नटसम्राट.... निःशब्द अनुभव! सगळ्यात आधी साष्टांग दंडवत, नटसम्राट टीमला! कौतुक कुठून सुरु करावं that is the question.. अगदी नानाच्या सर्वश्रेष्ठ संवादफेकीपासुन ते विक्रम गोखले सोबतच्या अभिनयाच्या लाजवाब जुगलबंदीपर्यंत सगळचं कसं काळजात खोलवर रुतणारं... वैभवकाळ पुरेपुर भोगुन समाधानानं रंगमंचावरुन निवृत्त झालेला नटसम्राट खर्या आयुष्यात मात्र नशीबाच्या पायाखाली तुडवल्या जाताना बघवतं नाही... अन जे दिसतं ते अश्रु भरल्या डोळ्यांनी! होय, विक्रमजी आणि नाना कित्येक फ्रेम मधे अक्षरशः रडवतात.. त्यांचं दुःख काळजाला भिडतं. विक्रमजींच्या घरातला आणि नंतर हाॅस्पिटलमधला प्रसंग केवळ अभिनयाची शाळाच म्हणुन पहावा.. जीव ओतलायं त्या दोघांनी तिथे! दिग्गज कलाकारांनी पूर्वी सजवलेला नटसम्राट नाना वेगळ्याच उंचीवर नेतो. नट, बाप, आजोबा, प्रेमळ पती आणि शेवटी बेघर वृद्ध सगळी रुपं नाना लीलया रंगवतो. सहज सुंदर अभिनय, अपमान पचवत, माफी मागतानाचा नाना पाहून जीव कालवतो. पत्नीच्या त्यागाची पुरेपूर जाणिव असलेला नाना तिला बंदराची (किनार्याची) उपमा देतो तो प्रसंग त्यांच्या नात्याचं खरं रुप दाखवतो. नानाचा अभिनय कोहीनुर असेल तर मेधाजींचा (पत्नीचा) अभिनय म्हणजे सोन्याचा मुकुटचं! त्या हिर्याला हे कोंदण नसतं तर ही झळाळी नसती. मृण्मयी, सुनिल, नेहा एकदम झक्कास! त्यांनी कुठेही चित्रपटाची उंची खाली येऊ दिली नाही. २ कृष्णांनी करंगळीवर पेललेला पर्वत त्यांनी आपल्याही काठ्या लाऊन साधार केला. "कट्यार" मधे एक पुढील आशयाचं वाक्य आहे "कलाकाराला दाद केवळ टाळ्यांनीच मिळते असं नव्हे तर निःशब्द शांतता अन पाणावलेले डोळे ही त्याहून उच्च दाद होय" नाना- विक्रमजींचा नटसम्राट हे त्याचं खणखणीत उदाहरण! Exit च्या दरवाज्यातुन निघतात ते पाणावलेले डोळे अन अभिनयाचा उत्तुंग ऐव्हरेस्ट पाहिलेले तृप्त रसिक..! अगदी निःशब्द...!!
Ek Number Movie ahe..
ReplyDeletemast ahe movie...family movie..naan is awesome
ReplyDelete