*बौध्द असण्याचे फायदे*
👍🏻👍🏻👍🏻
👉🏻1. देवाची आणि भुतांची दोन्हीची अजिबात भीती नाही.
👉🏻2. संकटसमयी कुणाचा धावा करण्याची गरज नाही, कारण स्वतः हात-पाय हलवायची सवय लागते.
👉🏻3. मटन आणताना, केस कापताना "आज कुठला वार आहे?", ही मूर्ख चौकशी करावी लागत नाही.
👉🏻4. घरात मूर्त्या गोळा करून त्यांना रोज आंघोळ, पूजा, असले प्रकार करावे लागत नाहीत.
👉🏻6. कुठल्याही दिवशी, कधीही, काहीही खाता-पिता येत… अगदी बिनधास्त !
👉🏻7. मेल्यावर अंत्यविधी आणि नंतरच्या विधीचा खर्च नाही.
👉🏻8. लग्न बिनाहुंडा, स्वस्तात मस्त करून उरलेले पैसे हनिमूनसाठी वापरता येतात.
👉🏻9. बारसे, मौंज, सुंता, बाप्तिस्मा इत्यादी बालपणीच्या कटकटी बिलकुल नाहीत.
👉🏻10. पुजारी, पाद्री, इमाम इत्यादी लोकांशी बिनधास्त भांडता येत… गरजच काय या मेल्यांची मला?
👉🏻11. उपास-तापास, रोजे, करवा-चौथ, चातुर्मास यापासून पूर्ण मुक्ती.
👉🏻12. बाळाचे नाव ठेवताना जगातले सगळे पर्याय उपलब्ध असतात.
👉🏻13. प्रेमात पडताना, लग्न करताना पुढचा माणूस कुठल्या धर्माचा आहे हे पाहायची गरज शुन्य… सरळ भिडा !
👉🏻14. सगळ्या धर्माच्या, सगळ्या सणांची सारी पक्वान्ने आनंदाने चाखता येतात… कोणतेही व्रतवैकल्ये न करता.
👉🏻15. कुठल्याही दिशेला डोके किंवा पाय ठेऊन झोपता येते.
👉🏻16. सगळ्या जाती-धर्माच्या मिरवणुकांच्या नावे सरसकट बोटे मोडता येतात… झेंडा बघायचीही गरज नाही.
👉🏻17. स्वर्ग-नरक, कयामत, पुनर्जन्म असल्या भंपक कल्पनांचा त्रास नाही, भीती नाही.
👉🏻18. सक्तीची दक्षिणा, जकात नाही… थोडक्यात खिशाला चाट नाही.
👉🏻19. 'अलिफ-लैला' असो की 'जय मल्हार', 'रामायण', 'महाभारत' असो … सगळ्या सिरियलच्या मूर्खपणावर मस्त हसता येते.
👉🏻20. कुणालाही भाडेकरू म्हणून ठेवता येते, भाड्याने घर पण सहज मिळते... नास्तिक सर्वमान्य आहेत !
👉🏻21. धार्मिक मुद्यांवरच्या TV वरच्या चर्चा पाहून panel वरच्या लोकांची कीव करता येते.
👉🏻22. प्रार्थना, स्तोत्रे, आयाती इत्यादी बिनकामाचे पाठांतर नाही.
👉🏻23. "मुलांना काही धार्मिक शिकवत नाही का?" या प्रश्नाला छानपैकी हसून निकाली काढता येते.
👉🏻24. रविवारी उशिरापर्यंत मस्त ताणून देता येते…
👉🏻25. दंगली, धर्मयुद्ध, जिहाद आदी मूर्खपणाला कवटाळण्याची गरजच नसते… सुखाने जगता येते.
👉🏻26. घरात आपले आई-बाबा असतानादेखील उगीच दुसर्या कुणाला स्वयंघोषित 'माझी आई - माझा बाप' बोलून खोटा ढोंगीपणा करण्याची गरज भासत नाही.
👉🏻27. चांगलं शिक्षण प्राप्त करून प्रबोधन करता येते...
डोकं गहाण ठेवून कुण्या बुवाबाबांच्या नादाला लागण्याची आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालून आपल्या मूर्खपणाची खात्री पटवून देण्याची गरज नसते.
👉🏻28. स्वतःचे कष्टाचे पैसे वायफळ प्रवास खर्च करण्यापासून वाचवता येतात. देवस्थानांचे भले करण्यापेक्षा आणि पुजार्याचे पोट भरण्यापेक्षा गरजवंताला देता येते. त्या पैशाचा सदुपयोग करून आपला सर्वांगीण विकास करता येतो आणि घरी सुबत्ता आणता येते.
.
.
.
हुश्श … थकलो लिहून.
थोडक्यात सांगू, या सगळ्यांना फाटा देऊन आपले आयुष्य स्वत:च्या सोयीने-इच्छेने, विवेकाने, आनंदात, शांततेत आणि कुठल्याही आडकाठीशिवाय मस्तपैकी जगता येते.
😋😋😊🙂
No comments:
Post a Comment