एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले...
"पाणी छान आणि थंड आहे.
आपल्या घरात फ्रिज नाही,
कुठुन आणलेस..?"
पत्नीः-
"शेजारच्या कुंभारा कडुन.!"
ब्राम्हण ः- काय..?
त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस, तुला लाज वाटत नाही...? आपण ब्राम्हण आहोत...
आपल्याला शुद्राचे
काही चालत नाही..?"
पत्नीः- (घाबरली व म्हणाली)
" मला माफ करा,
या पुढे अशी चुक
होणार नाही....
[दुस-या दिवशी.]
ब्राम्हण ः-
"अग...
जेवायला वाढ..!"
पत्नीः
"काही-नाही..!"
ब्राम्हण ः-
"काय...?
पोळी केली नाही..?"
पत्नीः-
" नाही....!
कारण...
तवा व चुल शुद्र लोहाराने
व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू
फेकून दिल्या..!"
ब्राम्हण ः- "वेडी आहेस काय..?
बरं दुध आण..!"
पत्नीः-
"मी दुध फेकुन दिले
कारण....
ते शुद्र गवळ्याने दिले.
मी म्हटले
'उद्या पासुन दुध आणू नकाे'
आम्हांला शुद्रांचे
काही चालत नाही..!"
बाम्हणः बर मी बाहेर चाललोय माझी चप्पल कुठे आहे.....???
पत्नीः ते मी बाहेर टाकले. .
ब्राम्हण : का?????
पत्नी : ते चप्पल तुम्हाला एका शुद्र चांभाराने दिले होते म्हणून टाकले. ......
ब्राम्हण ः (किंचाळला)
" काय...?"
ब्राम्हण :- "बरंबर" ...
झोपायला खाट लाव..!"
पत्नी म्हणाली ः-
"मी खाट तोडून टाकली
व लाकडे जाळुन टाकली.
मेलं शुद्राचं काहीच नको
आपल्याला..!!"
ब्राम्हणाने डोक्याला हात लावला
म्हणाला :- "अरे...
ईथली धान्याची पोती
कुंठ आहेत..?''
पत्नीः-
"मी धान्य लोकांना वाटून टाकले कारण....
ते आपण कुणबी शुद्रां कडुन
घेतले होते.
नकोच ते आपल्याला ..!"
ब्राम्हणाला भाेवळ आली
व म्हणाला,
" माझे आई... घरात एवढा कचरा व घाण का ??
केरसुणी शूद्राने बनवलेली होती म्हणून मी ती फेकूम दिली .
ब्राम्हणाचे डोके गरगरले ....
घरात काहीच दिसत नाही.
वस्तू कुठं गेल्या..?"
पत्नी म्हणाली :-
"नाथ...
घरातली प्रत्येक वस्तू कुण्यातरी
शुद्रांनेच बनवली आहे.
त्यामुळे...
मी त्या तोडुन मोडुन
जाळुन टाकल्या..!"
ब्राम्हण मोठयाने ओरडला
म्हणाला,
" अरे आपण
पार भिकारी झालो...
एवढे घरंच काय ते
उरले आता...!"
पत्नी म्हणाली,
" नाथ...
चिंता करू नका,
मी आपल्या आज्ञे पुढे नाही,
मी हे घर दान करून टाकले आहे.
कारण... हे घर त्या शुद्र गवंडी वडार व शुद्र मजुरांनी बांधले होते,
नकोच बाई आपल्याला शुद्राचे."
"नाथ....
चला आपण जंगलात जावू
कारण...
इथे सर्व शुद्र आहेत,
भिक्षा काय शुद्राला मागायची..?
नको नको..!"
ब्राम्हण चक्कर येवुन
खाली पडला,
"हे देवा...
मी तर पार शुद्रापेक्षा
अतिशुद्र आहे.
माझ्याकडे कांहीच नाही,
मीच खरा शुद्र आहे,
माझे पानही शुद्रा शिवाय
हालत नाही...
देवा...
खरे उच्च शेतकरी
सर्व अठरा पगडं जातीच महान
व वंदनीय आहेत, मी मात्र काहीच कामाचा नाही..!"
मग त्या ब्राम्हणाने संपुर्ण समाजाची खाली डोके टेकुन
माफी मागीतली
व पत्नीच्या चरणावर
लोटांगण घालुन
तीची...
कान उघडल्यामुळे
आभार मानले..!
👇
👇
👇
👉🏿लक्षात ठेवा
जगात कुणीही 'श्रेष्ठ' वा 'नीच' नाही, सर्व समान व एकमेकांस पुरक आहेत..
Massage आवडला तर नक्की शेअर करा.
No comments:
Post a Comment