साहित्य : अर्धी वाटी अमूलचे बटर , अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा ,अर्धी वाटीबारीक चिरलेला टोमॅटो , एक बारीक चिरलेली सिमला मिरची (ढोबली) अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर , दोन टेबलस्पून पाव भाजी मसाला,एक टेबलस्पून ब्याडगी मिरचीची पावडर ,चवीनुसार मीठ ,एक छोटा चमचा जिरे, एक छोटा चमचा हळद,एक टेबलस्पून आले-लसूण- हिरवी मिरची यांची पेस्ट ,चवीनुसार मीठ.
सजावटीसाठी एक कांदा-बारीक चिरून,एक लिंबू – आठ तुकडे करून,अर्धी वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : गॅसवर तवा ठेऊन त्यावर अमूलचे बटर गरम करून त्यात जिरे घालून ते तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर मऊ होईपर्यंत परतून घ्या,त्यात आले-मिरची- लसणाची पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या, आता त्यात पाव भाजीचा मसाला घालून पुन्हा दोन मिनिटे परता,आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो,बारीक चिरलेली सिमला मिरची व ब्याडगी मिरचीची पावडर घालून चांगले मिक्स करून घेऊन आणखी दोन मिनिटे परता. चवीनुसार मीठ घालू मिक्स करून घ्या.
आता ब्रेडला आतील बाजूंना बटर लावून ब्रेड भाजून घ्या,नंतर ब्रेडवर मसाला पसरून घ्या व ब्रेड तव्यावरच्या मसाल्यावर दाबून परता. आता मसाल्यावर एक चमचा बटर घाला व मसाला ब्रेडला लावून मसाल्यावर ब्रेड दाबून पुन्हा एक मिनिट परता.
बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर यांनी सजावट करून गरम मसाला ब्रेडवर लिंबू पिळून भाजीबरोबर सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment