कोकण म्हणजे लाल मातीतली वाट,
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट!
कोकण म्हणजे भरलेला पापलेट,
कोकण म्हणजे वडे सागोतीच ताट!
कोकण म्हणजे बांगड्याचे तिखले,
कोकण म्हणजे जीभेचे चोचले!
कोकण म्हणजे अबोलीचं फुल,
कोकण म्हणजे जीवाला भूल!
कोकण म्हणजे देव रवळनाथ,
कोकण म्हणजे देवापुढे जोडलेले हात!
कोकण म्हणजे सारवलेलं अंगण,
कोकण म्हणजे तुळशी वृंदावन!
कोकण म्हणजे खाजा,
कोकण म्हणजे ! hoy maharaja
कोकण म्हणजे चहा आंबोळ्या,
कोकण म्हणजे दारावरच्या रांगोळ्या!
कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी!
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रूपेरी वाळुचा साज!
कोकण म्हणजे दशावतारी खेळ,
कोकण म्हणजे भावभक्तीचा मेळ!
कोकण म्हणजे वाळुची पुळण,
कोकण म्हणजे घाटाचे वळण!
कोकण म्हणजे फणस काजू आंबा,
कोकण म्हणजे आंबटगोड रातांबा!
कोकण म्हणजे मामाचं कौलारू घर,
कोकण म्हणजे आजीच्या मायेचा पदर!!!!
मैञी असावी कोकणातल्या हिरवळी🌿🌾 सारखी..............
शोधूनही न सापडणारी
मैञी असावी कोकणातल्या आंब्याफणसारखी🍊🍍
...........
एकदा खाऊनही हवी अशी वाटणारी
मैञी असावी कोकणातल्या करवंदांसारखी..🍇🍒
काट्यांबरोबर जन्म घेऊन आंबटगोड चव देणारी
मैञी असावी कोकणातल्या नारळी- पोपळींसारखी.....🌴🌴
समुर्दकिनारी जन्म घेऊन उंच
आकाशी झेप घेणारी
मैञी असावी कोकणातल्या रस्तांसारखी....🗻
झाडीझुडपातून नागमोडी वळण घेऊन
जीवनाचचा रस्ता शोधणारी
मैञी असावी कोकण रेल्वे
सारखी...🚂🚂
दरिखोऱ्यातून प्रवास करुनही आपल धेय्य गाठणारी
मैञी असावी कोकणातल्या मुलांसारखी....👬👭
शाळा-काँलेज मध्ये महाराष्ट्रात
पहिली येणारी
मैञी असावी कोकणात
पाण्याच्या झऱ्यासारखी....⛲🗻
डोंगरदऱ्यातून संथपणे वाहून आपला मार्ग शोधणारी
मैञी असावी कोकणातल्या माणसारखी...👨👦👳
लहान-मोठ्यांचा आदर ठेऊन स्वाभिमानाने जीवन जगणारी
कोकण सॊडल की आईपासून दूर
गेल्यासारखं वाटतं..
कोकण सोडल की अस्तित्व
हरवल्यासारखं वाटतं..
वडाची झाडं मोठी होऊनही परत
मात्रुभूमिकडे झुकतात..
कितीही दूर गेलं तरी पाय परत
कोकणाकडेच वळतात ..
दगड झालो तर " शिवाजी "
होईन..!!!
माती झालो तर " कोकणचीच "
होईन..!!!
पाणी झालो तर " काळातलाव चा "
होईन...!!!
आणि...
जर का पुन्हा मानव जन्म मिळाला तर.
.
.
.
.
.
.
.
.
आईशप्पथ
फक्त आणि फक्त "कोकणीच " होईन...
जग असेल भारी पण माझ कोकण लय भारी!.......
No comments:
Post a Comment