ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा,
ना कुणाच्या पुढे
जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची
जिद्द असावी...!!
पद,प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या 'पुढ्यात' उभी राहतील,
पण......जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव 'तुमच्या' पाठीशी उभी असतील.
आपला दिवस आनंदी जाओ.
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱l
सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी..
आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.
"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन
पडावं लागतं"...
No comments:
Post a Comment