नमस्कार,
आपणांस विनंती करतो की जे चाकरमानी गावाकडे येत आहे त्यांना गावी आल्यावर  घ्यावयाची काळजी.
१. लोकांच्या भेटा घरच्या उंदराकडून खाण्याआधी पोहोच करा.
२. गणपतीची मूर्ती उचलून घ्यायला शक्य असेल तरच घ्या  अन्यथा उगाच गावच्या पोरांकडे शायनिंग मारू नका.
३. आरत्या व्यवस्थीत पाठांतर करून जा.
४.  आरती करताना बाहेर काढलेल्या चप्पलांकडे लक्ष ठेऊ नका.
५. आरती चालू असताना एखादी पाहूणी मला पाहत तर नसेल ना हे मनातून काढून टाका.
६. शंका असल्यास शेजारच्या भल्या माणसाकडे पहा.
७. विनाकारण कोणाकडे पाहून हसु नका.
८. आरतीला / भजनाला जाताना सामान, पेटी, टाळ पखवाज ढोलकी, ईत्यादी घ्यायची स्वताला सवय लावा, त्या साठी कोणतीही व्यक्ती नेमली नाही हे स्वताला सांगा.
९. प्रसाद घेताना तो प्रसाद म्हणूनच घ्या हे मनाला समजवा.
१०. आरती ही सामुदायीक करावयाची आहे.
११. ज्याच्या हातात टाळ नसेल त्यानी टाळी वाजवली तरी चालेल.
१२. आरती एकाच सुरात असावी, मोठ्याने बोलण्याचा अतीरेक टाळा, मुकेपणामुळे पानसुपारी,गुटखा खाल्याचा संशय टाळा.
१३. पुढची घरे टाळण्यासाठी लहान मुलांना घेउन येवू नका.
१४. आरती जातो सांगुन वाडीतील ईतरांची काकडी, तोवशी  तोडू नका, कारण रात्रीस (खेळ )चाळे  लक्षात ठेवा.
१५. भजनाला बसल्यावर मीसकाँल मारू नका, तेने वातावरण दुषित होते.
१६. खाण्यासाठी ठेवलेला अल्पोपहार हा अल्पच समजावा.  🎹🎹🎹🎤  चला तर मगं,  याहां सगळे जण, वाट पाहतोय श्री गणपती......'👏🏼😊

No comments:

Post a Comment