलू शकत नाही 
पण जे होणार आहे त्यात आपण चांगले घा
घडवून दाखवू शकतो...
आपल्या गावाला बदलू शकतो...
ही ताकद 
शक्ती 
बळ
आपल्याकडे आहे...
आपल्या मतात आहे..
तीचा वापर झाला पाहिजे...

मि काय म्हणतोय 
लक्षात घ्या...
वापर मताचा झाला पाहिजे..
आपला नाही...
परत सांगतो...
वापर मताचा झाला पाहिजे, आपला नाही ....

क्रांतीतंत्र लक्षात घ्या...

* कोणीही आला तरी मत तुलाच हे सांगा...

* कुणाच्या डोळ्यावर येऊ नका...

* दहा दिवसात निवडणूक संपेल पण या काळात झालेली दुष्मनी कायम टिकते...
यामुळे कुणाच्या आध्यात.. मध्यात पडू नका..

* आपण नागरिक आहोत.. या भांडणात नुकसान आपले होईल असे वागू नका...

* कोणी जिंकला तरी भाकरीला पिठ देणार नाही...

* बाहेरच्या साठी घरात भांडण करू नका...

* कोणी दारू पाजली तर त्याला म्हणावे पुढील पाच वर्षे दारूचे पैसे आत्ता दे..
या पैशात मि काहीतरी कामधंदा करतो....

* फुकट मिळते म्हणून दारूचे व्यसन लावून घेऊ नका...

* या काळात जर कुणी पैसे दिले तर घ्या..
आपलाच पैसा आता बाहेर पडेल...
कोणी कष्टाचा पैसा लोकांना वाटत नाही....

* जो देईल त्या कडून पैसे घ्या, पण मतदान चारित्र्य संपन्न उमेदवाराला करा...

* या काळात कोणताही चुकीचा प्रकार करू नका...

* पोलिसांना सहकार्य करा...

* कायद्याचा भंग करू नका...

* मतदान करताना जात पात, पैसा, श्रीमती पाहू नका..चांगल्या लोकांना साथ द्या...

* मतदानाला जाताना मतदान स्लिप, ओळख पञ, आधार कार्ड जवळ ठेवा...
काही ठिकाणी ते एकत्र जोडलेही आहे...

* बोगस मतदान करू नका...

* तुम्ही केलेले मतदान कुणालाच कळत नाही यामुळे बिनधास्त मतदान करा...

* नंतर एखाद्या उमेदवार जिंकला म्हणून विरोधकांच्या दारात फटाके फोडू नका..
तो जिंकलाय तुम्ही नाही ...

* एखादा उमेदवार हरला म्हणून कुणाच्या घरावर हल्ले करू नका...

* या काळात जातीयवाद वाढवू नका...

* सर्वाशी प्रेमाने वागा...

* हा महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे ...
लालूचा चालू बिहार नाही हे लक्षात ठेवा...

* अस वागा की फुलेनां आभिमान वाटेल...

सांगणे माझ काम आहे...

पटले तर घ्या...

नाहीतरी

किती दिवस 
आणि 
किती पिढ्या
केवळ बोंबलत राहणार...

अमके तमके आगे बढो 
हम तुम्हारे साथ है....

स्वतः पुढे जायचे बघा...
दुसऱ्याचा बाप मेला म्हणून स्वतःची केस भादरणे बंद करा...
आपल्या जिवंत बापाचा विचार करा...   
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

विचार करा... 
हा मेसेज गावातील प्रत्येक माणसांना पाठवा

.......................आपला मित्र

No comments:

Post a Comment