Excellent Thoughts in Marathi

आयुष्यात स्वत:ला कधी 'उध्वस्त' होऊ देऊ नका..कारण लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत..
संकटावार अश्या प्रकारे तुटून पड़ायच की....जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे..!

  कडू औषध आपण
लगेच गिळून टाकतो
   पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले
   वाईट क्षण लगेच विसरा
 आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...!!!

       हळवी असतात मने
       जी शब्दांनी मोडली जातात.  
       अन शब्द असतात जादूगार
      ज्याने माणसे जोडली जातात

काही शब्द असतातचं असे की ते नेहमीचं ऐकावेसे वाटतात.
काही नाती असतातचं एवढी गोड की,
ती कधीच संपू नयेत असचं वाटतं.
आणि काही माणसं असतातचं अशी की,
ती नेहमी "आपलीचं" असावीत असचं वाटतं, अगदी शेवटपर्यत...!!

"आई" म्हणजे भेटीला आलेला देव,
"पत्नी" म्हणजे देवाने दिलेली भेट...
आणि "मित्र" म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट....
खरी "मैत्री" ही "हात" आणि "डोळया" सारखी असावी...
हाताला इजा झाली की डोळ्यांत पाणी येते, आणि
डोळ्यात पाणी आले तर हात लगेच डोळे पुसतो 🌿

आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे
आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.
जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,
परंतु एक वडीलच असे आहेत 
की,जे आपल्या मुलाला
आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.

वाटीभर शिरा समोर बघितला अन लक्षात आलं. त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं पण ज्यामुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे दिसली नाही.
काही अंशी आपलं एखाद्याच्या आयुष्यातलं अस्तित्व असच असावं
दिसत नसलं तरी गोडवा आणि आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळत.

शांत स्वभावाचा माणूस
         हा कधीही कमजोर नसतो...
        कारण या जगात पाण्यापेक्षा
           मऊ असे काहीच नाही...
   पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर
    भले भले डोंगर हि फोडून निघतात...
    माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
        तो पैसा कमविण्यात नाही.

          " जीवन आहे
          तेथे आठवण आहे."

            "आठवण आहे
           तेथे भावना आहे."

             "भावना आहे
             तेथे मैत्री आहे."

            आणि मैत्री आहे
     तेथे नक्कीच,तुम्ही आहात..!

No comments:

Post a Comment