*"जेवण आणी राशीचे स्वभाव'*

थोडेसेच जेवण का असेना
*मेष* आवडीने खाणार..
गरम, चमचमीत पदार्थांवर
यांची पहिली नजर जाणार.. ।।१।।

*वृषभे*ची व्यक्ती दिलखुलास पणे
दाद देऊन जाते..
लोणची-पापडासारखे पदार्थही
अगदी चवीचवीने खाते.. ।।२।।

कधी मारुनी मिटक्या,
कधी नन्नाचा चाले पाढा..
*मिथुना*चे कौतुक मधाळ
तर टीका कडवट काढा.. ।।३।।

'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणत
*कर्के*चे होते पूर्ण जेवण..
रुचकर पण थंड अन्नही हे
कसे पटकन करतात सेवन? ।।४।।

राजस जेवणाच्या *सिंहेचा*
केवढा राजेशाही थाट..
थोड्याथोड्या सर्वच पदार्थांनी
यांचे भरुन जाते ताट.. ।।५।।

'कमी-जास्त नाही ना?'
याची उगाच बाळगून भीती..
इतरांकडे पाहून ठरते
*कन्येची* जेवायची नीती.. ।।६।।

भात-भाजी-आमटीबरोबर
पचतील तेवढ्याच पोळ्या..
अशा संतुलित आहारानंतर
*तूळ* खाते पाचक गोळ्या.. ।।७।।

काही Missing आहे का
कधी कळतही नाही..
साधे नेहमीचेच जेवण
पण *वृश्चिकेला* रुचत नाही.. ।।८।।

कधी पटपट-झटपट जेवण
तर कधी अगदीच वेळकाढू..
*धनू* काढत नाही जेवताना खोड्या
पण वेळ मिळताच संधीसाधू.. ।।९।।

ना कधी कौतुक
ना कसली नकारघंटा..
गपगुमानं जेवतो *मकर*
करत नाही कधी थट्टा.. ।।१०।।

निश्चित वेळ जेवणाची
पार्टी असो वा एखादे लग्न..
*कुंभेची* चिकित्सक वृत्ती
नेहमी रेसिपी जाणण्यात मग्न.. ।।११।।

कधी-कुठेही जमते
*मीनेची* खाण्याशी गट्टी..
पोटभर खाताना घेतात
'डाएट' नावाशी कट्टी.. ।।१२।।

😄😋आहे ना गंमत ! 😛😋

स्वतःची रास तपासून बघा😝😝😝

No comments:

Post a Comment