*कसं जगावं..? 🙄🙄🙄* 😬😜
*मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕*
*श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं..? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..?👳🏼👳🏼*
*पैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽*
*पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..! 😮😮*
*नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.*
*चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗*
*वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा..! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..?😴😴*
*आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा..? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..?🚶🏼🚶🏽*
*जास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂*
*आणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺*
*तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣*
*दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..?💂🏼💂🏼*
*मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..!👹👹*
*सहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.*
*नाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱*
*सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻*
*स्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..?🤓🤓*
*खेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏*
*आणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..!😂😂*
*तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼*
*अयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..!🙇🏻🙇🏼*
*लोकांचं काय घेऊन बसलात..? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं..?* *जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..?🤔🤔*
*मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..*
*फिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..!*
*आपण का शरमून जायचं..?*
*कशासाठी वरमून जायचं?*
*कशासाठी भयाने ग्रासून जायचं..?*
*फुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला* *नासून जायचं..?*
*आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..*
*कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..!* plz read
No comments:
Post a Comment