🍁 🍃 माझ्या आठवणीतला रक्षाबंधन 🍃🍁
सकाळी लवकर उठून
अंघोळीला केलेली घाई
माझ्या आधीच उठलेली
नटून बसलेली माझी ताई...
दादा आवर ना लवकर
म्हणणारी आमची छोटी
माझीच पहिली राखी हं
हाच शब्द तिच्या ओठी ......
रांगोळीने सजल्या पाटावरती
जणू बसला होता तो बाहुला
पेढे मिठाई कुठे गरीबांच्यात
तो गोडवा साखरेवर भागवला ......
बांधली राखी मनगटावर
तोऱ्यात दिला एक रुपाया
तरी रुसून ताई म्हणाली
कायरे आईकडचाच हा रुपाया ....
मलाच समजेना झाले क्षणाला
काय कसे समजावे या वेडीला
तरी समजूत काढत बोललो
मोठा झाल्यावर साडी घेईन तुला .....
काहीच समजत न्हवते तेंव्हा
बंधनातला हा धागा कशाला
सगळेच बांधतात म्हणून बांधायचो
चमचमणाऱ्या पाकळ्या हाताला ...
.
🍁🍃रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा !!🍁🍃
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
No comments:
Post a Comment