सावित्रीबाई फुले

Born: January 3, 1831, Satara district
Died: March 10, 1897
Spouse: Jyotirao Phule (m. 1840–1890)
Parents: Khandoji Navse Patil, LaxmiBai


आज विद्येचे दैवत सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे.
पूर्वी समाजात स्त्रीचं स्थान 'चूल आणि मूल' एवढंच
मर्यादित ठेवण्यात आलं होतं... तीला समाजात कोणताही
दर्जा नव्हता... अशा वेळी स्त्रीयांना नाकारल्या
गेलेल्या शिक्षणाच्या हक्कासाठी सावित्रीबाई शिक्षिका
झाल्या... त्यांनी मुलींच्या हाती शिक्षणाचं हत्यार दिलं..
त्यामुळे ज्या डोळ्यासमोर पूर्वी चूल होती आणि हातात
फुंकणी होती, त्याच डोळ्यासमोर आज
कॉम्प्युटरची स्क्रीन आणि हातामध्ये किबोर्ड आणि माऊस
आलाय. आज जर सावित्रीबाई नसत्या तर कदाचित हेच चित्र
नसतं. सावित्रीबाई म्हणायच्या की स्त्रीयांनी शिकून
स्वावलंबी झाल्यास तिच्यावर समाजाची गुलामगिरी
पत्करण्याची वेळ येणार नाही.. आज आपण बघू शकतो की
शिक्षणामुळे स्त्री स्वावलंबी होऊन ताठ मानेनं जगतये...
सावित्रीबाई नसत्या तर आज स्त्रीया कुठे असत्या ही
कल्पनादेखील केली जाऊ शकत नाही.
विन्रम अभिवादन !!!







No comments:

Post a Comment