पुराणातील मिथक

पुराणांची विश्वासार्हता

आजकाल एक ट्रेंड झाला  आहे पुराणांना नावं ठेऊन त्यांच्यातल्या मिथकांची खिल्ली उडवायची. यामागचे कारण, राजनैतिक असो वा इतर, पुराणांमधील शुद्ध ऐतिहासिक मजकुरावर अन्याय करतं.

दुर्दैवाने आज पुराणांना नावं ठेवल्यावर तुम्हाला 'पुरोगामी' असे म्हटले जाते.

एकदा एका मित्राने मला विचारले होते " जगातले किती देश पुराण आणि वेदांचा अभ्यास करतात?" . माझं साधं सरळ उत्तर होतं, पुराण आणि वेद हे आपले ग्रंथ आहेत.

बाकीच्या लोकांनी त्यांचे अध्ययन करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जरी ते करत नसले, तरी आपण ते केलेच पाहिजे कारण ते आपले ग्रंथ आहेत. हे कारण पुरेसे आहे, बाकीच्या कारणांची गरजच नाही.

त्रास हा आहे कि हिंदू धर्माशी निगडीत कुठलीही गोष्ट हि नेहमी मिथक म्हणूनच सांगितली जाते.

जेव्हा वासुदेव नि कृष्णाला नेले, तेव्हा यमुना बाजूला झाली हे मिथक आहे, पण जेव्हा मोसेस साठी इजिप्तचा समुद्र बाजूला झाला हि सत्य घटना आहे

रामायणात वानर बोलतात हे मिथक आहे, पण बायबल मध्ये कासव बोलतात हि सत्य घटना आहे

कुम्भकर्ण खूप मोठा होता, हे मिथक आहे, पण बायबल मध्ये गोलीअथ मोठा होता हि सत्य घटना आहे

कृष्णाने जे चमत्कार केले ते मिथक आहेत, पण जीझसनि केलेले चमत्कार हि सत्य घटना आहे

आदिवासी असलेला वाल्मिकी रामायण लिहू शकत नाही, पण निरक्षर असलेला मोहम्मद मात्र कुराण सांगू शकतो.

भीम आणि अर्जुन खूप बलवान होते हे मिथक आहे, पण सॅमसन आणि डेविड खांब तोडू शकत होते हि सत्य घटना आहे

सापांपासून प्रल्हाद बचावला हे मिथक आहे, पण बायबल मध्ये एक माणूस सिंहाच्या गुहेतून बचावतो हि सत्य घटना आहे

युधिष्ठीर जिवंत स्वर्गात जातो हे मिथक आहे, पण मोहम्मद घोड्यावर स्वर्गात जाणे हि सत्य घटना आहे

प्रत्येक धर्मात असेच मिथक असतात पण फक्त हिंदू धर्मातल्या गोष्टींना खोटे ठरवले जाते.

पुराणाच्या विश्वासार्हतेचं बोलायचं तर मी कोएनराड एल्स्ट हे काय म्हणत आहेत हे सांगतो--

"To the neglect of the legitimate history books, the ItihAsa-PuraNa literature, i.e. the Epics and the Puranas is like ignoring the historical Bible books (Exodus, Joshua, Chronicles, Kings) to draw ancient Israelite history exclusively from the Psalms, or like ignoring the historians Livius, Tacitus and Suetonius to do Roman history on the basis of the poet Virgil.  What would be dismissed as “utterly ridiculous” in Western history is standard practice in Indian history.

No serious historian would ignore the Exodus narrative simply because it also contains unhistorical episodes like the Parting of the Sea and the voice from the Burning Bush..So, if Biblical history can be accepted as more than fantasy, the same credit should be given to the historiographical parts of the Epics and Puranas."

पुराण आणि वेद हे आपले ग्रंथ आहेत,त्यात आपल्या लोकांची माहिती आहे, आपल्या राजांची,आपल्या ऋषींची,आपल्या राज्यांची. ते आपल्या भूमीवर लिहिले गेले, आपल्या पूर्वजांनी लिहिले, आपल्या संस्कृत भाषेत लिहिले. त्यामुळे हि फक्त आपलीच जबाबदारी आहे कि त्या ग्रंथांचे संवर्धन करण्याची व त्यांच्यातला ऐतिहासिक मजकूर बाहेर आणण्याची.

भारत माता की जय
                                             🌱🌴🌱

C/P

No comments:

Post a Comment