2611

ताज हॉटेल जळत होते
लाल रक्त गळत होते
खरे भक्त साळसकर
दूर शासना आळसकर
पुन्हा सव्वीस अकरा नको
कसाब सारखा छोकरा नको
नापाक पाकडे भामटे होते
शर्थीने लढणारे कामटे होते
तुकारामाने कमाल केली
कसाब पकडून धमाल केली
लढता -लढता शहीद झाले
तेंव्हा आम्हाला माहित झाले
नांगरे पाटलांचा विश्वास होता
ताज हॉटेलचा अभ्यास होता
आत शिरून आतंकी मारले
ओलीस धरलेले नागरिक तारले
नमन त्यांच्या कार्याला आहे
सलाम त्यांच्या शौर्याला आहे

🇮🇳🇮🇳२६/११ 🇮🇳🇮🇳
💐भावपूर्ण श्रद्धांजलि💐

No comments:

Post a Comment