🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राजे तुमच्या सावलीने
सुर्यही झाकला असता,
पराक्रम पाहुन तुमचा
मुजऱ्याला चंद्रही वाकला असता.
पण आमच्या डोळ्या पुढे
तुमच्या रंगेल कथा रंगवील्या गेल्या,
तुमच्या रक्ताने पावन
झालेल्या इंद्रायणी भिमा भंगवील्या गेल्या.
आम्ही तुमच्या रक्ताचे असुन
फितुरांचा जयघोष केला,
तुम्ही मातीसाठी मरुन सुद्धा
आम्ही तुम्हालाच दोष दिला..
कसं सहण केलत राजे..
तप्त सळ्या डोळ्यात घुसतांना..
आमच्या तर डोळ्यातुन पाट वाहतात ईवलसं
कचरं डोळ्यात खुपतांना..
आमच्या मेंदुत मुंग्या होतात
जर जिभ दाता खाली आली,
पण कसं सहन केलत
राजे जेंव्हा तुमची जिभ कापल्या गेली.
किती अकांत झाला असेल मस्तकात,
कानातुन धुराचे लोळ उठले असतील,
अंगावरची कातडी सोलतांना
जमिनीवर पडनारे रक्ताचे थेंबही पेटले असतील.
तुमच्या शरीराचे लचके
तोडणाऱ्या लांडग्याचेही आत्मे
शहारले असतील,
शिर कापनाऱ्या सैतानांचेही हात थरारले असतील.
राजे किती सहन केलत तुम्ही आमच्यासाठी,
अन आम्ही तुम्हाला विसरुन भांडतो ३३
कोटीसाठी..
छत्रपती संभाजी राजेंना त्रिवार मानाचा मुजरा...
ll जय शिवरौद्रशंभू ll
! शिव सकाळ !
🚩🚩🚩🚩🐅🐅🐅🐅
No comments:
Post a Comment