माझी छकुली मोठी झाली.
एकेदिवशी सहजच म्हणाली," बाबा, मी कधी तुला रडवलय का रे ?"
मी म्हटलं," हो ."
"कधी ?" तिनं अधिरतेनं विचारलं.
मी म्हणालो," तु एक वर्षाची असताना मी तुझ्या समोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं कारण मला बघायचं होतं तु काय उचलतेस. तुझी निवड ठरवणार होती की मोठेपणी तु कशाला जास्त महत्व देतेस. जसे पैसे म्हणजे संपत्ती, पेन म्हणजे बुद्धी आणि खेळणं म्हणजे आनंद.
मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो. मला बघायची होती तुझी निवड.
तु एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस आणि मी पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.
तु रांगत रांगत पुढे आलीस, मी श्वास रोखून पहात होतो आणि क्षणार्धात तु त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.
माझ्या लक्षातच नाही आलं की या सगळ्यांबरोबर मी सुद्धा एक निवड असू शकतो.
ती पहिली आणि शेवटची वेळ होती जेव्हा तु मला अक्षरशः रडवलसं.
Jarur wacha !! Khuup sundar lihilay !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment