🎾 प्रत्येकाने लिहून ठेवा ही विनंती.
🎾घसा दुखत आहे ?
घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण
पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी
कमी होते.
🎾घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.
🎾 कफ
झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व
मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
🎾तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.
तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात
जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन
दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन
हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला
की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ
कमी होण्यासही मदत मिळते.
🎾घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र...
No comments:
Post a Comment