...ती हळदी कुंकू करते
...सौभाग्य जपण्यासाठी !
...ती देवीची 'ओटी' भरते
...मातृत्व जपण्यासाठी !
...ती घट बसवते
...प्रपंचाच्या स्थैर्यासाठी !
...ती हरतालिका पूजते
...सुखी संसारासाठी !
...ती वड पूजते
...पती प्रेमासाठी !

...कोणतं व्रत करते
...ती स्वतःसाठी ?
मग तरीही तिची थट्टा ?
...कशासाठी ?
पुरुष करतो एखादी पूजा, व्रत, उपास आपल्या बायकोसाठी ?
...म्हणतो कधी, "दमलीस ? बस जरा ! मी करेन गॅस बंद तीन शिट्टया झाल्यावर !
टेबल तर आवरायचंय ना, मी आहे ना !
आज कपाट मी आवरतो, तो पर्यन्त तू अजिबात मधे येऊ नकोस !
आज बाई येणार नाही म्हणून काय झालं,
ए चल, आज माझ्या हातचा पुलाव खाऊन बघ !
...


'स्त्री'च्या "बायको"पणाची थट्टा म्हणजे पुरुषार्थ नव्हे,
तर 'बायको'मधल्या "स्त्री"चा सन्मान हा खरा पुरुषार्थ आहे !
आयुष्यभर केवळ कुटुंबाकरिता जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझ्याकडून  मानाचा मुजरा !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment