* पोस्ट खूपच छान वाटली ।.....*
काल एका बस स्टाॅप वर बसची वाट पहात होतो. शेजारी एक आजोबा बसलेले होते. हातात अॅल्युम्युनियमची काठी, कानाला हेडफोन, खांद्यावर शबनम, तोंडात चाॅकलेट असावे . आजोबा कुठे जायचे?
ते म्हणाले पास आहे ,जी बस येईल त्या बस मध्ये बसायचे आणि फिरायचे. एकट्याने फिरताना भिती नाही वाटत? त्या वेळेस ते म्हणाले मागील वर्षी बायको आजारी पडली, शेवटच्या क्षणी मी मुलगा डाॅक्टर हजर होतो. बायकोने भितीने माझा हात धरून ठेवला होता तरी मी वाचऊ नाही शकलो. आम्ही वय झाले म्हणुन बाहेर फिरायचो नाही . ती गेल्यावर माञ मी हिंमत केली फिरायला सुरवात केली.मन खंबीर केले, आवडेल तिथे जातो, लोकांशी बोलतो, जे बघितले ते मुलाला घरी जाऊन सांगतो. सोबत आधार कार्ड, डाॅक्टरांचा मोबाईल नंबर, मुलाचा मोबाईल नंबर, मेडिक्लेम पाॅलिसी, औषधे आणि मोजके पैसे ठेवतो आणि फिरतो. जे आवडले ते खातो. एखाद्या ठिकाणी मुक्काम करावासा वाटला तेथे थांबतो ,मुक्कामाचे मुलाला फोन करुन सांगतो. खुप एकटे वाटले की वृध्दाश्रमात जातो, छान पैकी खाण्याचे पार्सल घेतो त्यांच्या सोबत खातो. त्यांच्याशी संवाद करतो, भरपुर हसतो नवीन ऑक्सिजन मिळतो जगायला. काही वेळेस लहानपणीच्या आठवणी आल्या की अनाथाश्रमात जातो खाऊ घेतो, खेळणी घेतो भरपुर खेळतो. त्यामुळे घरचेही कंटाळत नाही आणि मी पण आनंदात रहातो. एक बस आली त्या मध्ये ते चढले खिडकी तुन त्यांनी बाय केले मोबाईल नंबर घ्यायचा राहीला पण ............
*जाता जाता मला ऑक्सिजन देऊन गेले.*
💐💐
No comments:
Post a Comment